१५० मीटर हद्दीचे बंधन असताना डोंबिवली प्रवेशद्वारावर येणाऱ्या सर्वांचे बिनचूक लक्ष वेधणारी फेरीवाल्यांची गर्दी पदचार्यांसाठी दुखणं बनली आहे . या फेरीवाल्यानं दिखाव्याची कारवाई होत होती मात्र तरी सुद्धा त्यांच्या साठी व्यवस्थित बाजारपेठ नसल्या कारणाने हे फेरीवाले वारंवार रेल्वे पूल,रस्ते,फूटपाथ वावरताना दिसतात . दरम्यान करावाई करून सुद्धा केडीएमसीने न्यायालयाचा अवमान केल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र आता लोकप्रतिनिधीच्या फेरीवाला हटविण्याची मागण्या जोर धरू लागल्याने तसेच राजकीय पदाधिकाऱ्यांच्या निर्देशामुळे ही कारवाई सातत्याने होऊ लागली आहे . या कारवाई अंतर्गत राथ रोड ,पाटकर रोड मोकळे करण्यात येत आहे . मात्र पालिकेची कर्मचारी दिसेपर्यंत या फेरीवाल्यां मार्फत समान या परिसरातील दुकान दारांकडे व इमारतींच्या आडोशाला ठेऊन नंतर याच ठिकाणी घोळका करून बसून अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची पाठ फिरताच पुन्हा चित्र जैसे थे दिसून येते