शरीरात पोहणारा रोबोट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jan-2019   
Total Views |
 
 
 
आरोग्याच्या म्हणजेच मेडिकल क्षेत्रासाठी फायदेशीर ठरेल, असे एक संशोधन प्रसिद्ध झाले. मानवी कार्ये अधिकाधिक सुटसुटीत व सोप्या पद्धतीने कशी पूर्ण केली जाऊ शकतील, या उद्देशाने शास्त्रज्ञांची धडपड सतत चालूच असते. याच मालिकेत शास्त्रज्ञांनी एक मोठे यश मिळवले आहे. शास्त्रज्ञांनी एक असा छोटासा, स्मार्ट रोबोट विकसित केला आहे, जो रक्तवाहिन्यांमध्ये पोहू शकतो.
 

मानवी विकासाच्या अन् प्रगतीच्या टप्प्यात विज्ञान-तंत्रज्ञानाचा वाटा प्रचंड आहे. प्रबोधनकाळापासून सुरू झालेला विज्ञानाचा आज मोठा वटवृक्ष झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते. वटवृक्षाच्या पारंब्या तशा सर्वदूर पसरलेल्या असतातच, पण त्या एकाच वृक्षाशी जोडलेल्याही असतात. विज्ञानाच्या निरनिराळ्या मूलभूत शाखा आणि पुढे याच शाखांच्या उपशाखा, उपशाखांच्या उपशाखा असा प्रवास अशाच पद्धतीने झाल्याचे दिसते. आताचे युग या उपशाखांच्या अभ्यासाचे, संशोधनाचे तर आहेच, पण दोन वा तीन उपशाखांच्या परस्पर सहकार्याचे, सहयोगाचेही आहे. म्हणूनच कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीचा वापर मेडिकल क्षेत्रात केला जातो, तशीच इतरही अनेकानेक क्षेत्रे एकमेकांच्या हातात हात गुंफून काम करताना दिसतात. यातीलच एक क्षेत्र म्हणजे नॅनो टेक्नॉलॉजी.

 

२९ डिसेंबर, १९५९ रोजी रिचर्ड फेनमॅन यांनी अमेरिकन फिजिकल सोसायटीच्या परिषदेवेळी सर्वप्रथम या संकल्पनेचा वापर केला. तेव्हापासून ६० वर्षांचा विचार करता नॅनो टेक्नॉलॉजीने कित्येक क्षेत्रांत प्रवेश केला. आरोग्य, संरक्षण, आर्थिक, शैक्षणिक अशा प्रत्येक ठिकाणी नॅनो टेक्नॉलॉजीच्या वापरातून साकारलेले आविष्कार पाहायला मिळतात. नॅनो टेक्नॉलॉजीचा आरोग्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वापर होत आला व होतही आहे. शरीराच्या आतील भागावरील, अवयवयांवरील, किचकट, कठीण आणि वेळखाऊ शस्त्रक्रिया, तपासणी करण्यासाठीही नॅनो टेक्नॉलॉजीचा उपयोग केला जातो. नुकतेच आरोग्याच्या म्हणजेच मेडिकल क्षेत्रासाठी फायदेशीर ठरेल, असे एक संशोधन प्रसिद्ध झाले. मानवी कार्ये अधिकाधिक सुटसुटीत व सोप्या पद्धतीने कशी पूर्ण केली जाऊ शकतील, या उद्देशाने शास्त्रज्ञांची धडपड सतत चालूच असते. याच मालिकेत शास्त्रज्ञांनी एक मोठे यश मिळवले आहे. शास्त्रज्ञांनी एक असा छोटासा, स्मार्ट रोबोट विकसित केला आहे, जो रक्तवाहिन्यांमध्ये पोहू शकतो.

 

शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, या रोबोटच्या साह्याने भविष्यात रुग्णांच्या पेशी-उतींपर्यंत थेट औषधपुरवठा करता येईल. स्वित्झर्लंडच्या स्विस फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी लॉजेन (ईपीएफएल) आणि इटीएत झुरिच या संस्थांतील संशोधकांनी जीवाणूंकडून याची प्रेरणा घेतली व हा अतिशय लवचिक बायोकम्पॅटिबल मायक्रो-रोबोट तयार केला. पेशी-उतींपर्यंत सरळ औषधे पोहोचविल्यामुळे रुग्णांच्या उपचारात सुलभता येईल, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. शास्त्रज्ञांनी हा इतका चिमुकला रोबोट कसा तयार केला? या छोट्याशा रोबोटला तयार करणाऱ्या शास्त्रज्ञांनी सांगितले की, या इवल्याशा उपकरणाला हायड्रोजेल नॅनोकम्पोझिटपासून तयार करण्यात आले आहे, ज्यात चुंबकीय नॅनो पार्टिकल्स असतात. शास्त्रज्ञांनी याबाबत माहिती दिली की, चुंबकीय नॅनो पार्टिकल्समुळे त्यांना विद्युत चुंबकीय क्षेत्राच्या माध्यमातून नियंत्रित करता येईल.

 

‘सायन्स अ‍ॅडव्हान्सेस’ नावाच्या एका नियतकालिकात या संशोधनाबद्दल विस्ताराने माहिती देण्यात आली आहे. हा रोबोट नेमका कशाप्रकारे आपला मार्ग शोधून रोगग्रस्त पेशी-उतींपर्यंत पोहोचेल, याची माहिती यात देण्यात आली आहे. मानवी शरीरातील तरल आणि द्रवपदार्थांच्या माध्यमातून हा रोबोट कशाप्रकारे पोहू शकतो आणि गरजेनुसार आपला आकार कसा बदलू शकतो, याची माहितीही या लेखात दिली आहे. म्हणजेच हा आकार बदलणारा रोबोट मानवी शरीरात गेला की, कुठेही अडकणार नाही!! आकार बदलण्याच्या या वैशिष्ट्यामुळेच हा रोबोट रक्तवाहिन्यांत मुक्त संचार करू शकतो आणि आवश्यक असेल तितक्या वेगानेही. या रोबोटच्या आकाराला एका विशेष प्रयोगाच्या साह्याने तयार करण्यात आले आहे, जेणेकरून सुलभपणे तरल पदार्थांच्या माध्यमातून त्याच पेशी-उतींपर्यंत औषधे पोहोचवता येतील जिथे गरज आहे.

ईपीएफएलच्या सेल्मॅन साकार यांच्यानुसार या रोबोटला फक्त त्याला नेमके कुठे जायचे म्हणजेच निश्चित लक्ष्याचे माहिती द्यावी लागते. नंतर मात्र हा रोबोट आपल्या क्षमतेनेच पुढचा प्रवास करतो. वैद्यकीय क्षेत्राच्या दृष्टीने हे संशोधन महत्त्वपूर्ण ठरते. कारण, बऱ्याचदा आपण जी औषधे घेतो, ती एकतर तोंडाने गिळतो किंवा इंजेक्शनच्या साह्याने ती टोचली जातात. या औषधांचा प्रवास मग सर्वत्रच होतो. पण या नव्या संशोधनामुळे नेमक्या ठिकाणी औषध पोहोचेल व रुग्णाला लवकर फरकही पडेल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@