आरेप्रकरणी मेट्रो कारशेडच्या बांधकामावर स्थगिती नाही [आदेश सविस्तर वाचा]

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Oct-2019
Total Views |




कारशेडच्या बांधकामाबाबत कोणतेही निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले नाहीत

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : आरेविषयी एका विद्यार्थ्याने लिहिलेल्या पत्राची दखल आज सकाळी सर्वोच्च न्यायालयाने घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली, अशी माहिती सरसकट पसरवली जाते आहे. आज झालेल्या सुनावणीत सरकारच्या वतीने विधिज्ञ तुषार मेहता यांनीच स्वतःहून त्याबाबतची माहिती न्यायालयाला दिली होती. आणखीन झाडे कापणार नसल्याचे मेहता यांनी सांगितले. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने आरेतील कारशेड प्रकरणाची सुनावणी पर्यावरण खंडपीठासमोर ठेवली आहे.





सर्वोच्च न्यायालयाचा आदेश काळजीपूर्वक वाचल्यास एक गोष्ट लक्षात येते कि, मेट्रो कारशेडच्या बांधकामावर कोणत्याही प्रकारची स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने दिलेली नाही. तसेच "सरकराने आश्वस्त केल्यानुसार पुढील सुनावणी म्हणजेच २१ ऑक्टोबर पर्यंत कोणतीही 'जैसे थे' परिस्थती ठेवण्यात येईल", असे आदेशात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.




सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात झाडे कापण्यासंबंधी 'जैसे थे' परिस्थिती राहील असे म्हटले आहे. याचाच अर्थ कारशेडच्या बांधकामाबाबत कोणतेही निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले नाहीत.

 

@@AUTHORINFO_V1@@