राजघाटावर दिग्गजांचे महात्मा गांधी यांना अभिवादन

    30-Jan-2019
Total Views | 56


 


नवी दिल्ली : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची बुधवारी पुण्यतिथी. यानिमित्ताने अनेकांनी दिल्लीतील राजघाट येथे जाऊन बापूंना अभिवादन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेकांनी याठिकाणी भेट देऊन महात्मा गांधींना अभिवादन केले.

 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राजघाट येते उपस्थित राहत महात्मा गांधींना अभिवादन केले. संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण आणि लष्करप्रमुख बिपिन रावत यांनीही राजघाट येथे उपस्थिती लावली. उपराष्ट्रपती वंकय्या नायडू यांनीही बापूंना अभिवादन करण्यासाठी राजघाट येथे हजेरी लावली. महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरत आणि दांडी दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान मोदी दांडी याठिकाणी राष्ट्रीय मीठ सत्याग्रह स्मारकाचेही उद्घाटन करणार आहेत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

अग्रलेख
जरुर वाचा
मुंबई शिक्षक विकास मंडळाचे महायुवा संमेलन उत्साहात संपन्न!

मुंबई शिक्षक विकास मंडळाचे महायुवा संमेलन उत्साहात संपन्न!

मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहात दि. २८ मे रोजी मुंबई शहर शिक्षक मंडळाचे महायुवा संमेलन अत्यंत उत्साहात पार पडले. सदर कार्यक्रमात आमदार प्रवीण दरेकर यांनी युवा शिक्षकांना मार्गदर्शन केले. या महासंमेलनात १६०० हून अधिक शिक्षक सहभागी झाले होते. शिक्षकांच्या विविध समस्या, मार्गदर्शनपार सत्रांचे आयोजन यावेळी करण्यात आले होते. दैनिक मुंबई तरुण भारतचे संपादक किरण शेलार यांच्या मार्गदर्शनातून साकारलेल्या या महायुवा संमेलनाचे आयोजन मुंबई शहर शिक्षक विकास मंडळाचे कार्यकारिणी सदस्य विशाल कडणे यांच्या नेतृत्वात करण्यात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121