अँपल इंडियाने महसूलवाढीचा नवीन विक्रम नोंदवला
नवी दिल्ली: अँपल कंपनीने यंदा चौथ्या तिमाहीत महसूलवाढीचा नवा विक्रम नोंदवला आहे. याविषयी बोलताना अँपलचे चीफ एक्झिक्युटिव्ह टीम कुक यांनी,अँपल इंडियाने प्रथमच दोन अंकी महसूल उत्पन्नात वाढ केली असल्याचे स्पष्ट केले. जुलै ते सप्टेंबर तिमाहीमध्ये दोन अंकी वाढ केली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. अँपल कंपनीने सप्टेंबर तिमाहीमध्ये ८९.५ अब्ज डॉलरचा महसूल मिळवला होता. गेल्या वर्षी याच तिमाहीमध्ये अँपलचा महसूल ४३.८ अब्ज डॉलर होता. त्यामुळे यंदा तुलनेत १ टक्यांनी महसूल कमी झाला असल्याचे चित्र आहे.
आश्चर्यजनक रित्या भारत आमच्यासाठी उत्साहवर्धक बाजारपेठ आहे. मोठ्या बाजारपेठेत आमचा वाटा कमी आहे. भारतात जगाच्या तुलनेत मोठे आश्वासन मार्केट असून हे आमच्यासाठी महत्वाचे बाजारपेठ आहे ' असं टीम कुक यांनी सांगितले.
आयफोन व्यतिरिक्त इतर उत्पादनांच्या महसूलात मात्र घट झाली आहे. आयफोनचा महसुलात ३ टक्के वाढ झाली परंतु इतर उत्पादनात तितके यश मिळाले नाही. सर्विसेस मध्ये कंपनीला १६ टक्यांने इयर ऑन इयर बेसिसवर वाढ झाली आहे.मागील वर्षी सप्टेंबरच्या तिमाहीत पूर्ण झालेल्या तिमाहीतील कमी मागणीमुळे iPad चा महसूल 10% कमी होता.