जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसायन्सेसनुसार, बुधवार १३ मे २०२५ रोजी ग्रीसमधील क्रेते बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप झाला. हा भूकंप ८३ किलोमीटर खोलवर झाला असल्याचे जीएफझेडने सांगितले आहे. कोणत्याही जीवितहानी किंवा मोठ्या मालमत्तेच्या नुकसानीची नोंद नाही. स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन पथकांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Read More
अमेरिकेचे नियोजित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दि. 20 जानेवारी रोजी शपथबद्ध होऊन ‘व्हाईट हाऊस’चा उंबरठा ओलांडतील. पण, तत्पूर्वीच अमेरिकेच्या शत्रूराष्ट्रांसह मित्रराष्ट्रांनाही ट्रम्प आणि त्यांचे साथीदार मस्क यांनी घाम फोडला आहे. ब्रिटनही त्यापैकीच एक. तेव्हा, ट्रम्प यांच्या सत्तारोहणापूर्वी ब्रिटनला ग्रहण का लागले, त्याचा उहापोह करणारा हा लेख...
पाश्चात्त्य देश म्हंटले की, अभिव्यक्तिस्वातंत्र्य समता वगैरे वगैरे संकल्पना लोकांच्या डोळ्यासमोर आजही येतात. मात्र, मध्य अमेरिकेतील मेक्सिकोमध्ये तर १९५३ साली महिलांना पहिल्यांदा मतदानाची संधी मिळाली आणि या देशाला पहिली महिला राष्ट्राध्यक्ष मिळण्यासाठी २०२४ साल उजाडावे लागले. आजही दर दिवशी मेक्सिकोमध्ये दहा महिलांचा खून होतो आणि वर्षाला हजारो महिला बेपत्ता होतात. त्या मेक्सिकोमध्ये जन्माने ज्यू असलेल्या क्लाऊडिया शीनबाम राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्या. अर्थात, याचे पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटले नसते त
अयोध्येतील राम मंदिराच्या 'प्राण प्रतिष्ठा' (अभिषेक) सोहळ्याच्या निमित्ताने दि. २१ जानेवारी रोजी मेक्सिकोला पहिले प्रभू राम मंदिर मिळाले. हे मंदिर क्वेरेटारो शहरात आहे. 'प्राण प्रतिष्ठा' सोहळ्यानंतर हे मंदिर अधिकृतपणे उघडले जाईल.
विश्वात एलियन्स अस्तित्वात आहेत का? पृथ्वीशिवाय इतर कोणत्याही ग्रहावर जीवसृष्टी आहे का? हा असा प्रश्न अनेकांना पडतो. इतकंच काय ह्याचे उत्तर आजपर्यंत शास्त्रज्ञ ही शोधू शकलेले नाहीत. तथापि, जगभरात असे अनेक लोक आहेत ज्यांनी एलियन्स (यूएफओ) पाहिल्याचा दावा केला आहे. पण आता याच दरम्यान मेक्सिकोने असा दावा केल्याने संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. शास्त्रज्ञांनी प्रथमच एलियन्सचा कथित मृतदेह जगासमोर आणला आहे.
चीनने भारताच्या ‘जी २०’ दस्तऐवजांवर ‘वसुधैव कुटुम्बकम्’ असा शब्दप्रयोग करण्यास नुकताच विरोध नोंदवल्याचे वृत्त झळकले. संस्कृत ही संयुक्त राष्ट्रात मान्यता प्राप्त भाषा नसल्याच्या कारणावरून चीनने हा शब्दप्रयोग उचित नसल्याचे म्हटले आहे. गोव्यात ‘जी २०’ ऊर्जा बदल मंत्रिमंडळाच्या बैठकीचे परिणाम दस्तऐवज आणि अध्यक्षांच्या सारांशमध्ये ‘वसुधैव कुटुम्बकम्’ हा शब्दप्रयोग करण्यात आला होता, त्यावर चीनने आक्षेप घेतला. ‘जी २०’ दस्तऐवजामध्ये ‘वसुधैव कुटुम्बकम्’चे ‘एक पृथ्वी, एक परिवार, एक भविष्य’ असे इंग्रजी भाषांतर समाविष
गेल्याच आठवड्यात सात युवक बेपत्ता झाले. पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यात आली. त्या युवकांचे काय झाले? जीवंत आहेत की मृत्यू पावलेत, की त्यांच्यासोबत आणखी काही घडले आहे का? असा प्रश्न या युवकांच्या कुटुंबाना सतावत होता. मात्र, पोलिसांनी शोध सुरू केल्यावर त्याचे धागेदोरे सापडले आणि सगळेच हादरले. पोलीस पथकाला एका खड्ड्यात बॅग मिळाल्या आणि त्यामध्ये मानवी अवशेष सापडले. ही घटना आहे मेक्सिकोची. मेक्सिकोच्या ग्वाडलाजाराच्या जार्डिन्स वालार्टा आणि ला एस्टैंसिया इथून सात युवक बेपत्ता झाले होते. त्यांचा काहीच शोध लागला ना
काल-परवा घडलेली एक घटना. ग्वाटेमाला देशाच्या सीमेवरून मेक्सिकोकडे जाणारा तो ट्रक बंद होता. पण, त्यात क्षमतेपेक्षा जास्त वस्तू असाव्यात. कारण, तो ट्रक चालताना हलत होता. शेवटी ग्वाटेमालाच्या सीमेवर तैनात असलेल्या सीमारक्षकांना संशय आला. तसेही सीमापार जाणार्या बंद वाहनांची तपासणी करायचीच असते. मात्र, हा ट्रक सीमेवर थांबला आणि भराभर लोक ट्रकमधून उड्या मारून पळू लागले. मेक्सिको आणि ग्वाटेमाला देशाच्या सीमेवर असलेल्या घनदाट जंगलात लपले. ट्रकमधून उतरताना काही लोक पडले. त्यांना जखमा झाल्या, तर काही लोक ट्रकमध्येच
मेक्सिको लिओन येथे सुरु असलेल्या जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत आकांशा व्यवहारेनी ऐतिहासिक कामगिरी बजावली. आकांक्षाने आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ४० किलो वजनी गटात भारतासाठी ५९ किलो स्नॅच व ६८ किलो क्लिन जर्क असे १२७ किलो वजन उचलून वेटलिफ्टिंग स्पर्धेत रौप्यपदक पटकावले.
२००६ ते आजपर्यंत मेक्सिकोमध्ये एक लाखांपेक्षा जास्त लोक हरवले आहेत, त्यांचे अपहरण झाले. पण, त्यांचा अद्याप मागमूसही नाही. दि. १ मे रोजी मेक्सिकोमध्ये हजारो लोकांनी हरवलेल्या नातेवाईकांसाठी मोर्चा काढला
गेल्या चार दिवसांमध्ये अमेरिकेमधील दक्षिण पाद्रे बेटावर ३ हजाराहून अधिक समुद्री कासवे वाहून आली आहेत. मॅस्किकोच्या आखातामधील तापमानाचा पारा उतरल्यामुळे थंड पडलेली कासवे समुद्र किनाऱ्यांवर वाहून आली आहेत. स्थानिक प्रशासन वन्यजीव बचाव कार्यकर्त्यांच्या मदतीने या कासवांना वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत.
पेजली फिश आणि मी दोघे जिवलग मित्र होतो. पेजली आणि माझ्या आवडीनिवडी भिन्न होत्या. त्याला वाचनाची आवड, मी अरसिक. रात्री उशिरापर्यंत तो शेक्सपिअरची पुस्तकं वाचत किंवा बासरी वाजवत बसायचा, तेव्हा मी मद्यपान करीत उद्याच्या कामाची आखणी करायचो.
मराठीत काही ठिकाणी तिला ’ओसाडी’ म्हणतात. या वनस्पतीला 'Mexican Devil’ म्हणण्याचं कारण ही मूळची मेक्सिको देशातली वनस्पती आज जगात अनेक देशांमध्ये बेसुमार फोफावून तिथल्या जैवविविधतेला घातक ठरत आहे. Asteraceae कुळातली ही वनस्पती मूळची मेक्सिकोची. हिरवी त्रिकोणी पानं आणि पांढरी फुलं येणारी ही वनस्पती एक ते दोन मीटर उंचीपर्यंत वाढते. याची मुळे पिवळसर असून त्यांना उग्र वास असतो. याची पांढरी फुलं दिसायला सुंदर असल्याने ही वनस्पती शोभेसाठी म्हणून अनेक देशांमध्ये नेऊन तिथल्या बागांमध्ये लावली गेली.
मेक्सिकोमधील हिंसा आणि गुन्हेगारीकरण फक्त ड्रग्जमाफियांपुरतेच मर्यादित नाही, तर राजकीय हिंसाचाराचे प्रमाणही धक्कादायक आहे. २००८ ते २०१२ या पाच वर्षांच्या काळात राजकारण्यांच्या हत्यांचे प्रमाण हे तब्बल २४०० टक्के इतके प्रचंड होते.
राष्ट्रवादाची ही चेतना केवळ ब्रिटन वा अमेरिकाच नव्हे तर फ्रान्स, हंगेरीसह अनेक युरोपीय देशांत निर्माण झाल्याचे गेल्या काही काळातील घटनांवरून दिसते. एरवी उदारतेचा, सर्वसमावेशकतेचा दावा करणार्या युरोपीयन देशांवरही स्वतःपुरते पाहण्याची वेळ आणली ती अरब आणि आखाती देशातील मुस्लीम निर्वासितांनी.
धेरी वाकोला परिसरात अंमली पदार्थविरोधी पथकाच्या आझाद मैदान युनिटने १०० किलो फेंटांनिल जप्त केले असून त्याची किंमत जवळपास १ हजार कोटी असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सुरक्षा भिंतीच्या मुद्द्यावर तोडगा निघणे सोपे नाही. गेल्या महिन्यात झालेल्या मध्यावधी निवडणुकांनंतर प्रतिनिधीगृहात आता डेमोक्रॅटिक पक्षाचे बहुमत आले असून नवनिर्वाचित सदस्य ३ जानेवारी, २०१९ रोजी शपथ घेतील. त्यानंतर प्रतिनिधीगृहामार्फत ट्रम्प यांना वेसण घालण्याच्या प्रयत्नांना वेग येईल. ट्रम्प यांनीही दीर्घ पल्ल्याच्या लढाईची तयारी ठेवली असल्याने ठप्प पडलेली व्यवस्था पूर्वपदावर येण्याची चिन्हं नाहीत.
गेल्या काही काळापासून ट्रम्प सरकारने घेतलेल्या अमेरिकाधार्जिण्या धोरणांचा हाच काय तो परिणाम समजावा का?
शुक्रवारी मध्यरात्रीपासून अमेरिकेत सरकारला शटडाऊन लागू करावे लागला आहे.
बांगलादेशात ‘ड्रग्ज लॉर्ड’चा प्रशासनाने गळा आवळत तब्बल १०० ड्रग्जमाफियांना यमसदनी धाडले आहे.