चार विद्यापीठांचा बाद फेरीत विजय

    21-Nov-2018
Total Views | 27

 
जळगाव
पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ खो-खो (महिला) स्पर्धेच्या दुसर्‍या दिवशी पहिल्या सत्रात महाराष्ट्रातील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद आणि सोलापूर विद्यापीठ या 4 विद्यापीठांनी बाद फेरीत विजय प्राप्त केले.
 
मंगळवारी सौराष्ट्र विद्यापीठ राजकोटने देवी अहिल्याबाई विद्यापीठ इंदूरचा 1 डाव 8 गुणांनी (12-4) पराभव केला. सौराष्ट्रच्या अमृताबेन गोहिल हिने पाच गडी बाद करताना 5.20 मिनिटे संरक्षणात्मक खेळ केला तर निधी बोरसेने पहिल्या डावात 1.40 व दुसर्‍या डावात 330 मिनिटे खेळ केला.
 
देवी अहिल्याबाई विद्यापीठाच्या रितिका दुबेने 4 मिनिटे खेळ करत एक गडी बाद केला. याच गटात दुसर्‍या झालेल्या सामन्यात महर्षी दयानंद सरस्वती विद्यापीठ, अजमेरने ज्योती महिला विद्यापीठ, जयपूरवर 1 डाव 14 गुणांनी (17-9) असा एकतर्फी विजय मिळवला.
 
महर्षी दयानंदच्या शिल्पा बस्तीने 7.30 मिनिटांचा उत्तम खेळ केला तर बबिता पांडेने 5.40 मिनिटे खेळ केला. पूजा रायरे ही दोन मिनिटे खेळली आणि पाच गडी बाद केले.
 
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने विक्रम विद्यापीठ, उज्जैनचा पूर्वा पावडे, श्रद्धा बोडिले आणि पायल जाधव या खेळाडूंच्या उत्तम खेळीने 1 डाव 9 गुणांनी (15-6) पराभव केला. पूर्वा पावडे ही 2.30 मिनिटे खेळली व पाच गडी बाद केले.
 
ब गटात बरकतुल्लाह विद्यापीठ भोपाळने सरदार पटेल विद्यापीठ, वल्लभनगर, गुजरातचा 1 डाव 1 गुणाने (11-10) पराभव केला. नौना जौन हिने पहिल्या डावात 2.30 मिनिटे खेळ केला व पाच गडी बाद केले.
 
रितिका सलोरिया व अंकिता विश्वकर्मा यांनीदेखील उत्तम खेळ केला. दुसर्‍या सामन्यात गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या संघाला वीर नर्मद दक्षिण गुजरात विद्यापीठ, सुरत यांच्याकडून 1 डाव 10 गुणांनी (3-13) पराभूत व्हावे लागले.
 
वीर नर्मदच्या ओपिना भिलार व प्रियंका पटेल यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. या गटातील अन्य सामन्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने महाराजा कृणककुमारसिंहजी भावनगर विद्यापीठावर 1 डाव 13 गुणांनी (19-6)मात केली.
 
नागपूरच्या दिशा शिंदे व मृणाली कृणाल यांनी प्रत्येकी 2.40 मिनिटे खेळ करून 2 गडी बाद केले. क गटात जय नारायण व्यास विद्यापीठ जोधपूर या संघाला पं. दीनदयाल उपाध्याय शेखावती विद्यापीठ, सिकर यांच्याकडून 1 डाव 4 गुणांनी (1-5) पराभूत व्हावे लागले.
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121