Ecom Gaming

हृषिकेश जोशींची पोस्ट चर्चेत; पुण्यातील 'संन्यस्त खड्ग' नाटकाच्या प्रयोगावेळी नेमकं काय घडलं?

(Hrishikesh Joshi Post) पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात १२ जुलै रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर लिखित 'संगीत संन्यस्त खड्ग' या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. संध्याकाळी साडेसहा वाजता नाटकाला सुरुवात झाली, पण रात्री साडेआठच्या सुमारास वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी नाट्यगृहात गोंधळ घालायला सुरुवात केली, त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, पुण्यात हे नाटक बंद पाडले गेले, अशा बातम्या माध्यमांमध्ये आल्या होत्या. त्याबाबत अभिनेते आणि नाटकाचे दिग्दर्शक हृषि

Read More

महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय विद्यापीठ नव्या संधी घेऊन येणार

प्रा.डॉ.शिवाजी सरगर यांनी व्यक्त केला विश्वास "नवे राष्ट्रीय शिक्षा धोरण २०२०मुळे गेल्या ७० ते ७५ वर्षाच्या शैक्षणिक इतिहासात हे चौथे सर्वात शिक्षण मोठे धोरण आहे. नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवल्याने भारतीय आणि विशेषतः महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना विकासाच्या आणि शिक्षणाच्या मोठ्या संधी यानिमित्ताने निर्माण होणार आहेत", असा विश्वास मुंबई विद्यापीठ सेंटर फॉर डिस्टन्स अ‍ॅण्ड ऑनलाइन लर्निंगचे संचालक प्राचार्य डॉ.शिवाजी सरगर यांनी दैनिक मुंबई तरुण भारतशी संवाद साधताना व्यक्त केला. 'नवे शैक्

Read More

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर

Read More

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ’जग ब

Read More

शेती ही केवळ अन्न देणारी व्यवस्था नसून, ती संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार आहे- उपमुख्यमंत्री अजित पवार

“शेती ही केवळ अन्न देणारी व्यवस्था नसून, ती संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार आहे” ही समज ठेवून आपण जर एकत्र काम केले, तर महाराष्ट्राची शेती ही डिजिटल युगात जगाला दिशा देणारी शेती बनेल, असा विश्वास उपमख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. राज्य शासनाचा कृषी विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि कृषी महाविद्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सिंचन नगर मैदान, कृषी महाविद्यालय येथे आयोजित पुणे ॲग्री हॅकॅथॉन कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

Read More

वैष्णवीच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या अ‍ॅड. दुशिंग यांच्यावर मारहाणीचा गुन्हा; जुनं प्रकरण काय?

(Vipul Dushing) पुण्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणी न्यायालयात हगवणे कुटुंबातील आरोपींची बाजू मांडणारे वकील विपुल दुशिंग हे सध्या चर्चेत आले आहेत. त्यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना केलेल्या खळबळजनक दाव्यांमुळे त्यांच्यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. वैष्णवीच्या चारित्र्यावर गंभीर आरोप करणाऱ्या या वकिल दुशींग यांच्यावरच सरकारी वकीलाला कॉलर पकडून मारहाण केल्याचा गुन्हा नोंद असल्याची माहिती माध्यमांमधून समोर आली आहे. काही वर्षांपूर्वीचं हे प्रकरण असून आता पुन्हा चर्चेत आलं आहे.

Read More

विज्ञानयोगी खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन!

मराठी मनांसाठी विज्ञान साहित्याचे समृद्ध दालन खुले करुन देणारे प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ, विज्ञान लेखक जयंत नारळीकर यांचे २० मे रोजी रोजी पुण्याच्या राहत्या घरी निधन झाले. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार निद्रीस्त असतानाच अनंतात विलीन झाले. त्यांच्या जाण्यामुळे केवळ मराठी साहित्यच नव्हे तर सबंध विज्ञानविश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनामुळे वैज्ञनिक, साहित्यिक तसेच शिक्षण क्षेत्रातील तेजस्वी तारा मावळला अशी प्रतिक्रिया वाचकांनी व्यक्त केली आहे.

Read More

पुणे भूमीअभिलेख विभागातील भ्रष्टाचाराचा पर्दाफाश; दोन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल, चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून गंभीर दखल

Chandrashekhar Bawankule पुणे जिल्ह्यातील भूमीअभिलेख विभागातील भ्रष्टाचाराच्या एका गंभीर प्रकरणाने खळबळ उडाली आहे. जमिनीच्या मोजणी आणि हद्द निश्चितीच्या कामासाठी ५० लाख रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपांनंतर भूमी अभिलेख विभागाचे उप-अधीक्षक अमरसिंह पाटील आणि भूकरमापक किरण येटोळे यांच्या विरोधात पुणे शहरातील आर्थिक व सायबर गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी तक्रारदाराने थेट महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे प्रकरणाची तक्रार केल्यानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेऊन कारवाई केली.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121