One Plus : घेऊन येत आहे पहिला फोल्डींग फोन!

    01-Jul-2023
Total Views | 340
Oneplus Launching First Foldable Phone

मुंबई
: सध्या बाजारात नवनवीन स्मार्ट फोन्स येत असतात. आता वन प्लस या कंपनीने आपला पहिला फोल्डेबल स्मार्ट फोन बाजारात लॉंन्च करणार आहे. वन प्लसच्या या मोठ्या लॉन्चिंगमुळे सॅमसंग या कंपनीला स्पर्धक तयार झाला आहे. याआधी फोल्डेबल स्मार्ट फोन तयार करणाऱ्या कंपनीत सॅमसंगचा बोलबाला होता. वन पल्सच्या फोल्डेबल फोनच्या लॉन्चिंगमुळे त्यांचेसुध्दा फोन्स आता ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत.

दरम्यान, सॅमसंग ही कंपनी फोल्डेबल फोनचे सर्वात प्रमुख उत्पादक असून २०२३ मध्ये वन प्लस या कंपनीने त्यांना आव्हान निर्माण केले आहे. तसेच, गुगल पिक्सल फोल्ड हा फोन नुकताच लॉन्च झाला असून वन प्लसदेखील आपला पहिला फोल्डेबल फोन लॉन्च करण्यास तयार आहे. दरम्यान, या फोनचे डिझाइन लीकने उघड केले असून ग्राहकांना या फोनची झलक पाहण्यासाठी आता प्रतीक्षा करावी लागणार नाही.

वन प्लस कंपनीचा फोल्डेबल फोन नेमका आहे तरी कसा?

या फोल्डेबल फोनला 'OnePlus V Fold' असे नाव दिले आहे आणि त्यात ७.८ इंचाचा आतील फोल्डिंग डिस्प्ले असेल. तर फोनच्या बाहेरील बाजूस, दुसरी स्क्रीन असेल, ती ६.३ इंच असेल. तसेच, दोन्ही स्क्रीन या १२०Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतील, जे नवीनतम सॅमसंग फोल्डेबल फोनच्या वैशिष्ट्यांशी मिळतेजुळते असतील.

बाह्य डिस्प्ले १२०Hz रिफ्रेश रेटसह ६.३-इंचाचा AMOLED पॅनेल असेल. हुड अंतर्गत, स्नॅपड्रॅगन ८ Gen २ चिपसेट डिव्हाइस असून हे १६GB पर्यंत LPDDR५X RAM आणि २५६GB पर्यंत UFS ३.१ स्टोरेज पॅक करेल. १००W पर्यंत फास्ट वायर्ड चार्जिंगसह ४,८००mAh बॅटरी असेल. Hasselblad-ब्रँडेड ४८MP प्राथमिक कॅमेरा OIS सह, एक ६४MP टेलिफोटो कॅमेरा, आणि दुसरा ४८MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा. आतील कॅमेरा २०MP असेल तर बाहेरील ३२MP सेन्सर असेल. Android १३ वर आधारित Oxygen OS १३.१ ची देखील असेल.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121