पुणे : (Vipul Dushing) पुण्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणी न्यायालयात हगवणे कुटुंबातील आरोपींची बाजू मांडणारे वकील विपुल दुशिंग हे सध्या चर्चेत आले आहेत. त्यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना केलेल्या खळबळजनक दाव्यांमुळे त्यांच्यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. वैष्णवीच्या चारित्र्यावर गंभीर आरोप करणाऱ्या या वकिल दुशींग यांच्यावरच सरकारी वकीलाला कॉलर पकडून मारहाण केल्याचा गुन्हा नोंद असल्याची माहिती माध्यमांमधून समोर आली आहे. काही वर्षांपूर्वीचं हे प्रकरण असून आता पुन्हा चर्चेत आलं आहे.
नेमकं काय घडलं होतं? त्यांच्यावर गुन्हा का दाखल झाला होता?
पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ न्यायालयात २०२२ एक घटना घडली होती. यामध्ये अॅड. विपुल दुशिंग हे आरोपीची केस लढवत होते. भर कोर्टात न्यायाधिशांसमोर सुनावणी सुरु असताना पुढची सुनावणीची तारीख घेण्यावरुन सरकारी वकील प्रेमकुमार अग्रवाल यांच्यासोबत त्यांचा वाद झाला. यावरुन अॅड. दुशिंग संतापले होते, त्यामुळं कोर्टरुमच्या बाहेर येताच त्यांनी आपल्या दोन सहकारी वकिलांसोबत अॅड. अग्रवाल यांची थेट कॉलर पकडली आणि मारहाण केली.अग्रवाल यांच्या तक्रारीनंतर वकील दुशींग आणि त्यांच्यासोबत असलेल्या अन्य दोन वकीलांवर वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने त्यावेळी अटकपूर्व जामीन दिल्याने दुशींग यांची अटक त्यावेळी टळली होती.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\