पुणे - 'डिकॅथलाॅन'च्या आवारात बिबट्याचा वावर; असे पार पडले रेस्क्यू आॅपरेशन

    26-Oct-2024
Total Views | 238
decathlon


मुंबई (विशेष प्रतिनिधी) - पुण्यातील वाघोलीमधील डिकॅथलाॅनच्या आवारात शुक्रवार दि. २५ आॅक्टोबर रोजी आढळलेल्या जखमी बिबट्याला पकडण्यामध्ये वन विभागाला यश मिळाले आहे (leopard rescued from decathlon). रेस्क्यू-पुणे यांच्या मदतीने हे बचावकार्य पार पडले. या नर बिबट्याच्या पायाला इजा झाली असून सध्या त्याच्यावर पुण्यातील वन्यजीव बचाव केंद्रात उपचार सुरू आहेत. (leopard rescued from decathlon)
 
 
शुक्रवार दि. २५ आॅक्टोबर रोजी पहाटे डिकॅथलाॅनच्या परिसरात जखमी बिबट्या आढळून आला. दुकानाच्या सुरक्षारक्षकांना पहाटे ४.५५ वाजता दुकानाच्या आवरात बिबट्याचे दर्शन घडले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामधील फुटेज तपासल्यानंतर देखील दुकानाच्या आवारात बिबट्याचा वावरावर शिक्कामोर्तब झाले. वन विभागाला कळवल्यानंतर त्यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेऊन त्याठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावले. सकाळी १० आणि दुपारी १ वाजता कॅमेरा ट्रॅपमध्ये बिबट्याचे छायाचित्र कैद झाले. या छायाचित्रांमध्ये बिबट्या लंगडत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे बिबट्याला पकडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी रेस्क्यू-पुणेच्या कार्यकर्त्यांना पाचारण करण्यात आले.
 
 
दरम्यानच्या काळात बिबट्याने दुकानाच्या मागे असलेल्या उसाच्या शेतांमध्ये आसरा घेतला. रेस्क्यू-पुणेच्या कार्यकर्त्यांनी सायंकाळी ५.३० वाजता उसाच्या शेताच्या परिसरात दोन पिंजरे लावले. त्यामधील एका पिंजऱ्यात रात्री ११ वाजता बिबट्या अडकल्याचे लक्षात आल्यानंतर तातडीने त्याला बावधन येथील वन्यजीव बचाव केंद्रात हलविण्यात आल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश वरक यांनी दिली. या बिबट्याच्या पायाला इजा झाली असून त्याच्यावर सध्या रेस्क्यू-पुणेच्या मदतीने वन्यजीव उपचार केंद्रात उपचार सुरू आहेत.
अग्रलेख
जरुर वाचा
दर्जेदार ग्राहकसेवा, सुरळीत वीजपुरवठ्याला प्राधान्य द्यावे ; महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांचे निर्देश

दर्जेदार ग्राहकसेवा, सुरळीत वीजपुरवठ्याला प्राधान्य द्यावे ; महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांचे निर्देश

वीज वितरण यंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणाची कामे वेगाने सुरू आहेत. त्यामुळे नवीन वीजजोडणीसह सर्व ग्राहकांना सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठा देण्यास प्राधान्य द्यावे. सेवेच्या कृती मानकांनुसार निश्चित केलेल्या कालावधीतच सेवा द्यावी. तसेच वीजहानी कमी करून वीजबिलांच्या वसुलीला आणखी वेग द्यावा असे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी मंगळवारी (दि. २९) कोकण प्रादेशिक विभागाच्या आढावा बैठकीत दिले...

राज्य सहकारी संघ निवडणूकीत ‘सहकार पॅनेल’चे निर्विवाद वर्चस्व दरेकर-कुसाळकर-नलावडेंच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेलचे २१ पैकी २० उमेदवार विजयी

राज्य सहकारी संघ निवडणूकीत ‘सहकार पॅनेल’चे निर्विवाद वर्चस्व दरेकर-कुसाळकर-नलावडेंच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेलचे २१ पैकी २० उमेदवार विजयी

१०६ वर्षांची परंपरा लाभलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या २०२५-२०३० पंचवार्षिक निवडणुकीत आमदार प्रवीण दरेकर, राज्य सहकारी संघाचे नेते संजीव कुसाळकर आणि सहकारातील ज्येष्ठ नेते शिवाजीराव नलावडे यांच्या नेतृत्वाखालील ‘सहकार पॅनेल’ने २१ पैकी २० जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवित मोठा विजय संपादित केला आहे. महाराष्ट्रातील सहकार चळवळ पुन्हा ताकदीने कशी पुढे येईल यासाठी दिशादर्शक मार्गदर्शन करणारा संघ ठरेल, असा विश्वास यावेळी भाजपा गटनेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर यांनी व्यक्त केला...

*भारतीय शौर्य पुन्हा एकदा उजेडात आणुया, चला

*भारतीय शौर्य पुन्हा एकदा उजेडात आणुया, चला 'विजय दिवस साजरा करूया!*

आपल्या दैदीप्यमान पराक्रमी इतिहासाच्या जोरावर प्रखर राष्ट्रभक्तीने जगभरात भारतीय संस्कृतीची अटल छाप सोडणाऱ्या माझ्या भारतीय बांधवांना 'विजय दिवसाच्या' हार्दिक ' शुभेच्छा! २६ जुलै १९९९ या दिवशी तत्कालीन पंतप्रधान श्रद्धेय दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात कारगिल मध्ये पाकिस्तानला युद्धात पराजित करून 'भारतीय शुर सैनिकांनी ऑपरेशन विजय' यशस्वी केले. तब्बल १८ हजार फूट उंचीवर भारतीय सैन्याने आपले शौर्य जगाला दाखवले होते. एवढ्या उंचीवर आणि उणे ४० अंश सेल्सिअस तापमानात लढले गेलेले हे युद्ध जगातील एकमेव ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121