बांगलादेश मेक्सिकोच्या मार्गावर?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-May-2018   
Total Views |


 

 
बांगलादेशात ‘ड्रग्ज लॉर्ड’चा प्रशासनाने गळा आवळत तब्बल १०० ड्रग्जमाफियांना यमसदनी धाडले आहे. फिलिपाईन्समध्येही जेव्हा हे ‘ड्रग्ज लॉर्ड’ डोईजड झाले, तेव्हा तिथल्या प्रशासनाने ड्रगमाफियांविरोधात मोर्चा उघडत त्यांना कंठस्नान घातले.

मेक्सिको हा अमेरिकेचा शेजारी. पाब्लो एस्कोबार हा तिथला कुविख्यात ड्रगमाफिया. त्याने मेक्सिकोमध्ये ड्रग्जचा व्यवसाय इतका विस्तारला की ड्रग्जच्या विक्रीत मेक्सिको आघाडीचा देश... संपूर्ण देशाची व्यवस्था भ्रष्टाचाराने माखून एस्कोबार हे कार्य करत होता. हे ड्रग्ज मोठ्या प्रमाणात अमेरिकेत बेकायदेशीररित्या दाखल झाल्याने तेथील ‘ड्रग्ज एन्फोर्समेंट’ने या माफिया आणि त्याच्या ड्रग्जच्या जाळ्यावरोधात आघाडी उघडली आणि माफियाराजचा खात्मा केला. या सगळ्यात मोठ्या प्रमाणात हिंसा झाली. आज हे सगळे आठवण्याचे कारण म्हणजे, बांगलादेशही मेक्सिकोच्या मार्गावर चालला आहे की काय, अशी शंका यावी अशी घटना घडली आहे. नुकतंच बांगलादेशात ‘ड्रग्ज लॉर्ड’चा प्रशासनाने गळा आवळत तब्बल १०० ड्रग्जमाफियांना यमसदनी धाडले आहे. फिलिपाईन्समध्येही जेव्हा हे ‘ड्रग्ज लॉर्ड’ डोईजड झाले, तेव्हा तिथल्या प्रशासनाने ड्रगमाफियांविरोधात मोर्चा उघडत त्यांना कंठस्नान घातले. यामुळे फिलिपाईन्स आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा गदारोळ झाला. मानवी हक्कासाठी लढणार्‍यांनी याविरोधात मोठा आवाज उठवला. पण, फिलिपाईन्सच्या प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष करत आपली कारवाई चालूच ठेवली. आता ड्रग्जमाफियांविरोधात तशीच कडक कारवाई बांगलादेशात होईल का? अशी शंका आता वर्तविण्यात येत आहे.

बांगलादेशची अर्थव्यवस्था ही जगातील ४४ या क्रमांकावरची. विकसनशील देशांच्या वर्गात मोडणार्‍या या देशात प्रामुख्याने रेडिमेड कपडे आणि शेती ही संपत्तीनिर्मितीची प्रमुख माध्यमं. तसेच, परकीय मदतीवरही या देशाचा कारभार तितकाच अवलंबून आहे. बांगलादेशात देहविक्रीला शासनाची मान्यताही आहे. त्यामुळे या गोष्टींवरून बांगलादेशाची आर्थिक परिस्थिती किती वाईट आहे, हे लक्षात येईल.

दि. १५ मे रोजी प्रशासनाने ड्रग्जमाफियांविरोधात आघाडी उडली आणि अवघ्या १४ -१५ दिवसांत १०० असे माफिया मृत्युमुखी पडल्याने स्थानिक माध्यमांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. या कारवाईदरम्यान बाराशे लोकांना अटक करण्यात आली. या सर्व घडामोडींवर तेथील प्रशासनाचे म्हणणे आहे की, पोलिसांच्या चकमकीत फार कमी जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यांना पोलिसांनी ठार केले, त्यांच्यावर किमान १० -१२ गुन्हे दाखल आहेत. तसेच घटनास्थळी त्या माफियांकडे बंदुकाही आढळून आल्या. पोलिसांनी विचारणा केली असता, त्यांनी पहिल्यांदा गोळीबारास सुरुवात केली आणि या चकमकीत माफियांचा मृत्यू ओढवला. बहुसंख्य ‘ड्रग्ज लॉर्ड’ हे आपापसांतील संघर्षामुळेच मेले. त्यांच्या झालेल्या मतभेदामुळे अनेक गट आपापसांत भिडले, गोळीबार झाला आणि लोकांनी आपला जीव गमावला. बांगलादेश हा २०१६ पासून ड्रग्ज निर्मिती-विक्रीचे स्वर्ग असणारा मेक्सिको होतोय की काय, हे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

नोव्हेंबर २०१६ मध्ये तब्बल २ कोटी ९० लाख ‘मेथाफेटामाईन’ या ड्रग्जच्या गोळ्या प्रशासनाने जप्त केल्या. मागच्या वर्षी चार कोटी ड्रग्जच्या कॅप्सुल्स प्रशासनाने जप्त केल्या. पण, एक माहिती पुढे समोर आली की, एकूण कॅप्सुल्सची संख्या ही २५ ते ३० कोटींच्या घरात होती. पण, त्यापैकी फक्त चार कोटी कॅप्सुल्स हस्तगत करण्यात त्यांना यश आले. त्यामुळे बांगलादेशमधील या ड्रग्जमाफियांविरोधांतील कारवाईला पंतप्रधान शेख हसीना यांचा पूर्ण पाठिंबा असून या कारवाया अशाच पुढे चालू ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. तसेच ड्रग्जमाफियांनाही त्यांनी खडसावून असून ही कारवाई अधिकाधिक तीव्र करण्याचे पोलिसांना आदेश दिले आहेत.

गेल्या काही महिन्यांत बांगलादेशमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे. कारण, काही महिन्यांपूर्वी आरक्षणाविरोधात विद्यार्थ्यांनी मोठी निदर्शने केली होती. यावेळी हिंसाचारही उफाळून आला होता. शेवटी जनमताचा कल पाहता, पंतप्रधानांना आरक्षण मागे घ्यावे लागले. आता या ड्रग्जमाफियांविरोधात आघाडी उघडल्याने काही निष्पाप नागरिकांचाही त्यामध्ये बळी गेल्याचे वृत्त आहे. तेव्हा ओल्याबरोबर सुकेही जळते हा इतिहास आहे. यावर एकच मार्ग म्हणजे, रोजगारनिर्मिती आणि अर्थव्यवस्थेचे बळकटीकरण. कारण, जेव्हा लोकांच्या हाती काम नसतं, पोटाला अन्न नसतं, तेव्हा नाईलाजाने लोक वाममार्गाकडे वळतात. म्हणूनच, तरुणांना चांगल्या शैक्षणिक सुविधा आणि उद्योजकतेला प्रोत्साहन दिल्यास ड्रग्जसारख्या नशेच्या व्यवसायावर पायबंद बसेल.

@@AUTHORINFO_V1@@