कॉपी करता यावी म्हणून भरारी पथकावर दगडफेक

    15-Mar-2023
Total Views |
copy free campaign

पाथर्डी : "विद्यार्थ्यांना कॉपी करू द्या!", म्हणत पार्थडीत पथकावर दगडफेक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बुधवारी दुपारी साडेबारा वाजता परीक्षा सुरू असताना हा प्रकार घडला. कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत बैठ्या पथकांचा सामावेश परीक्षा केंद्राबाहेर करण्यात आला आहे. या अंतर्गत परीक्षा सुरू असताना विद्यार्थ्यांवर कडक पहारा दिला जातो. कॉपीसारखे गैरप्रकार टाळावेत तसेच विद्यार्थ्यांना वर्गाबाहेरून कुणी कॉपी करण्यासाठी प्रोत्साहन देऊ नये, यासाठीही विशेष दखल घेतली जाते.

पाथर्डीतील दहावीच्या परीक्षेवेळी बैठ्या पथकावर दगडफेक करण्यात आली. एका जमावाने विद्यार्थ्यांना कॉपी करू द्या म्हणत दगडफेक केली आहे. शिक्षण अधिकाऱ्यांनी या प्रकाराला विरोध केल्यानंतर ही दगडफेक झाली. या प्रकारात कर्मचाऱ्याच्या नाकाला जबर दुखापत झाली आहे. त्याला उपजिल्हा रुग्णालयात कर्मचारी उपचार घेत आहे. पोलीसांनी या संदर्भात अद्याप गुन्हा दाखल केला नाही, अशी प्रार्थमिक बातमी आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.