आता काजोल झळकणार या नेटफ्लिक्स सिरीजमध्ये

    16-Oct-2019
Total Views | 27



बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री काजोल हिने आत्तापर्यंत अनेक भूमिकांमधून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. मात्र आता बदलत्या काळानुसार बदलत्या माध्यमांमध्ये चित्रपटसृष्टीचा कल वळताना दिसत असताना काजोल सुद्धा आता नेटफ्लिक्स च्या सिरीजमध्ये म्हणजेच डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये पदार्पण करत आहे.
'त्रिभंग' असे तिच्या आगामी नेटफ्लिक्स सीरिजचे नाव असून याविषयी इंस्टाग्रामवरून तिने तिच्या चाहत्यांना याविषयी माहिती दिली.

'त्रिभंग' च्या चित्रीकरणाला सुद्धा सुरुवात झाली असून अजय देवगण चे निर्मिती साहाय्य या सीरिजला असणार आहे. ही सिरीज एका दुभंगलेल्या कुटुंबाच्या कथेवर आधारित आहे. या सिरीजमध्ये काजोल बरोबरच सध्याची आघाडीची स्टार मिथिला पालकर आणि तन्वी आझमी या देखील महत्वाच्या भूमिका साकारणार आहेत. विशेष म्हणजे या सीरिजचे दिग्दर्शन रेणुका शहाणे करणार आहेत.

दरम्यान या पूर्वी 'हेलिकॉप्टर ईला' या चित्रपटामधून देखील काजोल एका कौटुंबीक भूमिकेतून लोकांसमोर आली होती आता पुन्हा एकदा तिचे एक नवीन रूप या सिरीजमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळेल. त्याचबरोबर आगामी काळात काजोल 'तान्हाजी' या चरित्रात्मक चित्रपटामध्ये सैफ अली खान आणि अजय देवगण यांच्याबरोबर काम करणार आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
मोतीलाल नगर वसाहतीच्या पुनर्विकास प्रकल्पाला गती

मोतीलाल नगर वसाहतीच्या पुनर्विकास प्रकल्पाला गती

म्हाडा व अदानी समूह यांच्यात प्रकल्प अंमलबजावणीसाठी करार १६०० चौरस फुटांच्या अत्याधुनिक सदनिकेत रहिवाशांचे होणार पुनर्वसन गोरेगाव (पश्चिम) येथील मोतीलाल नगर १, २ व ३ या म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकास प्रकल्पाला गती मिळाली असून महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण आणि कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आलेल्या अदाणी समूह यांच्यात मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी सोमवार,दि.७ रोजी करार करण्यात आला.म्हाडा मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला 'म्हाडा'चे उपाध्यक्..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121