भारतात आजपासून मोटोरोला एज ५० अल्ट्रा (Motorola Edge 50 Ultra) दाखल होत आहे. आनंदाची बातमी म्हणजे या फोनमध्ये गॅझेट प्रेमींना आवडेल अशी फिचर्स असल्याने मोटोरोला फोनला कसा प्रतिसाद मिळतो ते पाहणे महत्वाचे आहे. कागदावर या फोनमध्ये दमदार फिचर्स आहेत. आज दुपारी १२ वाजल्यापासून हा फोन खरेदीसाठी ग्राहकांची उपलब्ध असणार आहे.
Read More
गुगलने स्मार्टफोन बनवण्यासाठी तामिळनाडू राज्याला पसंती दिली आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, स्मार्टफोन प्रकल्पासाठी गुगलने तामिळनाडू राज्याला प्राधान्य देण्याचे ठरवले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडू सरकारची व गुगल व्यवस्थापनात याविषयी चर्चा घडलेली आहे. अद्याप यातील व्यवहाराची माहिती समोर येऊ शकली नाही.
देशातील पहिली ‘आयफोन’ निर्मिती कंपनी असलेल्या ‘टाटा’तर्फे आता एकूण २८ हजार रोजगारनिर्मिती केली जाईल. त्यासाठी सद्यःस्थितीतील निर्मिती कारखान्यांची क्षमता दुप्पट होऊन, आगामी १८ महिन्यांत ते पूर्णपणे कार्यान्वित होतील. यानिमित्ताने भारतातील मोबाईल निर्मिती क्षेत्रातील बाजारपेठेचा घेतलेला हा आढावा... देशातील पहिली ‘आयफोन’ निर्मिती कंपनी असलेल्या ‘टाटा’तर्फे आता एकूण २८ हजार रोजगारनिर्मिती केली जाईल. त्यासाठी सद्यःस्थितीतील निर्मिती कारखान्यांची क्षमता दुप्पट होऊन, आगामी १८ महिन्यांत ते पूर्णपणे कार्यान्वित हो
बाजारात उपलब्ध इतर उत्पादनांच्या तुलनेत अत्यंत किफायतशीर दरांत नव्या युगाची वैशिष्ट्ये दाखल करण्याच्या तत्त्वज्ञानाकरिता वचनबद्ध असणाऱ्या लाव्हाने आज रू 9,999/- पासून सुरू होणाऱ्या किंमतीत आज नवीन ब्लेझ २ ५जी सादर करण्यात येईल. हे उपकरण उत्कृष्ट ग्लास बॅकसह उपलब्ध असून हा सेगमेंटमधील पहिला रिंग लाईट ठरला. ते ग्लास ब्लॅक, ग्लास ब्ल्यू आणि ग्लास लवेंडर अशा तीन आकर्षक रंगांत उपलब्ध आहे.
अँपल कंपनीने यंदा चौथ्या तिमाहीत महसूलवाढीचा नवा विक्रम नोंदवला आहे. याविषयी बोलताना अँपलचे चीफ एक्झिक्युटिव्ह टीम कुक यांनी,अँपल इंडियाने प्रथमच दोन अंकी महसूल उत्पन्नात वाढ केली असल्याचे स्पष्ट केले. जुलै ते सप्टेंबर तिमाहीमध्ये दोन अंकी वाढ केली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. अँपल कंपनीने सप्टेंबर तिमाहीमध्ये ८९.५ अब्ज डॉलरचा महसूल मिळवला होता. गेल्या वर्षी याच तिमाहीमध्ये अँपलचा महसूल ४३.८ अब्ज डॉलर होता. त्यामुळे यंदा तुलनेत १ टक्यांनी महसूल कमी झाला असल्याचे चित्र आहे.
मुंबई : सध्या बाजारात नवनवीन स्मार्ट फोन्स येत असतात. आता वन प्लस या कंपनीने आपला पहिला फोल्डेबल स्मार्ट फोन बाजारात लॉंन्च करणार आहे. वन प्लसच्या या मोठ्या लॉन्चिंगमुळे सॅमसंग या कंपनीला स्पर्धक तयार झाला आहे. याआधी फोल्डेबल स्मार्ट फोन तयार करणाऱ्या कंपनीत सॅमसंगचा बोलबाला होता. वन पल्सच्या फोल्डेबल फोनच्या लॉन्चिंगमुळे त्यांचेसुध्दा फोन्स आता ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत.
अनेक दिवसांपासून ५ जी ची प्रतीक्षा होत आहे. देशात अनेक ५ जी स्मार्टफोन विकले जात आहेत. पण ५ जी नेटवर्क कोठेही उपलब्ध नाही. असं असलं तरी ५ जी इंटरनेट स्पीड २०२१ या वर्षामध्ये देशात येणार आहे. सरकार लवकरच ५ जी नेटवर्कचे स्पेक्ट्रम वाटप आणि लिलाव प्रक्रिया सुरू करणार आहे.
‘लॉकडाऊन’मुळे हाताशी भरपूर रिकामा वेळ असल्यामुळे तर स्मार्टफोन वापरण्यात जाणार्या तासांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे आणि त्यातूनच ’पिंकी फिंगर’ म्हणून ओळखल्या जाणार्या करंगळीमध्ये व्यंग निर्माण होत असल्याची तक्रार घेऊन येणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यात, तासनतास स्मार्टफोनचे वजन पेलण्यामुळे आपल्या डॉमिनंट किंवा प्रामुख्याने वापरल्या जाणार्या हाताची करंगळी वाकडी होत असल्याचे दिसून येत आहे. यालाच ‘स्मार्टफोन पिंकी’ असे म्हणतात.
मुलं ही अनुकरणाने शिकतात, हे विसरून कसे चालेल? तेव्हा, आपल्या मुलांच्या हाती संगणक, मोबाईल, व्हिडिओ गेम देताना त्यांच्या डोळ्यासमोर नेमके काय चित्र आपण उभे करत आहोत, याचे पालकांनी भान ठेवायलाच हवे; अन्यथा पडद्यावरचा हिंसाचार, मुलांच्या आचारात उतरायला फारसा वेळ लागणार नाही.