नवी दिल्ली : ओडिशातील किनारी भागात मुसळधार तसेच अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याने ओडिशा सरकारने यंत्रणांना हायअलर्ट जारी केले आहेत. अरबी समुद्रातील पश्चिम भागात लुबान चक्रीवादळ घोंघावत असल्याने ओडिशात याचा परिणाम होणार असल्याने हे अलर्ट जारी करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर ओडिशा सरकारने आपत्कालीन यंत्रणेतील कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द केल्या असून जिल्हा आपत्ती निवारण यंत्रणा सज्ज ठेवली आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/