भुसावळमध्ये संजय सावकारे आणि मधु मानवतकर यांच्यात 'काटे की टक्कर'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Oct-2019
Total Views |



भुसावळ : भुसावळ मतदार संघात पारंपारिक राजकीय नेते राखीव मतदार संघ केल्यामुळे बाजूला पडले आणि उमेदवार म्हणून नवीन चेहरे पुढे येऊ लागले. यंदा डॉ. मधु राजेश मानवतकर यांच्या माध्यमातून भुसावळकरांना अजून एक नवीन चेहरा पाहायला मिळाला आहे. तेथील भाजपचे विद्यमान आमदार संजय सावकारे यांच्यासमोर अपक्ष उमेदवार उभा आहे.  

 

निवडणुकीचे पडघम पडू लागताच डॉ. मानवतकर यांनी प्रथम भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले होते. परंतु, भाजपतर्फे विद्यमान आमदार संजय सावकारे यांनाच कायम ठेवत त्यांना तिकीट दिले. या परिस्थितीत डॉ. मधु मानवतकर यांनी बंड करत अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. याचवेळी भुसावळचे राष्ट्रवादी पक्षाचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी डॉ. मानवतकर यांना पाठींबा दर्शविला आणि त्यांची साहजिकच ताकद वाढली.

भुसावळ मतदार संघात एकूण बारा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असूनही खरी लढत आमदार संजय सावकारे आणि डॉ. मधु मानवतकर यांच्यातच असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार जगन सोनवणे एकटेच लढा देत असून राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते डॉ. मानवतकर यांच्यासोबतच प्रचारात दिसून येत आहे. 

 

डॉक्टर म्हणून माझी समाजासोबत नाळ जुळली आहे;  त्यामुळे जनता मला कौल देईल, असा विश्वास डॉ. मधु मानवतकर व्यक्त करतात. आमदार संजय सावकारे यंदा निवडून आल्यास त्यांची आमदारकीच्या टर्मची हॅटट्रिक ठरेल. आमदार सावकारे यांनीही प्रचाराचे जोरदार रणशिंग फुंगले आहे. त्यामुळे दोन्ही उमेदवार प्रबळ दावेदार असल्याने इथे काटे की टक्कर मानली जात आहे. 

@@AUTHORINFO_V1@@