‘दिवाळीचा हा सण देशवासियांसाठी सुख आणि समृद्धी आणो. माझी इच्छा आहे की दिव्यांच्या या तेजोमय प्रकाशाने देशातील प्रत्येक घर आणि कुटुंब उजळून निघावे. तसेच दिव्यांचा हा प्रकाश जगभरात पसरावा.’ अशा शब्दांत देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशभरातील जनतेला दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान मोदींनीही देशातील नागरिकांनी ट्विटरद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. ‘सर्व देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा! माझी इच्छा आहे की प्रकाशाचा हा पवित्र उत्सव सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी आणो.’असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/