सामाजिक सेवाभावासोबतच प्रामाणिक, पारदर्शी व्यवहार

    19-Nov-2018
Total Views | 46

चाळीसगावची ‘जनसेवा पतपेढी’ देतेय गरजूंंना मदतीचा हात, समाज व राष्ट्रभक्तीचीही भावना


पाचोरा 
सद्यस्थितीत अनेक आव्हानांना टक्कर देणार्‍या सर्वसामान्य माणसाला कौटुंबिक गरजा पूर्ण करता याव्यात, परिवारातील भावी पिढीचे उच्च शिक्षण, लग्नकार्य करता यावे, तसेच अन्य आवश्यक त्या हौशी व गरजा भागवता याव्यात...याकरिता सहकार क्षेत्रातील बँका, पतसंस्था या राष्ट्रीयकृत बँकांपेक्षा अधिक सोयीच्या ठरतात. यादृष्टिने आणि खाजगी सावकारी नष्ट करण्यासाठी चाळीसगावमधील जनसेवा नागरी सहकारी पतपेढी अभिमानास्पद कामगिरी करीत आहे.
 
सामाजिक सेवाभावासोबत पारदर्शी, प्रामाणिक व्यवहार करणारी ही पतसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी समर्पण भावनेने उभी केली आहे. आधी आडवा बाजार परिसरात हनुमान वाडीत असलेल्या या पतसंस्थेची मध्यवर्ती नेताजी चौकात गेल्या जानेवारीत आकाराला आलेली दुमजली देखणी, नवीन स्ववास्तू उभी आहे.
 
सहकार क्षेत्राला काही स्वार्थी मंडळी आणि सहकार खात्यातील कथित काही बेपर्वा, भ्रष्ट अधिकारी कर्मचारी यांच्या कारनाम्यांमुळे वाईट दिवस आले आहेत. मात्र त्याला ही संस्था अपवाद ठरली आहे. तालुका तिचे कार्यक्षेत्र आहे.
 
चाळीसगाव शहर आणि परिसरात या पतसंस्थेने निर्माण केलेले पायंडे आणि प्रगतीची थक्क करणारी गणिते मांडत ही संस्था अग्रस्थानी आहे. 25 डिसेंबर 2005 रोजी पतसंस्थेला नोंदणीपत्र मिळाले. तेव्हा सर्वाधिक भाग रक्कम 1151 रु. स्विकारत निवडक नागरिकांना सभासद करुन घेण्यात आले.
 
जळगावच्या केशवस्मृती सेवा संस्थासमूहाचे अध्वर्यू संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, मातृहृदयी समाजसेवी स्व. डॉ. अविनाश आचार्य, चाळीसगावचे ज्येष्ठ त्यागी, अजातशत्रू कार्यकर्ते प्रीतमदास रावलानी आदींचे मार्गदर्शन आणि आशिर्वादाने या सेवाप्रकल्पाचा श्रीगणेशा झाला.
 
पहिले अध्यक्षपद रा. स्व. संघाचे तत्कालीन तालुका कार्यवाह प्रकाश पोतदार यांनी भूषविले.(ते सध्या विद्या भारतीचे प्रांत संघटनमंत्री आहेत.) संचालक मंडळाची बिनविरोध निवड होते. सध्या चेअरमनपदी डी.एस. मराठे, व्हा. चेअरमनपदी रामचंद्र बभृवहन पाटील आणि सहसचिव आहेत नारायण जगन्नाथ कुमावत. मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नारायण पुंजू भदाणे आहेत.
 
शांत, विनम्र आणि मेहनती, अभ्यासू संचालक आणि विश्वासू सहकार्‍यांचा परिणाम संस्थेतील 3 सहकारी (दैनंदिन बचत ठेव प्रतिनिधी शहरात 3 आणि उंबरखेडे व सायगावला प्रत्येकी 1) अतिशय तळमळीने, पारिवारिक भावनेने संस्थेसाठी झटत आहेत.
 
अभिनव पायंडे, वैशिष्ट्ये
 
समाजाचे विश्वस्त या भावनेने अतिशय पारदर्शी, स्वच्छ आणि काटकसरीचा व्यवहार आहे. संचालक बैठकीतील चहापानाचा खर्चही वैयक्तिक... संचालक व त्यांच्या आप्तांना 1 रु. ही कर्ज नाही.
 
फक्त सभासदांनाच कर्ज (नाममात्र सभासद ही संकल्पनाच नाही) कर्जासाठी अध्यक्ष वा संचालकांना भेटण्याची गरज नाही. नियमित कर्जफेड असल्यास विहित पूर्ततेनंतर लगेच कर्ज अदा. ‘दरमहा 1330रु. भरा...5 वर्षात लाख रुपये मिळवा’ या योजनेत कर्मचार्‍यांच्या वेतनातून कपात, त्यांच्यासह 90 खातेदार. गुणी व यशप्राप्त सभासद तसेच पाल्यांचा दरवर्षी सत्कार...
 
संस्थेची चौफेर कामगिरी
 
लवकरच गोवंशांच्या सेवेसाठी, संवर्धनासाठी लोकसहभागातून गोशाळा सुरु करण्याचा संकल्प आहे. संस्थेस दृष्ट लागेल, अशी चौफेर कामगिरी करीत आहे.
चौफेर प्रगती .... दृष्टिक्षेपात
 
* भागभांडवल- 41 लाख 07 हजार 400 रुपये
 
* गुंतवणूक -1 कोटी 25 लाख 51 हजार रुपये
 
* ठेवी- 1 कोटी 07 लाख 76 हजार रुपये
 
* कर्जवाटप-95 लाख 56 हजार रु., स्वनिधी- 51 लाख 21 हजार रु., नफा- 09 हजार रु.
 
* लाभांश- 8 टक्के, सतत ‘अ’ वर्ग. सभासद संख्या- 1746 (सर्वासाठी 10 वर्षांपासून अपघात विमा योजना)
कर्ज वसुली 97.50 टक्के, एनपीए-1.50 टक्के
 
नवीन वास्तू..., वैभवाची निदर्शक
 
सुमारे 750 चौरस फूट जागेत 1 हॉल व 1 रुम अशी 2 मजली बांधकाम असलेली ही लहानशी, सुबक, सुंदर वास्तू सर्व सुविधायुक्त आणि अत्याधुनिक यंत्रणांनी सज्ज आहे. समाज व राष्ट्राच्या भल्यासाठी झटणार्‍या सहकार व संघ परिवारातील पदाधिकारी, कार्यकर्त्याच्या निवासाची सोय पहिल्या मजल्यावर असेल.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121