'एनसीपीए अॅड आर्ट फेस्टिव्हल’ ची घोषणा; सिम्फनी ऑर्केस्ट्रा ऑफ इंडियाने शुभारंभ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Oct-2019
Total Views |



मुंबई
: अफाट असा आपला ५० वर्षांचा प्रगतीचा टप्पा पार करीत असताना
, भारताची अव्वल सांस्कृतिक संस्था म्हणून लोकमान्य नॅशनल सेंटर फॉर परफॉरमिंग आर्ट्स (एनसीपीए) आपल्या तीन दिवसांच्या भव्य आणि विविधांगी महोत्सवाची म्हणजे एनसीपीए अॅड आर्ट फेस्टिव्हलची घोषणा केली आहे. २९ नोव्हेंबर २०१९ रोजी सुरु होणाऱ्या या एनसीपीए अँड आर्ट फेस्टिव्हल मध्ये नाटक, नृत्य, भारतीय संगीत, पश्चिमी शास्त्रीय संगीत, जाझ, स्टँड-अप कृती, स्क्रीनिंग, कठपुतली, कार्यशाळा आणि इतर अनेक प्रकार सादर केले जातील.

या महोत्सवाच्या निमित्ताने भारताच्या संपन्न आणि दमदार अशा कला वारशाचे जतन आणि प्रसार करण्याची एनसीपीएची पाच देदिप्यमान दशके साजरी केली जाणार आहेत. एनसीपीएचे उदात्त तत्वज्ञान असलेल्या रोजच्या जीवनात कलेची भर घालू याअशा कल्पनेचे प्रतिनिधित्व करणारा हा महोत्सव कला आणि संस्कृती या क्षेत्रांमध्ये एनसीपीएच्या पुढील ५० वर्षांसाठीच्या उपक्रमांची व्याख्या करणारा ठरेल.


३ दिवसांच्या या महोत्सवात एनसीपीए शास्त्रीय ते लोक संगीत ते समकालीन कला ज्यात कलाकारांचा एक मोठा समूह यांच्यासाठी एक संवादी संस्था म्हणून प्रदर्शित होईल. नाटक, संगीत, नृत्य, चित्रपट, दृश्य कला, खाद्य, प्रहसन, कविता आणि छायाचित्रण इत्यादी यामध्ये समाविष्ट असेल. जागतिक दर्जाचे ऑर्केस्ट्रा, नामांकित जाझ कलाकार, भारतीय संगीत आणि नृत्य यामधील सुप्रसिद्ध व्यक्ती, थिएटर सेलिब्रिटी यांच्यापासून कला स्थापना, खाद्य बाग तसेच बुस्किंग ऑन द पेरीफरी यामधून हा भव्य महोत्सव एनसीपीएचा एक तत्वज्ञान आणि स्थळ यासाठी शोध घेईल.

२८ नोव्हेंबर -

सिम्फनी ऑर्केस्ट्रा ऑफ इंडिया एनसीपीए अॅड आर्ट फेस्टिव्हलमहोत्सवाच्या शुभारंभाचा आपला उत्सवी जलसा सादर करतील. संगीत दिग्दर्शक मरात बिसेन्गालीव्ह आणि सह संगीत. दिग्दर्शक झेन दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील गायक वृंद सहभागी होतील. यामध्ये लोकप्रिय समूह गीते, कझाक राज्य ऍकेडमिक थिएटर ऑफ ऑपेरा अँड बॅले यांच्यासोबत ऑर्केस्ट्रा सहभागी होऊन जोहान्न स्ट्रॉस यांचे वाल्ट्झ सादर केले जातील...आणखीही बरेच काही असेल. 

२९ नोव्हेंबर -

मल्लिका साराभाई, अस्ताद देबू, झाकीर खान आणि अमित टंडन यांच्या सारखे दिग्गज कलाकार अपार आनंददायी कार्यक्रम सादर करतील. या दिवसाची खास बात असेल १० वेळा ग्रॅमी पारितोषिक विजेता आणि ६ वेळा बिल बोर्ड पारितोषिक विजेता आर्तुरो सँडोवल यांचे भारतीय प्रीमिअर.

३० नोव्हेंबर एका खास कार्यक्रमाने सुरु होईल. यामध्ये एनसीपीएचे विद्यार्थी एसओआय म्युझिक अॅकेडेमी आणि इंडियन म्युझिक यांचा सहभाग असेल. यापुढे कार्यक्रमांची रेलचेल असेल ज्यात आर्तुरो सँडोवल यांच्यासोबत भारतातील संगीतकार, मराठीतून अभि वाचन, कोम्यून यांच्याकडून स्पोकन वर्ड, आणि आणखी बरेच काही असेल. या दिवशी इगुदेस्मान आणि जू हे ए लिटल नाइटमेअर म्युझिकहा विनोद आणि संगीत यांचा कार्यक्रम सादर करतील. त्यांचे जबरदस्त विनोदी कार्यक्रम यू ट्यूब वर ४५ मिलियन प्रेक्षकांनी पाहिले असून ते आज जगप्रसिद्ध झाले आहेत.

महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी म्हणजे १ डिसेंबर रोजी एक अद्वितीय कार्यक्रम मॉर्न टू डस्कसादर केला जाईल. यामध्ये राशीद खान, झाकीर हुसेन, अदिती मंगल दास, मालविका सरुक्काई, पंडित शिव कुमार शर्मा, पंडित हरिप्रसाद चौरसिया, पंडित बिरजू महाराज, अजोय चक्रवर्ती, आणि इतर अनेक सुप्रसिद्ध भारतीय संगीत आणि नृत्य कलाकार आपली कला सादर करतील. संपूर्ण दिवस चालणारा हा कार्यक्रम सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत चालेल. याच दिवशी एनसीपीएचे नाट्य प्रमुख ब्रूस गुथ्रि यांनी दिग्दर्शित केलेली आणि पारितोषिक विजेते कलाकार जिम सार्भ यांनी सादर केलेली सिमोन स्टीफन्स यांची सी वॉल ही एक नवीन कलाकृती बघायला मिळणार आहे.

आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त रॉयस्टन अबेल यांचे द मँगॅनियर सीडक्शनहे दृक-श्राव्य सादरीकरण महोत्सवाच्या सांगता समारंभात सादर केले जाईल. यामध्ये ४० प्रतिभावान मँगॅनियर संगीत कलाकार, गायक आणि वादक भाग घेतील आणि आपल्याला एका जादुई दुनियेत घेऊन जातील. याशिवाय या महोत्सवात विविध कार्यशाळा, भाषण-प्रात्यक्षिक आणि विविध भाषांमधील पडद्यावरील दृश्यांचे कार्यक्रम तिन्ही दिवस सुरु राहतील.

अद्वितीय अशा कला कामगिरी सोबतच प्रेक्षकांना एनसीपीएच्या आवारात विविध खाद्य प्रकारांचाही अनुभव घेता येईल. या अनुभवामध्ये जगभरातील असामान्य अशा खाद्य पदार्थांची चव घेता येईल. प्रेक्षक वर्गासाठी एनसीपीए अँड आर्ट फेस्टिव्हल हा खरोखरच ३६० अंशांचा अनुभव असेल इतके निश्चित...

@@AUTHORINFO_V1@@