Megablock

धारावीमधील मुले शाळा का सोडतात? गरिबी आणि जागरूकतेचा अभाव यामुळे विद्यार्थ्यांची गळती

भारतामधील सर्वाधिक साक्षर झोपडपट्टीपैकी एक असलेल्या धारावीत शालेय विद्यार्थ्यांची गळती रोखण्याचे आव्हान आहे. राज्य शासन आणि विविध स्वयंसेवी संस्था प्रयत्नशील असताना गरिबी, असुरक्षित वातावरण, खराब आरोग्य आणि शिक्षणाविषयी जागरूकतेचा अभाव यामुळे अनेक मुले वेळेपूर्वीच शिक्षणव्यवस्थेच्या बाहेर पडत आहेत. “या शैक्षणिक वर्षातच, १०० हुन अधिक विद्यार्थ्यांनी विविध वर्गांमधून शाळा सोडली असून, हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे,” असे गांधी मेमोरियल शाळेचे मुख्याध्यापक जे. चेल्लादुराई यांनी सांगितले.

Read More

लोकशाहीच्या मंदिराला तत्त्व, शिस्त आणि नियमांद्वारे नवी दिशा देणारा दीपस्तंभ!

Rahul Narvekar felicitated program organized by the Cuffe Parade Federation.

Read More

आर्थिक सामाजिक मागास कुटूंबातील विद्यार्थ्यांची शिक्षणाची वाट सुरळीत : विशाल परब

कोकण कला व शिक्षण विकास संस्था, मुंबई यांच्या माध्यमातून प्रत्येक शैक्षणिक वर्षात हजारो विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचे उपक्रम राबविला जातो. यावर्षी हि आतापर्यंत सिंधुदुर्ग, पुणे, बीड,अहिल्याबाई नगर, ठाणे, रायगड सह अनेक जिल्ह्यात शैक्षणिक साहित्य वाटप संपन्न झाले असून याच वाटपाचा भाग म्हणून आज श्री माउली विद्यामंदिर डोंगरपाल येथे ३१ शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक असलेलं शालेय साहित्य उपलब्ध करून देण्याच्या हेतूने हा उपक्

Read More

मनसेला झटका! अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई

(Avinash Jadhav) मीरा-भाईंदर शहरात गेल्या काही दिवसांपासून मराठीवरुन वातावरण चांगलेच तापले आहे. अमराठी व्यापाऱ्यांनी केलेल्या शक्तीप्रदर्शनाला प्रत्युत्तर म्हणून मीरा-भाईंदर शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज (८ जुलै) मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र, पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारत प्रतिबंधात्मक कारवाईला सुरूवात केली आहे. सोमवारपासून पोलिसांनी मनसे आणि उबाठाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यास सुरुवात केली होती. मंगळवारी पहाटे पोलिसांनी आणखी कठोर पाऊल उचलत मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव

Read More

सौरग्राम स्पर्धेमध्ये राज्यातील ६३ गावांचा सहभाग ; विजेत्या गावाला केंद्राकडून एक कोटी रुपयांचे अनुदान

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घेऊन देशातील प्रत्येक जिल्ह्यात एक मॉडेल सौर ग्राम निर्माण करण्यासाठी सुरू केलेल्या स्पर्धेसाठी राज्यातील सहा जिल्ह्यातील ६३ गावांची निवड करण्यात आली आहे. यशस्वी गावाला केंद्र सरकारकडून एक कोटी रुपयांचे अनुदान मिळणार असून या स्पर्धेत भाग घेणाऱ्या गावांपैकी सहा महिन्यात सर्वाधिक सौर ऊर्जा क्षमता निर्माण करणाऱ्या गावाची विजेता म्हणून निवड करण्यात येणार आहे, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली.

Read More

मराठी माणूस कोणाच्या तुकड्यावर जगत नाही! - मंत्री आशिष शेलार यांनी खा. निशिकांत दुबेंना सुनावले

मराठी माणसाच्या स्वाभिमानावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या कोणत्याही वक्तव्याला महाराष्ट्र सहन करणार नाही, असा खणखणीत इशारा देताना भाजप आमदार आणि मंत्री आशिष शेलार यांनी झारखंडचे खासदार निशिकांत दुबे यांच्या वादग्रस्त विधानाचा विधानसभेत समाचार घेतला. “हिंमत असेल तर बिहार, तामिळनाडू, उत्तर प्रदेशात या, महाराष्ट्राबाहेर पडा, तुम्हाला आपटून मारू,” असे आक्षेपार्ह वक्तव्य दुबे यांनी केल्यानंतर मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. शेलार यांनी “मराठी माणूस कोणाच्या तुकड्यावर जगत नाही आणि महाराष्ट्र तर मुळीच नाही,”

Read More

उमरखाडी समूह पुनर्विकास प्रकल्प व्यवहार्यतेची फेरतपासणी - अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुनर्विकासाबाबतची पुढील कार्यवाही

'उमरखाडी पुनर्वसन समितीने एकूण ८१ इमारतींच्या समुह पुनर्विकासाचा प्रस्ताव दि.०३ डिसेंबर २०२४ रोजी म्हाडा प्राधिकरणाकडे सादर केला होता. या प्रस्तावाच्या अनुषंगाने प्रकल्प व्यवहार्यतेची फेरतपासणी करण्याकरीता वास्तुशास्त्रज्ञाची नियुक्ती करण्यात आली आहे. वास्तुशास्त्रज्ञाकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुनर्विकासाबाबतची पुढील कार्यवाही म्हाडामार्फत करण्यात येईल' अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली आहे. तारांकित प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती सादर केल

Read More

कर्नाळादेवी तलाव ते गौरीपाडा दत्तमंदिर पर्यंत सिमेंट रस्त्याच्या काँक्रीटच्या कामाचे भूमिपूजन संपन्न...

गौरीपाडा या प्रभागातील स्थानिक नागरिकांच्या मागणी नुसार भाजपा विधानसभा संयोजक अर्जुन म्हात्रे यांच्या प्रयत्नांतुन आमदार विश्वनाथ भोईर यांच्या आमदार निधीतून कर्नाळादेवी तलाव ते गौरीपाडा दत्तमंदिर पर्यंतचा रस्ता बनवण्यात येणार आहे. या कामाकरिता आमदार विश्वनाथ भोईर यांनी १ कोटी निधी उपलब्ध करून दिला असून त्याद्वारे ह्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचे काम केले जाणार आहे. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून नागरिकांनी आमदार भोईर यांचे आभार मानले आहेत.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121