बाजारात आज 'हॅलो मोटो ' ! मोटोरोलाचा हा तगडा स्मार्टफोन बाजारात

मोटोरोला एज ५० अल्ट्रा भारतात दाखल

    24-Jun-2024
Total Views |


Motorola
 
मुंबई: भारतात आजपासून मोटोरोला एज ५० अल्ट्रा (Motorola Edge 50 Ultra) दाखल होत आहे. आनंदाची बातमी म्हणजे या फोनमध्ये गॅझेट प्रेमींना आवडेल अशी फिचर्स असल्याने मोटोरोला फोनला कसा प्रतिसाद मिळतो ते पाहणे महत्वाचे आहे. कागदावर या फोनमध्ये दमदार फिचर्स आहेत. आज दुपारी १२ वाजल्यापासून हा फोन खरेदीसाठी ग्राहकांची उपलब्ध असणार आहे.
 
एज ५० अल्ट्रा फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8s जनरेशन ३ चा प्रोसेसर देण्यात आलेला आहे. तसेच वेगवेगळ्या स्टाईल व फिनिशिंगमध्ये हा फोन मोटो प्रेमींना मिळणार आहे. कंपनीच्या म्हटल्याप्रमाणे, या फोनमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा समावेश देखील करण्यात आलेला आहे. जसे ' Moto AI' , ' AI Magic Canvas' अशा फिचर्सचा समावेश असेल.
 
फोनची फिचर्स व स्पेसिफिकेशन
 
प्रोसेसर - Qualcomm Snapdragon 8s Gen 3 chipset
 
डिस्प्ले - ६.७ इंच १.५ k poLED १४३ Hz refresh rate, २५०० nits peak brightness, pantone validation
 
स्टोअरेज - ५१२ GB UFS ४.०
 
रियर कॅमेरा - ५० Megapixel
 
पुढील कॅमेरा - ५० Megapixel
 
रॅम - १२ GB
 
चार्जिंग - १२५ Wired व ५० W Wireless
 
प्रोटेक्शन - Corning Gorilla Glass Victus , IP६८
 
ओएस - Android १४ based Hello UI
 
याखेरीज Motorola Edge 50 Ultra हा रियल वूड फिनिशिंग, तसेच वेगन लेदर फिनिशिंगमध्ये उपलब्ध असणार आहे.
 
यामध्ये दोन रंग उपलब्ध आहेत १- Forest Grey २- Peach Fuzz
 
या स्मार्टफोनची किंमत प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, ५९९९९ रुपये असणार आहे. हे स्मार्टफोन्स फ्लिपकार्ट, किरकोळ (रिटेल) विक्रेते, तसेच कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध असणार आहेत. जर तुमच्याकडे HDFC व ICICI बँकेचे क्रेडिट कार्ड असल्यास या स्मार्टफोनवर अतिरिक्त ५००० ची सूट तुम्हाला मिळू शकते. तसेच १२ महिन्यापर्यंत EMI चा पर्याय देखील यावर उपलब्ध असणार आहे.