देशातल्या शाळा, विद्यापीठ आणि उद्योग क्षेत्रात नाविन्यता, कल्पकता आणि उद्यमशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठीच्या अटल इनोव्हेशन मिशनने, अटल टिंकरिंग लॅब उभारण्यासाठी आणखी १५०० शाळांची निवड केली आहे. यामुळे ‘भावी कल्पक म्हणून भारतातल्या एक दशलक्ष मुलांची जोपासना करा’ या अभियानाला चालना मिळणार आहे.
सहावी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना विज्ञान तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नाविन्यता आणि कल्पकतेला चालना देणे ही अटल टिंकरिंग लॅबची कल्पना आहे. थ्रीडी प्रिंटउर्, रोबोटिक्स, सेन्सर टेक्नॉलॉजी किटस्नं सुसज्ज अशा ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकण्याबरोबरच अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून स्थानिक समुहांचे प्रश्न सोडविण्यासाठी हातभार लावण्याला प्रोत्साहन मिळते. देशाच्या सामाजिक, प्रश्नांच्या निराकरणासाठी स्वत: विचार करून कल्पक तोडगा काढण्यासाठी याद्वारे विद्यार्थ्यांना चालना मिळते.
२५ हजार पेक्षा जास्त अर्जांमधून आतापर्यंत २४४१ शाळांची दोन फेऱ्यांमधून निवड करण्यात आली आहे. आता ३४ शाळा राज्ये/केंद्रशासित प्रदेशात किमान एक किंवा अधिक अटल टिंकरिंग लॅब राहणार आहे.