मुंबई : ग्राहकांना ऑनलाईन माध्यमाद्वारे आपल्या वीजदेयकाचा भरणा सुलभतेने करता यावा, यासाठी क्रेडिट कार्डचा अपवाद वगळता, नेट बँकिंग, डिजिटल वॉलेट, कॅशकार्ड डेबिटकार्ड व युपीआय पद्धतीने वीजदेयकाचा भरणा केल्यास महावितरणने अशा ग्राहकांना ही सेवा नि:शुल्क देण्याचा निर्णय घेतला आहे. महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळाद्वारे (www.mahadiscom.in ) व महावितरणच्या मोबाईल अॅपद्वारे ग्राहकांना ऑनलाईन भरणा करता येणार आहे.
ऑनलाईन वीजदेयकाचा भरणा करताना केवळ क्रेडिट कार्डद्वारे भरणा केल्यास ग्राहकांना शुल्क आकारण्यात येणार आहे. तसेच उर्वरित इतर सर्व पद्धतींनी (नेट बँकिंग, युपीआय, डेबिट कार्ड, डिजिटल वॉलेट, कॅशकार्ड) वीजदेयकाचा भरणा केल्यास ग्राहकांना कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. ऑनलाईन पद्धतीने भरणा केल्यास ग्राहकास त्याच्या नोंदणीकृत मोबाईलवर एसएमएसद्वारे त्वरित मिळणार आहे.