मीरा-भाईंदरमध्ये बंडखोर ‘किंग-मेकर’?

    24-Oct-2019
Total Views | 20



भाईंदर : मुंबईशी संलग्न असणारे शहर म्हणून ओळखल्या जाणार्‍या मीरा-भाईंदर शहरामध्ये भाजपला बंडखोरीचा मोठा फटका बसल्याचे चित्र आहे. विधानसभा निवडणुकीत येथील भाजपच्या बंडखोर उमेदवार आणि मीरा-भाईंदर शहराच्या माजी महापौर गीता जैन यांनी हजारो मतांची आघाडी घेतल्याचे चित्र आहे. २० व्या फेरीनंतर अपक्ष उमेदवार गीता जैन यांना ६०, ४०० मते मिळाली असून भाजपचे विद्यमान आमदार नरेंद्र मेहता पिछाडीवर असल्याचे पहायला मिळत आहे. त्यांना ३९, ३९४ मते मिळाली असून विजयी आघाडीसाठी संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र आहे. तर महाआघाडीचे उमेदवार म्हणून रिंगणात उभे असलेले काँग्रेसचे नेेते मुझफ्फर हुसैन यांना ३५, २४४ मते मिळाली आहेत. त्यामुळे सध्याचे चित्र पाहता मीरा-भाईंदरमध्ये बंडखोर किंगमेकर ठरणार असल्याचे चित्र आहे

अग्रलेख
जरुर वाचा
गिरीश महाजन यांच्यावर आरोप करता, हे योग्य नाही - चंद्रशेखर बावनकुळे यांचा एकनाथ खडसे यांना सल्ला

गिरीश महाजन यांच्यावर आरोप करता, हे योग्य नाही - चंद्रशेखर बावनकुळे यांचा एकनाथ खडसे यांना सल्ला

राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याबाबत एकनाथ खडसेंनी केलेले वक्तव्य हे त्यांचं टार्गेटिंग असून त्यांच्या प्रतिमेला गालबोट लावण्याचा प्रयत्न आहे. फक्त संबंध असल्याचा अर्थ हा गुन्हा केला असे होत नाही. माझेही अनेकांसोबत संबंध आहेत, पण त्याचा अर्थ मी काही गैर केले असे होत नाही. माझा खडसेंना सल्ला आहे,तुम्ही सतत गिरीश महाजन यांच्यावर आरोप करता, हे योग्य नसल्याचे मत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121