मेट्रो शहरांमध्ये लवकरच '५ जी' सेवा सुरु होणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jan-2021
Total Views |

5 g internet speed_1 





'५ जी' इंटरनेट स्पीड आल्याने होणार 'ही' क्रांती




मुंबई: अनेक दिवसांपासून ५ जी ची प्रतीक्षा होत आहे. देशात अनेक ५ जी स्मार्टफोन विकले जात आहेत. पण ५ जी नेटवर्क कोठेही उपलब्ध नाही. असं असलं तरी ५ जी इंटरनेट स्पीड २०२१ या वर्षामध्ये देशात येणार आहे. सरकार लवकरच ५ जी नेटवर्कचे स्पेक्ट्रम वाटप आणि लिलाव प्रक्रिया सुरू करणार आहे. एप्रिलपासून देशातील मेट्रो शहरांच्या निवडक मंडळांमध्येही ५ जी इंटरनेट स्पीडच्या चाचण्या सुरू होतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



या योजनेनुसार जुलै ते ऑगस्ट दरम्यान मेट्रो शहरांच्या निवडक मंडळांमध्ये ५ जी सुरू होईल. रिलायन्स जिओने इंडिया मोबाइल कॉंग्रेस इव्हेंट दरम्यान २०२१ च्या उत्तरार्धात ५ जी सेवा सुरू करण्याची घोषणा देखील केली आहे. ५ जी इंटरनेट स्पीड आल्यानंतर सर्वाधिक फायदे डिजिटल माध्यमांसाठी होईल. महत्वाचे म्हणजे, वैद्यकीय आणि औद्योगिक क्षेत्रांनाही ५ जी इंटरनेट स्पीडचा लाभ मिळण्यास प्रारंभ होईल, ज्यामुळे त्या क्षेत्रात मोठी क्रांती घडेल.




 ४ जी च्या तुलनेत ५ जी चा डाउनलोड स्पीड १० ते १२ पटीने वाढणार आहे. सध्या भारतात ५ जी चा डाउनलोड स्पीड ३३.३ Mbps इतका आहे. त्याउलट ५ जी डाउनलोड स्पीड २०० Mbps ते ३७० Mbps पर्यंत असेल. सध्या ५ जी स्पीडच्या बाबतीत सौदी अरेबिया आणि दक्षिण कोरिया हे अव्वल स्थानी आहेत.




@@AUTHORINFO_V1@@