पाचोरा -
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नगरपरिषद संचलित गांधी सार्वजनिक वाचनालयच्या विद्यमाने 19 ते 24 नोव्हेंबर पर्यंत रात्री 8 वाजेपासून हुतात्मा स्मारकाच्या प्रांगणावर शारदीय व्याख्यान माला आयोजित करण्यात आली आहे.
व्याख्यान मालेत वेगवेगळ्या विषयांवर प्रमुख वक्ते व्याख्यान करून मार्गदर्शन करणार आहेत या व्याख्यान मालेस नगराध्यक्ष संजय गोहिल, उपनगराध्यक्ष शरद पाटे, शिक्षण सभापती अस्मिता भालेराव, आरोग्य सभापती अशोक मोरे, सभापती धर्मेंद्र चौधरी, निलिमा शरद पाटील, हाजराबी रहेमान तडवी, संगीता आनंद पगारे, सुनीता किशोर पाटील, मुख्याधिकारी सोमनाथ आढाव, उपमुख्याधिकारी राजेंद्र पाटील, प्रशासकीय अधिकारी प्रकाश भोसले, ललित सोनार, शाम ढवळे, गजानन पाटील उपस्थित राहणार आहे.
19 रोजी रात्री 8 वा. डॉ गणेश चंदनशिवे आणि सहकारी (मुंबई)हे लोककलेतून सादरीकरण समाज प्रबोधन, 20 रोजी मोहम्मद अनस (अलाहाबाद), 21 रोजी अशोक देशमुख (पुणे) हे हसत खेळत तणाव मुक्त, 22 रोजी सुंदर मालेगावी,23 रोजी गीता उपासनी (पुणे) आजच्या काळात शिवचरित्राची आवश्यकता, 24 प्रा. देविदास घोडेस्वार (नागपूर) हे संविधान निर्मिती प्रक्रिया या विषयावर व्याख्याने होणार आहे.
व्याख्यान मालेचा शहरातील नागरिकांनी, रसिकांनी उपस्थित राहून व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजन समितीतर्फे करण्यात आले आहे.