भारतामधील सर्वाधिक साक्षर झोपडपट्टीपैकी एक असलेल्या धारावीत शालेय विद्यार्थ्यांची गळती रोखण्याचे आव्हान आहे. राज्य शासन आणि विविध स्वयंसेवी संस्था प्रयत्नशील असताना गरिबी, असुरक्षित वातावरण, खराब आरोग्य आणि शिक्षणाविषयी जागरूकतेचा अभाव यामुळे अनेक मुले वेळेपूर्वीच शिक्षणव्यवस्थेच्या बाहेर पडत आहेत. “या शैक्षणिक वर्षातच, १०० हुन अधिक विद्यार्थ्यांनी विविध वर्गांमधून शाळा सोडली असून, हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे,” असे गांधी मेमोरियल शाळेचे मुख्याध्यापक जे. चेल्लादुराई यांनी सांगितले.
Read More
गुरुग्राममध्ये पडलेल्या पावसाने रस्ता खचून बुधवार दि. ९ जुलै रात्री दारूने भरलेला एक मोठा ट्रक खड्ड्यात पडल्याची घटना उघडकीस आली आहे. पेरिफेरल रोडवर रात्री १०:३० च्या सुमारास घडलेल्या या घटनेने या परिसरातील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला.
ठाणे जिल्ह्यातील शहापूर भागातील एका शाळेत विचित्र प्रकार घडला आहे. एका खासगी शाळेत शिक्षण घेत असलेल्या मुलींना मासिक पाळी तपासणीसाठी जबरदस्ती कपडे उतरवण्यास भाग पाडल्याची संतापजनक घटना घडली आहे. पालकांच्या तक्रारीनंतर पोलीसांकडून तात्काळ शाळेच्या मुख्याध्यापक आणि एका कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या वतीने गणेशोत्सव मंडळांच्या स्वयंसेवकांना आपत्कालीन व्यवस्थापनाचे एकदिवसीय प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रत्येक मंडळातून दोन स्वयंसेवकांना हे प्रशिक्षण मिळेल. यासाठी वॉर्ड कार्यालयांमार्फत मंडळांशी संपर्क साधला जाईल.
भारत गौरव योजनेअंतर्गत एक विशेष "स्वर्णिम भारत यात्रा" पर्यटक ट्रेन १४ ऑगस्ट २०२५ रोजी दिल्लीच्या सफदरजंग रेल्वे स्टेशनवरून भारताच्या स्वातंत्र्य दिनाचे स्मरण करून निघेल. ९ रात्री आणि १० दिवसांच्या या दौऱ्यात भारताच्या स्वातंत्र्य चळवळी आणि वारशाशी संबंधित प्रमुख ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळांना भेट देईल.
Rahul Narvekar felicitated program organized by the Cuffe Parade Federation.
मुंबईत मराठी माणसाला घर नाकारल्यास विकासकावर कठोर कारवाई केली जाईल, अशी घोषणा प्रभारी मंत्री शंभुराज देसाई यांनी गुरुवार, दि. १० जून रोजज विधानपरिषदेत केली.
केंद्र सरकारने न्यायालयांमध्ये सरकारविरुद्ध सुरू असलेल्या दीर्घकाळ प्रलंबित खटल्यांचा भार कमी करण्यासाठी आणि अनावश्यक खटल्यांना आळा घालण्यासाठी नवी योजना जाहीर केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच देशांच्या दौऱ्यानंतर गुरुवारी मायदेशी परतले आहेत. पंतप्रधानांनी आपल्या आठ दिवसांच्या दौऱ्यात घाना, त्रिनिदाद आणि टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझील आणि नामिबिया या पाच देशांना भेट दिली. त्यांनी ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे झालेल्या १७ व्या ब्रिक्स शिखर परिषदेलाही उपस्थिती लावली.
भायखळा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी यांच्या हत्या प्रकरणी एसआयटी स्थापन करणार असल्याची घोषणा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी गुरुवार, १० जुलै रोजी विधान परिषदेत केली.
कोकण कला व शिक्षण विकास संस्था, मुंबई यांच्या माध्यमातून प्रत्येक शैक्षणिक वर्षात हजारो विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचे उपक्रम राबविला जातो. यावर्षी हि आतापर्यंत सिंधुदुर्ग, पुणे, बीड,अहिल्याबाई नगर, ठाणे, रायगड सह अनेक जिल्ह्यात शैक्षणिक साहित्य वाटप संपन्न झाले असून याच वाटपाचा भाग म्हणून आज श्री माउली विद्यामंदिर डोंगरपाल येथे ३१ शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक असलेलं शालेय साहित्य उपलब्ध करून देण्याच्या हेतूने हा उपक्
शेतकऱ्यांच्या शेतजमीन, बांध आणि रस्त्यांवरील वादांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राज्यव्यापी शेतजमीन मोजणी मोहीम राबवणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात दिली. परिषदेत आमदार शिवाजीराव गर्जे यांनी शेतकऱ्यांच्या शेतजमीन, बांध आणि रस्त्यांवरील वादांबाबत लक्षवेधी मांडली.
बिहारमधील अनेक विधानसभा मतदारसंघांमध्ये बेकायदेशीर बांगलादेशी-रोहिंग्या मुस्लिमांना मतदार बनवण्यात आले आहे, असा दावा करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील अश्विनी उपाध्याय यांनी दाखल केली आहे. त्यांचा बिहारच्या निवडणूक निकालांवर परिणाम होऊ शकतो. निवडणूक आयोगाला निवडणुकीपूर्वी सर्व राज्यांमधील मतदारयादीत सुधारणा करण्याचे निर्देश देण्याची मागणी उपाध्याय यांनी केली आहे, जेणेकरून बनावट मतदारांना मतदानापासून वगळता येईल.
अफगानिस्तानमध्ये तालिबानी राजवटीत मुली-महिलांवर जे अमानवी निर्बंध लादले गेले, ते जगजाहीर आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाने नुकतेच तालिबानचे सर्वोच्च नेता हैबतुल्ला अखुनजादा आणि मुख्य न्यायाधीश अब्दुल हकीम हक्कानी यांच्यावर महिला आणि मुली यांच्याविरोधात दुर्व्यवहार, अमानवी वर्तनाविरोधात अटक वॉरंट काढले. यावर तालिबानी सरकार प्रवक्ता जबीहुल्लाह मुजाहिदने याने म्हटले की, "इस्लामिक अमिरातच्या नेतृत्वाअंतर्गत इस्लामिक ‘शरिया’च्या पवित्र कायद्याच्या आधारे अफगाणिस्तानमध्ये अद्वितीय न्याय स्थापित केले
कॅनडातील ब्रिटिश कोलंबियातील सरे येथील कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार झाला. कपिल शर्माने काही दिवसांपूर्वी कप्स कॅफे नावाच्या कॅफेचे उद्घाटन केले होते. हल्लेखोरांनी कॅफेवर नऊ गोळ्या झाडल्या आहेत. हल्लेखोरांनी या हल्याचे व्हिडिओ काढला आणि व्हिडिओ देखिल व्हायरल होत आहे. खलिस्तानी दहशतवादी हरजीत सिंग लड्डीने गोळीबाराची जबाबदारी घेतली आहे.
ब्राझीलमध्ये नुकत्याच संपन्न झालेल्या ‘ब्रिक्स’ परिषदेत चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या अनुपस्थितीने अवघ्या जगाच्या भुवया उंचावल्या. कारण, गेल्या दशकभरात जिनपिंग यांनी ‘ब्रिक्स’ला दांडी मारलेली नाही.
अमृत महोत्सवाचा उंबरठा ओलांडून ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषद’ शताब्दी वर्षाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. दि. 9 जुलै हा ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’चा स्थापना दिवस. तसेच ‘अभाविप’च्या वैचारिक अधिष्ठानाचे उद्गाते यशवंतराव केळकर यांचे हे जन्मशताब्दी वर्ष. यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा वेध घेणारा हा लेख...
(Vadodara Bridge Collapse) गुजरातच्या वडोदरा आणि आणंद जिल्ह्याला जोडणारा महिसागर नदीवर असलेल्या गंभीरा पूलाचा काही भाग कोसळल्याने अपघाताची घटना घडली आहे. हा अपघात बुधवारी ९ जुलैला सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास घडला. अपघातादरम्यान वाहनांची वर्दळ सुरू असल्याने काही वाहनं थेट महिसागर नदीत पडली आहेत. या घटनेत आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला असून इतर काही नागरिक नदीपात्रात अडकल्याची शक्यता असल्यामुळे शोधमोहिम आणि बचावकार्य वेगाने सुरू आहे.
(IAF Jaguar Fighter Jet Crashes)भारतीय हवाई दलाचे एक जग्वार लढाऊ विमान बुधवारी ९ जुलैला राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातील रतनगड शहराजवळ कोसळल्याची माहिती समोर आली आहे. दुर्घटनेनंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि शोधमोहिम आणि बचाव कार्यासाठी पोलिसांची पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत.
इस्लामी कट्टरतावाद्यांचे क्रौर्य दाखविणाऱ्या ‘उदयपूर फाईल्स’ हा चित्रपट ११ जुलै रोजीत प्रदर्शित होईल, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्याचवेळी चित्रपटातील ४० ते ५० दृश्यांवर कात्री चालवली असल्याचे सेन्सॉर बोर्डाने स्पष्ट केले आहे.
धर्मांतरीत झालेल्या हिंदुंना आरक्षणाचा लाभ घेता येत नाही. यासंबंधी न्यायालयानेच निकाल दिला असून, आपल्या भागातील अशा धर्मांतरीतांना शोधून त्यांच्या नोकऱ्या काढून घ्या,असे आवाहन आमदार गोपीचंद पडळकर यांनी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना केले.
शिवसेनेच्याच सत्ताकाळात मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला गेला. परळ, लालबाग आणि गिरगावसारख्या मराठी वस्तीतच नंतर गगनचुंबी टॉवर, टुमदार मॉल्स विकसित झाले. याच काळात ठाकरेंची ‘नवीन मातोश्री’ही दिमाखात उभी राहिली. पण, गिरणी कामगाराला मात्र त्याच्या हक्काचे घर काही मिळाले नाही. आगामी मुंबई पालिकेची निवडणूक आणि मराठी मतांच्या बेगमीसाठी काल उद्धव ठाकरेंचा गिरणी कामगारांच्या घरांसाठीच्या आंदोलनात फुकाचा कळवळाच दिसून आला.
सध्या देशात ‘उदयपूर फाईल्स’ या चित्रपटावरून वादंग उभा रालिा आहे. या चित्रपटाच्याविरोधात या खटल्यातील मुख्य आरोपी मोहम्मद जावेद याने चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ती फेटाळली. याच चित्रपटावर ‘जमियत उलेमा-ए-हिंद’ या इस्लामिक संघटनेनेही दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली असून, मुस्लीम समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ‘उदयपूर फाईल्स’ विरोधात दाखल याचिका म्हणजे सत्यावर आघात करण्याचा प्रयत्नच.
राज्य-पुरस्कृत दहशतवाद म्हणजे काय, तर एखाद्या देशाच्या धोरणाचा भाग म्हणून दहशतवादी कारवायांना सक्रियपणे निधी देणे. पाकिस्ताननेही अशाच प्रकारचा दहशतवाद पूर्वापार पोसलेला दिसतो. पाकिस्तानी दहशतवादी संघटनांनी भारतात अनेक वेळा त्यांचे नापाक कट रचले. साहजिकच या दहशतवादी संघटनांचे कटकारस्थान पाकिस्तानच्या आर्थिक मदतीशिवाय यशस्वी झाले नसते. म्हणूनच मनी लॉण्डरिंग आणि दहशतवादी वित्तपुरवठ्याचे धोके लक्षात घेता, २०२२ सालच्या अहवालात भारताने राज्य पुरस्कृत दहशतवादाची संकल्पना अधोरेखित केली होती. आता त्याला आंतरराष्ट्री
दापोली तालुयातील वन्यजीव संवर्धनाच्या कामात तळमळीने काम करणार्या तुषार श्रीधर महाडिक या तरुणाविषयी...
(Avinash Jadhav) मीरा-भाईंदर शहरात गेल्या काही दिवसांपासून मराठीवरुन वातावरण चांगलेच तापले आहे. अमराठी व्यापाऱ्यांनी केलेल्या शक्तीप्रदर्शनाला प्रत्युत्तर म्हणून मीरा-भाईंदर शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज (८ जुलै) मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र, पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारत प्रतिबंधात्मक कारवाईला सुरूवात केली आहे. सोमवारपासून पोलिसांनी मनसे आणि उबाठाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यास सुरुवात केली होती. मंगळवारी पहाटे पोलिसांनी आणखी कठोर पाऊल उचलत मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव
सध्या सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असणारे एक पोस्टर चांगलेच व्हायरल होत आहे. ज्यात १ जुलै २०२५ पासून पेट्रोलची किंमत ४५ रुपये प्रतिलिटर होणार असल्याचा खोटा दावा करण्यात आला आहे.
मोठ्या त्यागातून देशाला स्वातंत्र्य मिळाले असून, ते टिकवायचे असेल तर जात-पात बाजूला सारून कार्य करणे आवश्यक आहे. नागरिकांना राजकीय, सामाजिक आणि आर्थिक न्याय देण्यासाठी राज्यघटना आहे आणि या राज्यघटनेमध्ये योग्य बदल करण्याची मुभा घटना समितीने दिली आहे, असे प्रतिपादन सरन्यायाधीश भूषण गवई यांनी मंगळवारी मुंबईत केले. महाराष्ट्र विधानमंडळाच्या वतीने आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.
हैद्राबादमधील पुप्पलागुडा येथे राहणाऱ्या एका सहा वर्षांच्या मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत मुलीचे नाव मिधुन असून ती मूळ तेलंगणाच्या जनगाव जिल्ह्यातील कोट्टापल्ली गावातील गोविंद अशोक आणि अनुषा यांची मुलगी होती.
राज्य सरकारने विमा कंपन्यांना १ हजार १५ कोटी रुपयांचा हप्ता न भरल्यामुळे, कंपन्यांनी शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे थकवल्याची कबुली कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली. नियम २६० अन्वये प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते.
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घेऊन देशातील प्रत्येक जिल्ह्यात एक मॉडेल सौर ग्राम निर्माण करण्यासाठी सुरू केलेल्या स्पर्धेसाठी राज्यातील सहा जिल्ह्यातील ६३ गावांची निवड करण्यात आली आहे. यशस्वी गावाला केंद्र सरकारकडून एक कोटी रुपयांचे अनुदान मिळणार असून या स्पर्धेत भाग घेणाऱ्या गावांपैकी सहा महिन्यात सर्वाधिक सौर ऊर्जा क्षमता निर्माण करणाऱ्या गावाची विजेता म्हणून निवड करण्यात येणार आहे, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली.
आगामी बिहार विधानसभा निवडणुकांच्या मतदार यादीसंदर्भात मतदारांची बूथ निहाय्य किंवा विशेष गहन पुनरावृत्ती(Special Intensive Revision) करण्याच्या भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिक मंगळवार, दि. ८ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात आठ विरोधी पक्षांनी दाखल केली आहे.
हिमाचल प्रदेशमध्ये जोरदार पावसामुळे हाहाकार उडाला आहे. पावसाने रौद्र रूप घेतले असून, राज्यात मोठा विध्वंस झाला आहे. २० जूनपासून ६ जुलैपर्यंत सातत्याने पाऊस सुरूच आहे. या काळात तब्बल १९ वेळा ढगफुटी झाली आहे. या मुसळधार पावसामुळे राज्यात २३ ठिकाणी पूर आला आहे. तसेच अनेक ठिकाणी भूस्खलन घडले आहे. त्यामुळे अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
(Tahawwur Rana) मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार तहव्वूर राणाला १० एप्रिल रोजी भारतात आणण्यात आले. अमेरिकेकडून प्रत्यार्पणासाठी हिरवा कंदील दाखवल्यानंतर त्याला भारतीय तपास यंत्रणांनी भारतात आणले. सध्या तो एनआयएच्या कोठडीत आहे. चौकशीदरम्यान, आता त्याने २६/११ च्या हल्ल्याबाबत मोठी कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे.
; प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनावेळी दक्षता घेण्याचे निर्देश महापालिकेच्या प्रलंबित प्रकल्पांना गती देऊन, त्यात प्रकल्पबाधितांना घरे दिल्यानंतर मोकळ्या होणाऱ्या जागांवर कोणत्याही परिस्थितीत पुन्हा अतिक्रमण होणार नाही, याची काटेकोरपणे दक्षता घेण्याचे निर्देश केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री तसेच उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल यांनी मुंबई महापालिका अधिकाऱ्यांना दिले आहेत. अतिक्रमण झाल्यास कठोर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला.
अक्कलकुवा तालुक्यातील मृत अंगणवाडी सेविकेच्या नावे पगार उचलल्याच्या प्रकरणाचे पडसाद सोमवारी विधानसभेत उमटले. या प्रकरणात बाल विकास प्रकल्प अधिकारी आणि पर्यवेक्षिकेला चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित करण्याची घोषणा महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सोमवार, दि. ७ रोजी केली.
आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी बिहारमध्ये मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) करण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांची यादी तयार करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सहमती दर्शवली. या याचिकांवर येत्या १० जुलै रोजी सुनावणी होईल.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (रा. स्व. संघ) शताब्दी वर्षानिमित्ताने देशभरात हिंदू संमेलनांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रभाषा असून प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून व्हावे, असे संघाचे मत असल्याचे प्रतिपादन रा. स्व. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी सोमवारी प्रांत प्रचारकांच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकारपरिषदेत केले.
महाराष्ट्राचे सुपुत्र, न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाल्याबद्दल मंगळवार, दि. ८ जुलै रोजी महाराष्ट्र विधानमंडळातर्फे त्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. हा गौरव सोहळा दुपारी २ वाजता विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
राज्यातील फुल उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी कृत्रिम फुलावर बंदी घालण्यासंदर्भात पर्यावरण मंत्र्यांच्यासोबत बैठक घेऊन याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असे फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी सोमवारी विधानसभेत सांगितले.
संकल्प संस्था गेली १२ वर्षापासून चेंबूर गोवंडी शिवाजी नगर मानखुर्द या एम/पूर्व विभागात वस्ती विकास प्रकल्प अंतर्गत शैक्षणिक आरोग्य,महिला सक्षमीकरण आणि वस्ती संघटन या विषयावर कार्य करीत आहे. मानखुर्द येथे संकल्प संस्था आणि आरिन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एम/पूर्व मानखुर्द विभागातील गरजू होतकरू विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप करण्यात आले. यासाठी संकल्प संस्थाचे अध्यक्ष विनोद हिवाळे तसेच आरीन फाऊंडेशनचे अध्यक्ष नितेश मिसाळ यांनी पुढाकार घेतला.
नितेश तिवारी दिग्दर्शित आणि रणबीर कपूर-यश यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘रामायण’ चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, तो सध्या सोशल मीडियावर आणि बॉलीवूडमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. ‘भारतीय सिनेमा इतिहासातील सर्वात मोठा चित्रपट’ असा उल्लेख मिळवणाऱ्या या महाकाव्यावर निर्मात्यांनी अफाट खर्च केला असून, त्यामुळेच हा चित्रपट ‘हिट’ ठरवण्यासाठीही त्याला तितक्याच मोठ्या संख्येने कमाई करावी लागणार आहे.
देशाच्या अनेक भागात रविवारी मोहरम ताजिया मिरवणुकीदरम्यान हिंसाचार आणि तणावाच्या घटना घडल्या. विशेषतः मध्य प्रदेशातील उज्जैन आणि बिहारमधील कटिहार येथे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती, जेथे मिरवणुकीत सहभागी असलेल्या काहींनी मंदिरांना लक्ष्य केले, पोलिसांवर हल्ला केला आणि परिसरात तणाव निर्माण केला.
मराठी माणसाच्या स्वाभिमानावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या कोणत्याही वक्तव्याला महाराष्ट्र सहन करणार नाही, असा खणखणीत इशारा देताना भाजप आमदार आणि मंत्री आशिष शेलार यांनी झारखंडचे खासदार निशिकांत दुबे यांच्या वादग्रस्त विधानाचा विधानसभेत समाचार घेतला. “हिंमत असेल तर बिहार, तामिळनाडू, उत्तर प्रदेशात या, महाराष्ट्राबाहेर पडा, तुम्हाला आपटून मारू,” असे आक्षेपार्ह वक्तव्य दुबे यांनी केल्यानंतर मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. शेलार यांनी “मराठी माणूस कोणाच्या तुकड्यावर जगत नाही आणि महाराष्ट्र तर मुळीच नाही,”
'उमरखाडी पुनर्वसन समितीने एकूण ८१ इमारतींच्या समुह पुनर्विकासाचा प्रस्ताव दि.०३ डिसेंबर २०२४ रोजी म्हाडा प्राधिकरणाकडे सादर केला होता. या प्रस्तावाच्या अनुषंगाने प्रकल्प व्यवहार्यतेची फेरतपासणी करण्याकरीता वास्तुशास्त्रज्ञाची नियुक्ती करण्यात आली आहे. वास्तुशास्त्रज्ञाकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुनर्विकासाबाबतची पुढील कार्यवाही म्हाडामार्फत करण्यात येईल' अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली आहे. तारांकित प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती सादर केल
पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ व ७ जुलै रोजी ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे आयोजित केलेल्या सतराव्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभाग घेतला. जागतिक स्तरावर प्रशासनात सुधारणा, साउथ ग्लोबल देशांचा आवाज अधिक बुलंद करणे, शांतता आणि सुरक्षा, बहुपक्षीयता बळकट करणे, विकासाचे मुद्दे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यासह ब्रिक्स कार्यक्रम सूचीवरील विविध मुद्द्यांवर सर्व नेत्यांनी चर्चा केली.
गौरीपाडा या प्रभागातील स्थानिक नागरिकांच्या मागणी नुसार भाजपा विधानसभा संयोजक अर्जुन म्हात्रे यांच्या प्रयत्नांतुन आमदार विश्वनाथ भोईर यांच्या आमदार निधीतून कर्नाळादेवी तलाव ते गौरीपाडा दत्तमंदिर पर्यंतचा रस्ता बनवण्यात येणार आहे. या कामाकरिता आमदार विश्वनाथ भोईर यांनी १ कोटी निधी उपलब्ध करून दिला असून त्याद्वारे ह्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचे काम केले जाणार आहे. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून नागरिकांनी आमदार भोईर यांचे आभार मानले आहेत.
महाराष्ट्रातील शेतकरी मोठया प्रमाणावर कांदा पिकाचे उत्त्पन्न घेतात. केंद्र शासनाने या शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करावा अशी मागणी राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सोमवारी केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या सोबत झालेल्या बैठकीत केली. ही मागणी मान्य झाल्यास राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
२०१९ साली प. बंगालच्या संदेशखालीमध्ये उसळलेल्या दंगलीत तीन भाजप कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला होता. हे हत्या प्रकरण साहजिकच ममता सरकारच्या विस्मृतीत गेले असले, तरी आता ‘सीबीआय’कडून या प्रकरणी कठोर तपास केला जाईल. दुसरीकडे कर्नाटकात घडलेली देवतांच्या मूर्तींची विटंबना असेल किंवा बिहारमध्ये मोहरम निवडणुकीवेळी निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्थिती, यासांरख्या घटनांमध्ये सहभागी हिंदूविरोधी समाजघटकांना जन्माची अद्दल घडवली पाहिजे.
शिवसेना सोडण्यापूर्वी राज माझ्याकडे आला आणि नाशिकची मागणी केली,” अशी आठवण खुद्द हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बर्याच वर्षांपूर्वी एका मुलाखतीमध्ये सांगितली होती. "नाशिक शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि कायम राहील,” असे बाळासाहेब नेहमी म्हणत. ते होते तोपर्यंत हे खरेही होते. मात्र, त्यांच्यापश्चात पक्षावर मांड ठोकलेल्या उद्धव ठाकरे यांच्या हातातून हा बालेकिल्ला पूर्णपणे सुटला आहे. त्याचा पाया राज ठाकरे, तर कळस भाजप आणि एकनाथ शिंदे यांनी चढवण्याचे काम केले. आपल्या पहिल्याच निवडणुकीत मनसेने ना