परिवर्तनाच्या वाटेवर ....

    14-Nov-2019
Total Views |



टिटवाळा : समाजकार्य महाविद्यालय निर्मला निकेतन, मुंबई येथे शिक्षणाच्या निमित्ताने भेट झालेल्या मुंबई आणि ठाणे परिसरातील युवकांनी आपली विविध सामाजिक प्रश्नांवर काम करणारी टीम परिवर्तन सुरू केली आणि सुरू झाली एक युवकव्याप्त चळवळ. साधारण वीस ते तीस युवकांचा गट प्रामुख्याने समाजकार्याचे शिक्षण घेतलेली ही मंडळी आज पाणी प्रश्नावर 'आंघोळीची गोळी' हा प्रेम, बंधुभाव, त्याग आणि बचत सांगणारा उपक्रम आंघोळीची गोळी संस्थेच्या मदतीने महाराष्ट्रभर पाणी बचतीसाठी चालवत आहे. पाणी बचतीच्या या उपक्रमाचे चेतन पाटील आणि सागर वाळके हे युवक समन्वयक म्हणून काम करत आहेत. महाराष्ट्रातील दुष्काळजन्य परिस्थिती घालवण्यासाठी पाण्याची बचत आणि पाण्याचे संवर्धन या विषयावर ही युवक मंडळी शाळा, महाविद्यालयात जनजागृती करत आहेत. त्याचबरोबर 'एकलव्य- गाव तिथे ग्रंथालय' उपक्रमाअंतर्गत ग्रामीण भागात ग्रंथालय उभारण्यासाठी मोठी मोहीम गेल्या अनेक महिन्यांपासून ही युवक मंडळी राबवत आहे.

 

आपले शिक्षण आणि काम सांभाळून फावल्या वेळेत काम करणार्या या मंडळींनी आजवर आपल्याकडील जमा पुस्तकांच्या माध्यमाने अनेक संस्थांना ग्रंथालय सुरू करण्यासाठी पुस्तकरूपी मदत केली आहे. 'एकलव्य-गाव तिथे ग्रंथालय' मोहिमेची जबाबदारी तेजश्री देवडकर आणि स्वप्नील शिरसाठ हे युवक सांभाळत आहेत. वाचन चळवळ अधिक व्यापक व्हावी यासाठी प्रत्येकाने सातत्याने वाचन करणे आवश्यक आहे, हाच या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. त्याचबरोबर साहित्य संकलन मोहीम, ज्यांत विविध आदिवासी पाड्यात कपडे, शैक्षणिक साहित्य, सायकल वाटपाची मोहीम ही युवक मंडळी राबवत आहेत. कपडे, शैक्षणिक साहित्य, सायकल जमा करण्याची मोहीम नामदेव येडगे आणि संकेत जाधव टीम परिवर्तन समन्वयक म्हणून जोमाने सांभाळत आहेत. साहित्य संकलनाच्या या मोहिमेत या युवकांना इतर अनेक संस्था आणि नागरिक मोठ्या प्रमाणात मदत करत आहेत. शून्य कचरा संकलन मोहिमेच्या माध्यमाने जमा होणारे कपडे, इलेक्ट्रॉनिक साहित्य, खेळणीदेखील टीम परिवर्तनच्या मोहिमेत उपयुक्त ठरत आहे. संस्था कोणतीही असो, सामाजिक काम हा उद्देश समोर ठेवून ही युवक मंडळी अनेक संस्थांना त्यांच्या कामात मदत करते. पर्यावरण संवर्धन, अंधश्रद्धा निर्मूलन यासाठी ही युवक मंडळी प्रबोधनात्मक काम करते. या युवकांच्या कामात सुसूत्रता आहे, त्याचबरोबर कामाचे नियोजनदेखील आहे.

 

टीम परिवर्तनमध्ये प्रामुख्याने कल्याण परिसरातील युवक आहेत. यातील स्वप्नील शिरसाठ अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम सांभाळतो. अंधश्रद्धा म्हणजे नेमकं काय? त्या कोठून आल्या? त्यामागचे विज्ञान काय आहे?, हे प्रात्यक्षिकांच्या माध्यमाने लोकांना पटवून दिले जाते. त्याचबरोबर ही मंडळी विविध सामाजिक विषयावर कविता, लेख लिहून आणि फोटो काढून समाजमाध्यमांच्या मदतीने लोक प्रबोधनदेखील करते. या युवकांच्या गटात अनेक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय खेळाडूदेखील आहेत. ग्रामीण भागातील युवकांना खेळाचे प्रशिक्षण देण्यासाठीदेखील ही मंडळी काम करत आहेत. रुपाली वाघुडे आणि भूषण राजेशिर्के क्रीडा समन्वयक म्हणून काम करतात, तर 'खिळेमुक्त झाडं' या वृक्ष संवर्धनाच्या मोहिमेचे समन्वयक म्हणून तुषार वारंग आणि अविनाश पाटील काम करत आहेत. झाडांना ठोकण्यात आलेले खिळे, पोस्टर, बॅनर काढण्याचा खिळेमुक्त म्हणजेच वेदनामुक्त झाडे हा उपक्रम अनेक ठिकाणी ही युवक मंडळी सातत्याने राबवत असतात. विविध सामाजिक विषयांवरील चळवळीच्या गाण्याचा 'आशय विद्रोहाचा' या फेसबुकवर लाईव्ह चालणार्या उपक्रमाचा समन्वयक म्हणून रोहित जगताप काम करतो. या उपक्रमात समाजात चालत असलेल्या घटना आणि एकंदर सामाजिक परिस्थितीवर भाष्य करण्यात येते.

 

पर्यावरण समन्वयक प्रामुख्याने सर्पमित्र म्हणून सुहास पवार काम बघतो. आपल्या अन्नसाखळीत प्रत्येक सजीव घटकांचे योगदान या माध्यमाने युवकांना विविध शिबीर आहे. उपक्रमांच्या माध्यमाने सांगण्यात येते. अनिकेत बारापात्रे आर्थिक समन्वयक म्हणून प्रत्येक मोहिमेचे कामकाज पाहतो. त्याचबरोबर विधी गोलटकर, अंजुम मुलानी, बेनीटा डिसूझा, अस्मिता साळुंखे, समीक्षा सरवदे, अनुजा चव्हाण, अरिना पाखरे, सरिता कबाडी ही युवतींची टीमदेखील सातत्याने आपले योगदान परिवर्तनाच्या या लोक चळवळीत देत असते. त्याचबरोबर अनिकेत चांदुरे, वैभव गायकवाड, मंगेश तिवारी, राकेश गायकवाड, सॅमसंग म्हस्के, गुंजन महाजन, जगदीश लोंढे, प्रणिल मिसळ, प्रवीण जावळे, निलेश पाटील, मयूर आढाव, अक्षय जगताप, रोहित गोडसे ही मंडळी अनेक छोट्यामोठ्या उपक्रमांची जबाबदारी पार पाडण्यासाठी काम करते. रक्तदान आणि अवयवदानविषयक लोकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी ही मंडळी काम करत आहे. गरजूंना योग्य वेळी रक्त मिळावे, यासाठी प्रत्येक रक्तगटाचे स्वतंत्र ग्रुपदेखील व्हॉट्सअ‍ॅपवर सुरू करण्यात आले आहेत. 'रिसोर्स हब' या अनोख्या संकल्पनेच्या माध्यमाने व्हॉट्सअ‍ॅपद्वारे देशभर चालणारे विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रम नागरिकांपर्यंत पोहोचवले जातात. स्थानिक आणि देशपातळीवरील अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचे प्रश्न सोडवण्याचे उद्देश घेऊन 'वह सुबह कभी तो आयेगी,' हा नाविन्यपूर्ण उपक्रम या टीमने नुकताच हाती घेतला आहे. या दोन्ही उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण, शहरी त्याचबरोबर दुर्लक्षित असलेल्या आदिवासी समाजाच्या युवकांसाठी विविध विषयांवर शिबिरे आयोजित केली जातात. रोजचा कट्टा ते टीम परिवर्तन हा गेल्या अनेक वर्षांचा या युवकांचा सामाजिक काम करणारा गट अनेकांना प्रेरणादायी ठरेल असाच आहे.

 

- अजय शेलार

अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121