बेस्ट संप मिटण्याची शक्यता

    14-Jan-2019
Total Views | 26

 

 
 
 
 
मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर सरकार लवकरच तोडगा काढणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गेल्या सात दिवसांपासून मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. बेस्टच्या कृती समितीचे शशांक राव आणि राज्य सरकारच्या उच्च स्तरीय समितीची सोमवारी सकाळी बैठक झाली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती शशांकराव यांनी दिली आहे.
 

आता ही उच्च स्तरीय समिती बेस्ट बाबतचा आपला अहवाल उच्च न्यायालयात सादर करणार आहे. तसेच पालिकेत बेस्टचे विलीनीकरण करायचे की नाही, याबाबत राज्य सरकार निर्णय घेईल. असे आश्वासन उच्च स्तरीय समितीकडून बेस्ट कृती समितीला देण्यात आले. एकीकडे मंत्रालयामध्ये ही बैठक पार पडली. तर दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी दाखल झाले.

 

मनसेने आक्रमक पवित्रा घेत कोस्टल रोडचे काम बंद पाडले. बेस्टच्या संपावर तोडगा निघत नाही तोपर्यंत कोस्टल रोडचे काम सुरु होऊ देणार नाही. अशी भूमिका मनसेने घेतली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बैठकीला विशेष महत्त्व आले आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेस्ट संपाबाबत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली असल्याचे सांगण्यात येत आहे. बेस्ट संप लवकरात लवकर मिटविण्यासाठी राज्य सरकार आणि शिवसेनेकडूनही सकारात्मक संकेत मिळत आहेत. उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडेही सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे संक्रांतीच्या मुहूर्तावर राज्य सरकार बेस्ट कर्मचाऱ्यांचे तोंड गोड करणार, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
अग्रलेख
जरुर वाचा
हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून ‘फेक नरेटिव्ह’ - कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण; भाजप नेत्यांनी केली उबाठा-मनसे मोर्चामागील ‘राजकारणा’ची पोलखोल

हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून ‘फेक नरेटिव्ह’ - कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण; भाजप नेत्यांनी केली उबाठा-मनसे मोर्चामागील ‘राजकारणा’ची पोलखोल

“हिंदी सक्तीच्या मुद्दयावरून राज्यात फेक नरेटिव्ह निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, यासंदर्भातील वस्तुस्थिती जनमानसात आता पोहचत आहे. कारण कोणतीच बाब लपलेली नाही, कागदावरील सर्व बाबी उघड होत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळातच त्रिभाषा धोरणाच्या पद्धतीला मान्यता देण्यात आली होती. उलट तेव्हा असलेला ‘अनिवार्य’ हा शब्द हटवून हिंदीची सक्ती या सरकारने काढून टाकली आहे. त्यामुळे खरेतर फडणवीस सरकारचे ठाकरेंनी अभिनंदन केले पाहिजे”, असा टोला भाजप प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121