चोरी केलेल्या १५ दुचाकी सापडल्या विहिरीत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Dec-2018
Total Views |

 


 
 
शिर्डी : अहमदनगरमधील कळस या गावात चोरीचा एक अजब प्रकार समोर आला आहे. या गावातील एका विहिरीत चोरीला गेलेल्या १५ दुचाकी सापडल्या आहेत. विहिरीतील पाण्याला ऑईलचा तवंग आल्यामुळे संशय आल्याने या विहिरीत गळ टाकण्यात आला. विहिरीत टाकलेल्या गळाला दुचाकी लागल्या. त्या दुचाकी विहिरीतून वर काढण्यात आल्या. आतापर्यंत या विहिरीतून तब्बल १५ दुचाकी बाहेर काढण्यात आल्या असून अजूनही काही दुचाकी या विहिरीत असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
 

अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील कळस हा प्रकार घडला आहे. गावातील प्रवरा नदीच्या जवळ ही जुनी पिण्याच्या पाण्याची विहिर आहे. या विहिरीतील पाण्याला ऑईलचा तवंग आल्याचे पाहून गावकऱ्यांनी याबाबत पोलीसांना कळवले. त्यानंतर विहिरीत गळ टाकण्यात आला आणि या दुचाकी बाहेर काढण्यात आल्या. या विहिरीत पाण्याचा साठा जास्त असल्याने आता पंप लावून विहिरीतून पाणी बाहेर काढले जाणार आहे. त्यानंतर अजून किती दुचाकी या विहिरीत आहेत. याबाबत कळेल. आतापर्यंत या विहिरीतून बाहेर काढण्यात आलेल्या दुचाकी या दीड-दोन वर्षांपूर्वी अकोले आणि संगमनेर या तालुक्यातून चोरीला गेल्या होत्या. चोरांनी या दुचाकी गाड्यांचे काही पार्ट्स काढून घेतले आणि दुचाकी विहिरीत टाकल्या. हा प्रकार उघडकीस आला असून आता या चोरांना पकडण्याचे आव्हान पोलीसांपुढे आहे. त्या परिसरातील इतर विहिरींमध्येदेखील दुचाकी टाकल्या आहेत का? याचा तपास सध्या पोलीस घेत आहेत.

 
 
       माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@