शिंदखेडा, २० जुलै :
सर्पमित्रांचे योगदान समाजासाठी महत्त्वाचे आहे, असे गौरवोद्गार शिंदखेड्याचे तहसीलदार सुदाम महाजन यांनी व्यक्त केले. शुक्रवारी जागतिक सर्प दिनानिमित्त सर्पमित्र सागर माळी यांचा तहसील कार्यालयात सत्कार करण्यात आला.
तहसीलदार सुदाम महाजन म्हणाले की, समाजात सापांविषयी फार भीती आहे, परंतु साप हा शेतकर्यांचा मित्र असून उंदीर, बेडकाला भक्ष्य बनवून शेतकर्यांना मदत करण्याचे काम करीत असते. परंतु समाजात सापांविषयी अनेक गैरसमज आहेत. या सर्प मित्रांमुळे सर्प पकडून गावाबाहेर जंगलात सोडून देण्याचे काम सर्पमित्र करीत आहेत. सदरचे काम वाखाणण्याजोगे असून कुठलेही आर्थिक बाबीची मागणी न करता स्वयंप्रेरणेने आपला जीव धोक्यात घालून साप पकडण्याचे काम करीत आहे. अशा सर्पमित्रांचा सत्कार करून त्यांचा पुढील कार्यास निश्चितच प्रेरणा मिळेल असे आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलत होते. यावेळी सर्पमित्र सागर माळी यांचा तहसीलदार सुदाम महाजन यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.