ठाकरे सिनेमाचे पोस्टर न लावल्याने शिवसैनिकांचा राडा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jan-2019
Total Views |


नवी मुंबई : वाशी आयनॉक्स थिएटरामध्ये शुक्रवारी सकाळी शिवसैनिकांनी गोंधळ घातला असून बहुचर्चित ठाकरे चित्रपटाचे पोस्टर्स थिएटर मालकाने लावले नसल्याने शिवसैनिकांनी सकाळी आठ वाजता आयनॉक्स थिएटरमध्ये गोंधळ घातला.

 

बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद अशा घोषणा देत शिवसैनिकांनी थिएटरमध्ये सुरू असलेला चित्रपटाचा शो बंद पाला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ठाकरेचित्रपट शुक्रवारी संपूर्ण देशभर प्रदर्शित करण्यात येणार आहे. बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्रातील राजकारण आणि कला क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तीमत्व असल्याने त्यांच्या चित्रपटाचीही जोरदार चर्चा आहे.

 

चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी शिवसैनिकांना पोस्टर लावण्यावरुन आंदोनल कारावे लागले आहे. वाशीच्या आयनॉक्स थिएटरामध्ये चित्रपटाचे पोस्टर लावले नसल्याने थिएटरच्या परिसरात आज सकाळी शिवसैनिकांनी गोंधळ घातला. यावेळी बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद, अशा घोषणा देण्यात आल्या.

 

ठाकरे या चित्रपटासह कंगना रणौचा बहुप्रतीक्षित मणिकर्णिका हा चित्रपटही प्रदर्शित होत आहे. त्यामुळे दोन्ही चित्रपट निर्मात्यांचा जास्तीत जास्त थिएटर मिळवण्याचा प्रयत्न आहे. ठाकरे चित्रपटाची निर्मिती शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी तर चित्रपटांचे दिग्दर्शन अभिजीत पानसे यांनी केले आहे. चित्रपटात बाळासाहेब ठाकरे यांची भुमिका नवाजुद्दीन सिद्दीकीने साकरली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@