‘ती & ती’ सिनेमाचे मोशन पोस्टर प्रदर्शित

    15-Jan-2019
Total Views | 31

 

 
 
 
 
मुंबई : अभिनेता पुष्कर जोग याच्या ‘ती & ती’ सिनेमाचे मोशन पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले. पुष्कर जोग, प्रार्थना बेहरे आणि सोनाली कुलकर्णी या कलाकारांच्या या सिनेमामध्ये प्रमुख भूमिका आहेत. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी ‘ती & ती’ सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. दिग्दर्शिका म्हणून मृणाल कुलकर्णी यांचा हा तिसरा सिनेमा आहे.
 
 
 
 
 

पुष्कर, सोनाली आणि प्रार्थना यांच्यातील प्रेमाचा त्रिकोण या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या सिनेमाचे बहुतांश चित्रिकरण हे लंडनमध्ये झाले आहे. येत्या १ मार्च रोजी ‘ती & ती’ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच पुष्कर, सोनाली आणि प्रार्थना हे तिघेजण एकत्र काम करत आहेत. मराठी सिनेसृष्टीमध्ये सातत्याने नवनवीन प्रयोग होत आहेत. ‘ती & ती’ हा सिनेमा नक्कीच आपले वेगळेपण सिद्ध करेल. असे या सिनेमातील कलाकारांचे म्हणणे आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121