"तुम कर्म करो, हम उसे कांड में बदल देंगे"

    24-Jan-2017   
Total Views |
 भारतीय मिडियाची प्रतिमा अशी कशी?
 


७० हजारांपेक्षा जास्त वृत्तपत्र असलेली आणि १६०० पेक्षा अधिक वृत्तवाहिन्या असलेली जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीतील सर्वात मोठे प्रसारमाध्यमाचं क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय मीडिया विषयी गूगलला सर्च केले असता त्याची आलेली उत्तरे आपणा सर्वांचे लक्ष आकर्षित करून घेतात. आणि गुगलले दाखविलेली उत्तरे आपल्या मनात असंख्य प्रश्न निर्माण करणारी, मिडियाबद्दलचा आपला दृष्टीकोन बदलणारी ठरतील असे मला वाटते. आणि खरे देखील आहे. कारण हातच्या काकणाला आरसा कशाला? हा सर्च-रिसर्च तूम्ही देखील करू शकता... 
 
"Why is indian media" असे वाक्य गुगलच्या सर्च इंजिनमध्ये टाकले असता आपल्याला गुगलद्वारे काही उत्तरे मिळतात. त्यात पहिले "Why is indian media anti hindu" , दुसरे "Why is indian media so biased" तिसरे आणि खूप महत्वाचे "Why is indian media so negative" आणि चौथे म्हणजे  "Why is indian media anti modi" अशी उत्तरे मिळतात. आता सांगा... सामान्य माणसाला इंटरनेट आणि `सोशल मिडिया`चे माध्यम मिळाल्यामुळे प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मिडीयाला आपला विचार जसाच्या तसा लोकांच्या घश्यात पेक्षा डोक्यात उतरविणे अवघड झाले आहे. त्यामुळे नेहमीच  सामन्यांच्या मनात असलेल्या मिडियाच्या प्रतिमेचे पडसाद आता प्रत्यक्ष गुगलवर देखील उमटायला लागले आहेत.
 
प्रतिमा निर्मिती मागची काही उदाहरणे 
भारतीय मिडीयाबद्दल अशी प्रतिमा का निर्माण झाली असेल? याला काही घटना कारणीभूत आहेत, ज्यातून मिडीयाचा पक्षपातीपणा, नकारात्मक मानसिकता आपल्या ध्यानी येतील. त्याचे विश्लेषण खालीलप्रमाणे...
 
१. दादरी हत्याकांड 
उत्तरप्रदेशातील दादरी या गावी अखलाक नामक व्यक्तीची काही लोकांनी हत्या केली असता, मिडीयाने देशात हिंदू विरुद्ध मुस्लीम असे चित्र निर्माण केले होते. कोणाचाही मृत्यू होणे अत्यंत खेदजनक मात्र त्यावर आपली राजकीय पोळी भाजत बसणे त्याहून अधिक भयानक मानसिकतेची लक्षणे होत. एका व्यक्तीचा मृत्यू हा राष्ट्रीय विषय बनवणारी `सो कॉल्ड सेक्युलर मिडीया` मात्र जेव्हा कम्युनिस्ट लोक केरळमध्ये दैत्याचा थैमान मांडून केवळ एका वर्षात २०० हून अधिक, आपल्याहून  वेगळ्या विचारांच्या लोकांची हत्या करतात तेव्हा मुग गिळून गप्प बसतो.
 
२. आसाममधील बलात्कार घटना
आसाममध्ये भर रस्त्यात एका तरूणीवर अत्याचार करणा-या तरूणांना आवरण्याऐवजी तिथे असलेला पत्रकार त्याचे फ़ूटेज घेण्यात जास्त Interested होता, कारण त्यामुळे त्यांना एक Exclusive मिळणार होते आणि 'फ़क्त आमच्या चॅनलवर सर्वात आधी' चा दुर्दैवी टेंभा मिरवायचा होता. हे कुठल्या मानसिकतेचे लक्षण म्हणायचे? 
 
३. शक्तिमान घोडा
उत्तराखंड येथे शक्तिमान घोड्याचा पाय एका पक्षाच्या कार्यकर्त्याने लाठी मारून तोडला. घटना तशी अत्यंत निंदनीय, मात्र तो काही राष्ट्रीय मुद्दा नव्हे. एका घोड्याच्या पायाने देश चालत होता आणि तो आता तुटला म्हणून देशाची व्यवस्था पंगु झाली अशी कोणतीही परिस्थिती नसताना देखील, एक विरुद्ध दुसरा अशी ठिणगी पेटविण्याची मानसिकता केवळ दिसत होती. मात्र याला पशु प्रेम, पशु संवर्धन म्हणून नाव द्यायचे आणि जेव्हा गोहत्या बंदी वैगरे विषय निघतात तेव्हा आम्ही आमच्या स्वयंपाक घरात काय शिजवावे हे सरकारने ठरवू नये अशी टिमकी वाजवायची. ही दुहेरी मानसिकता उघड उघड दिसायला लागते. 
 
४.  JNU प्रकरण
JNU येथील काही विद्यार्थ्यांनी अफजल गुरु समर्थनार्थ मोर्चा काढला होता. ज्यात त्या मोर्चात सामील झालेल्या विद्यार्थ्यांची देशाच्या न्याय व्यवस्थेविरोधी मानसिकता स्पष्ट दिसत होती. आणि त्याची शिक्षा म्हणून काहींना तुरुंगाची हवा खावी लागली होती. मात्र यासर्व प्रकारात शिक्षा ठोठावली गेलेली मंडळी तरुणांचा उगवता चेहरा म्हणून मिडीयाने समोर आणली, त्यात अभिव्यक्ती स्वतंत्रता वैगरे मुद्दे पुढे आणून मुख्य घटनेला सोयीने बगल दिली गेली. हे स्पष्ट जाणवते. त्यावेळीच्या वृत्त वाहिन्यांच्या मते अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली सर्वोच्च न्यायालयाच्या अवमानाच्या घटना दाबणेच इष्ट मानले जात होते. 
 
५. काश्मिरी पंडित
१७ जानेवारी १९९० साली कश्मिरी पंडितांना आपल्या घरातून, गावातून, राज्यातून बेदखल  केले गेले, त्यांना विस्थापित व्हायला लागले, त्यांना तिथून हाकलून देण्यात आले आहे. २७ वर्षे लोटली तरी देखील या प्रकाराबाबत सरकार, मानवाधिकार आयोग आदी सेक्युलर मंडळी उदासीनपणे बसले आहेत. त्यात सगळीकडे नजर आणारी मिडीया देखील याला अपवाद नाही. गुजरात येथे २००२ साली उसळलेल्या दंगली वरून तेथील तत्कालीन मुख्यमंत्र्यांना वेठीस धरून वारंवार प्रश्न विचारणारी हि मंडळी काश्मीरचा रस्ता मात्र सोयीने विसरून जाते. आणि काश्मिरी पंडितांना होणाऱ्या वेदना ठरवून दुर्लक्षित केल्या जातात. 
 
अशी सगळी उदाहरणे वाचून अथवा पाहून लक्षात येते की यात गुगलचा तरी काय दोष... सामन्यांच्या मनात मीडिया विषयी एकच प्रतिमा तयार झाली आहे, जी सांगते की "तुम कर्म करो, हम उसे कांड मै बदल देंगे". मिडियाच्या या प्रतिमेला पंतप्रधान देखील अपवाद नाहीत, त्यांनी देखील एका मुलाखतीत, "हल्ली गम्मत केली तरी त्याचा गैरवापर मिडियाद्वारे केला जातो, म्हणून गमतीत काही बोलण्यास देखील मी कुचरतो" असे वक्तव्य केले होते.  त्यामुळेच  तटस्थ, समाजाभिमुख, देश हितकारक आणि खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष पत्रकारीतेची निकड आज जाणवू लागली आहे. 
 

-  हर्षल कंसारा

हर्षल कंसारा

माहिती तंत्रज्ञानातून अभियांत्रिकी पदवीधर, वेब अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट क्षेत्रात कामाचा अनुभव, सॉफ्टवेअर बरोबरच लेखनात ही विशेष आवड, ब्लॉग लेखन, चालू घडामोडी, राजकारण, सामाजिक आणि तरुणाईशी संबंधित विषयांवर लिखाणाची आवड, मराठी बरोबरच गुजराती आणि इंग्रजी साहित्यात देखील रुची, रा.स्व. संघाचे स्वयंसेवक.

अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121