बॅंक कर्मचाऱ्यांचा संप; ग्राहक वेठीस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Dec-2018
Total Views |

मुंबई : विजया बॅंक, देना बॅंक आणि बॅंक ऑफ बडोदा या बॅंकांच्या विलिनीकरणाला विरोध करत सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक कर्मचारी बुधवारीही संपावर गेल्याने बँकिंग व्यवस्था ठप्प झाली. २१ डिसेंबरपासून सातत्याने संप, शनिवार-रविवारची सलग सुट्टी नाताळ आदी सुट्ट्या आल्याने बँकिंग सेवांवर ताण निर्माण झाला आहे. विशेषतः सार्वजनिक बँकांवर अवलंबून असलेल्या ग्रामीण भारताला याचा मोठा फटका बसत आहे.

 

विलीनीकरणाच्या विरोधात युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियन्सच्या नैतृत्वाखालील नऊ संघटनांनी हा संप पुकारला. याआधी अतिरिक्त मनुष्यबळ आयुक्ताबरोबर या संघटनांची झालेली बैठक निष्फळ ठरली होती. बॅंकांचे विलीनीकरण करून प्रश्न सुटणार नाहीत, असे बॅंक कर्मचारी संघटनांचे म्हणणे आहे.

 

कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भातही या संघटनांच्या मागण्या आहेत. आठवडाभराच्या आत बॅंकांचा हा दुसरा संप असणार आहे. युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियन्स ही बॅंक कर्मचारी संघटनांची प्रमुख संघटना आहे. या संघटनेअंतर्गत नऊ वेगवेगळ्या बॅंक संघटना येतात. सुमारे १० लाख अधिकारी आणि कर्मचारी या संघटनेचे सदस्य आहेत.

 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ 
@@AUTHORINFO_V1@@