लोणावळ्यातील पर्यटकांनी गजबजलेल्या पवना तलावाजवळ शुक्रवार दि. ७ मार्च रोजी सकाळी बिबट्याचा वावर आढळून आला. झाडावर चढलेल्या बिबट्याला स्थानिकांनी पकडण्याचा प्रयत्न केल्याने सहा जण जखमी झाले. मात्र, वन विभागाने प्रसंगावधान राखून 'रेस्क्यू-पुणे'च्या मदतीने स्थानिकांकडून बिबट्याचा ताबा मिळवला आणि त्याला वन्यजीव बचाव केंद्रात हलविले. (pawna lake leopard rescue)
Read More
वनविभागाच्या कक्षेत राहूनही वन्यजीव आणि समाजमन यांचा सारासार विचार करणारे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश सुतार यांच्याविषयी...
पुण्यातील वाघोलीमधील डिकॅथलाॅनच्या आवारात शुक्रवार दि. २५ आॅक्टोबर रोजी आढळलेल्या जखमी बिबट्याला पकडण्यामध्ये वन विभागाला यश मिळाले आहे (leopard rescued from decathlon). रेस्क्यू-पुणे यांच्या मदतीने हे बचावकार्य पार पडले. या बिबट्याच्या पायाला इजा झाली असून सध्या त्याच्यावर पुण्यातील वन्यजीव बचाव केंद्रात उपचार सुरू आहेत. (leopard rescued from decathlon)
पुण्यातील कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयाच्या पिंजऱ्यातून पळालेल्या नर बिबट्या अखेर जेरबंद झाला आहे. ( pune leopard resuced ) पुणे पालिका प्रशासनाने वन विभागाच्या मदतीने या बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद केले. ( pune leopard resuced ) ४८ तासानंतर ही कामगिरी फत्ते झाली. ( pune leopard resuced )
गेल्या काही काळात वातावरणातील दीर्घकालीन बदलांविषयी संशोधन आणि जागृतीही वाढलेली दिसते. या बदलांविषयी जैवविविधतेच्या घटकांवरील तसेच अखंड मानवजातीवरील परिणाम यानिमित्ताने प्रकाशझोतात येत आहेत. अशाप्रकारचे संशोधन, अभ्यास समोर आल्यास निश्चितच त्याचा उपयोग जैवविविधतेच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी करणे शक्य होणार आहे.
चिपको आंदोलनापासून पुराव्यावर आधारित संवर्धनापर्यंत वन्यजीव संवर्धनाने खूप मोठा पल्ला गाठला आहे आणि यामध्ये कॅमेरा ट्रॅपच्या शोधाने मोठी भूमिका बजावली आहे. कॅमेरा ट्रॅप्स म्हणजे काय आणि ते सध्याचे वन्यजीव वाचवण्यासाठी कसे वापरले जातात ते जाणून घेऊ या.
पुण्यातील 'रेस्क्यू' या वन्यजीव बचाव संस्थेने जून महिन्यात वेळेत बिबट्यावर उपचार करत एका पाच महिन्याच्या मादी बिबट्याचे प्राण वाचवले. एका निरोगी बिबट्याकडून रक्त संक्रमण करून या अशक्त पिल्लाला देण्यात आले. उपचारानंतर हे पिल्लू स्थिरावले. आणि आता या पिल्लाची प्रकृती पूर्ण ठणठणीत आहे. सध्या हे पिल्लू 'रेस्क्यू'च्या पुण्यातील सेंटर ठेवण्यात आले आहे.
नाशिकमध्ये मार्च महिन्यात सापडलेली बिबट्याच्या (Leopard) तीन पिल्लांपैकी २ पिल्लांचा मृत्यू झाला आहे. ही पिल्ले जून रोजी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दाखल झाली होती. पिल्लांचे त्यांच्या आईसोबत पुनर्भेटीचे प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर त्यांना पुढील देखलभालीकरिता मुंबईत पाठवण्यात आले होते. या पिल्लांमध्ये दोन मादी आणि एक नर पिल्लाचा समावेश होता. गेल्या पाच महिन्यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात अनेक प्राण्यांचा मृत्यू जाहला आहे.
उसाच्या शेतात बेवारस अवस्थेत सापडलेल्या बिबट्याच्या सात पिल्लांची (leopard cub) त्यांच्या आईसोबत पुनर्भेट करुन देण्यामध्ये जुन्नर वन विभाग आणि ‘वाईल्डलाईफ एसओएस’ टीमला यश मिळाले आहे. महत्त्वाचे म्हणजे, ही सात पिल्ले (leopard cub) केवळ सात दिवसांमध्ये आईच्या कुशीत पुन्हा विसावली आहेत. जुन्नर वन विभाग आणि ‘वाईल्डलाईफ एसओएस’च्या टीमने गेल्या वर्षभरात आईपासून विभक्त झालेल्या २३ पिल्लांची (leopard cub) पुन्हा आईसोबत पुनर्भेट घडवून आणण्याचे काम केले आहे.
नंदुरबारहून बोरिवलीच्या 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'त बिबट्याची दोन पिल्ल (Leopard cubs) दाखल झाली आहेत. आईपासून ही पिल्लं (Leopard cubs) विभक्त झाल्यामुळे त्यांची रवानगी राष्ट्रीय उद्यानात करण्यात आली आहे. यापुढे ही पिल्ले (Leopard cubs) राष्ट्रीय उद्यानातील 'बिबट निवारा केंद्रा'त राहतील.
तीन बिबट्यांची सुटका होणार
येऊरमधील वनकर्मचाऱ्यांना मादी बिबट्या एका पिल्लासह दिसली होती
मादी आढळून आल्यानंतरच पिल्लाला सुपूर्द करण्यासाठी पुन्हा प्रयत्न करणार
येऊरमध्ये सापडलेल्या बिबट्याच्या पिल्लाला मादीकडे सुपूर्द करण्यासाठी वन विभागाची प्रयत्नांची पराकाष्ठा
'माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रा'चे यश
जिगरबाज ‘लेपर्ड मॅन’!
दोन दिवसांच्या नाट्यानंतर रत्नागिरी वन विभाग आणि स्थानिक वन्यजीव कार्यकर्ते घरात शिरलेल्या बिबट्याच्या पिल्लाला त्याच्या आईकडे सोपविण्यात यशस्वी झाले आहेत.