'या' तारखेपासून पेट्रोल चक्क 45 रुपये लीटर? काय आहे व्हायरल पोस्टचं सत्य?

    08-Jul-2025
Total Views |

Petrol price Rs 45 per liter What is the truth behind a viral post 
 
 
नवी दिल्ली : सध्या सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असणारे एक पोस्टर चांगलेच व्हायरल होत आहे. ज्यात १ जुलै २०२५ पासून पेट्रोलची किंमत ४५ रुपये प्रतिलिटर होणार असल्याचा खोटा दावा करण्यात आला आहे.
 
व्हायरल काय होत आहे?
 
पोस्ट व्हायरल करणारे वापरकर्ते असा दावा करत आहेत की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ जुलैपासून पेट्रोल ४५ रुपये प्रति लिटरने विकले जाईल अशी घोषणा केली आहे. हा खोटा दावा सोशल मीडियाच्या इन्स्टाग्राम प्लॅटफॉर्मवर सर्वात प्रथम व्हायरल करण्यात आला होता. एडिट शायर कुशवाहाजी नावाच्या एका इन्स्टाग्राम वापरकर्त्याने पंतप्रधान मोदींच्या फोटोसह या पोस्टरमध्ये लिहिले की, "१ जुलै २०२५ पासून मोदींनी पेट्रोल १०० रुपये प्रति लिटर किंमतीवरून ४५ रुपये प्रति लिटर विकले जाईल." परंतू पडताळणी तपासात हा दावा फेक आणि लोकांची दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट केले.
 
व्हायरल दाव्याची चौकशी
 
फॅक्ट चेक टीमने व्हायरल दाव्याची सत्यता जाणून घेण्यासाठी पोस्ट संबंधित कीवर्डचा शोध घेण्यात आला. पण, पंतप्रधान मोदींनी पेट्रोलची किंमत ४५ रुपयांपर्यंत कमी केल्याचे कोणताही विश्वासार्ह वृत्त रिपोर्ट आढळला नाही, तसेच सरकारने किंवा कोणत्याही एजन्सीने पेट्रोलच्या किंमतीत कोणतीही कपात केले नसल्याचे जाहीर झाले. व्हायरल पोस्टमधील दावा पूर्णपणे खोटा असून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अधिक लाईक्स मिळवण्यासाठी फेक वापरकर्त्यांकडून तयार केलेला खोटा दावा असल्याचे स्पष्ट झाले.