नितीन गडकरींच्या हस्ते शिवसृष्टीला ५ कोटींचा धनादेश प्रदान

    12-May-2018
Total Views | 23
 
 
 
 
 
 
पुणे : पुण्यातील आंबेगाव येथे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या शिवसृष्टीला केंद्र सरकारकडून ५ कोटींची मदत जाहीर झाली आहे. आज पुण्यातील ‘सर्किट हाउस’ येथे झालेल्या कार्यक्रमात नितीन गडकरींच्या हस्ते ५ कोटींचा धनादेश बाबासाहेब पुरंदरे यांच्या हाती सुपूर्द करण्यात आला. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील देखील उपस्थित होते. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (JNPT) च्या सी.एस.आर. निधीतून ही मदत केली जाणार आहे. याचबरोबर वडगाव ते कात्रज चौक या उड्डाण पुल उभारणीसाठी १३५ कोटी, कात्रज येथील शिवसृष्टी मार्गे जाणा-या राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरी रुंदीकरण करण्यात येणार असून या रस्त्यासाठी ११६ कोटी रुपये खर्च करण्याची घोषणा नितीन गडकरी यांनी केली.
 
 
 
 
 
 
 
या कार्यक्रमाला राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, आमदार माधुरी मिसाळ, आमदार जगदीश मुळीक, मुरलीधर मोहोळ, श्रीनाथ भिमाले, इतिहासकार पांडुरंगराव बलकवडे शिवसृष्टीचे अरविंदराव खळदकर, अनिल पवार, जगदीश कदम यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.
 
 
 
 
 
पुणे महापालिकेची देखील शिवसृष्टी प्रस्तावित आहे. याबद्दल प्रश्न विचारला असता बाबासाहेब पुरंदरे म्हणाले जगातील सर्वश्रेष्ठ मानव असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील एकेका प्रसंगावर तीन तासांचा चित्रपट अथवा नाटक होऊ शकते. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनचरित्र उभे करण्यासाठी आमची १९ एकरावरील शिवसृष्टी देखील अपुरीच आहे असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
शेतमजुराचा मुलगा ते आंतरराष्ट्रीय दिग्दर्शक!

शेतमजुराचा मुलगा ते आंतरराष्ट्रीय दिग्दर्शक!

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०५व्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे दिला जाणारा ‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार’ आंतरराष्ट्रीय युवा दिग्दर्शक रमेश होलबोले यांना प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय आणि मराठीतील आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या शुभहस्ते, ‘दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज’ (डिक्की)चे संस्थापक ‘पद्मश्री’ डॉ. मिलिंद कांबळे व ‘अखिल भारतीय होलार समाज संघटने’चे संस्थापक व समाज नेते अ‍ॅड. एकनाथ जावीर यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे. कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121