सांगण्यासारखे काही नसेल, तेव्हा माणूस आपल्या पूर्वजांच्या कर्तृत्त्वाच्या कथा सांगतो. राजकारणातही मतदारांच्या रोषापासून सुरक्षित राखण्यासाठी सत्ताधारी नेते प्रादेशिक अस्मिता आणि भाषेचा सोपा मुद्दा उपस्थित करतात. तामिळनाडूच नव्हे, तर आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही भाषेचा मुद्दा राजकारणात आणण्याचा प्रयत्न चालविला आहे. पण, ‘दक्षिण विरुद्ध उत्तर’ वगैरे तणाव हे भारतविरोधी ‘सोरोस टूलकिट’चा भाग आहेत, हे आता जनतेला कळून चुकले आहे.
Read More
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षांत सांस्कृतिक राष्ट्रवाद अतिशय जोरदारपणे मांडला आहे. त्याचप्रमाणे जागतिक अराजकतावाद्यांना भारतात ढवळाढवळ करण्यापासूनही रोखण्याचे यशस्वी प्रयत्न झाले आहेत. परिणामी भारतीय निवडणुकांनाच लक्ष्य करून त्याद्वारे भारतावर हल्ला करण्याचा पाश्चिमात्यांचा प्रयत्न आहे.
एकीकडे राहुल गांधी परदेशात जाऊन मोदी सरकार आणि भाजपवर टीका करत होते आणि दुसरीकडे ईशान्य भारतातील तिन्ही राज्यांमध्ये काँग्रेसचा पराभव होत होता. त्यामुळे राहुल गांधी यांनी ‘टूलकिट’च्या नादी न लागता पक्षबांधणीकडे लक्ष दिल्यास तेच काँग्रेसच्या हिताचे ठरेल.
‘सेंट्रल व्हिस्टा’ प्रकल्पाविषयी देशातील नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. संसदेच्या नव्या वास्तूसाठी ८६२ कोटी, तर ‘सेंट्रल व्हिस्टा’ पुनर्विकास प्रकल्पासाठी ४७७ कोटी, असा जवळपास १३०० कोटींच्या आसपास खर्च होणार आहे. त्यामुळे १३ हजार कोटींचा आकडा विरोधकांनी कसा काढला, असा सवाल केंद्रीय शहरी विकासमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी सोमवार, दि. ३१ मे विरोधकांना विचारला.
दिल्ली पोलीसांच्या चौकशीचे अमेरिकेत पडसाद
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप यांच्यावर टिका करण्यासाठी मार्गदर्शन करणारे एक टूलकीट उघडकीस आले आहे.
केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप यांना लक्ष्य करण्यासाठी काँग्रेस पक्षाने बनविलेले टूलकीट उघडकीस आले आहे. त्यावरून काँग्रेसची कोंडी झाली असून भाजप खासदार पूनम महाजन यांनीही काँग्रेसला सुनावले आहे.
ग्रेटा थनबर्गमुळे चुकून लीक झालेले ‘टूलकिट’ व दिशा रवी प्रकरणानंतर आपल्या देशात या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राची चर्चा चांगलीच रंगली आहे. ‘टूलकिट’ प्रकरण सामोरे आल्यानंतर त्यावरील अनेक अहवाल, अनेक व्हिडिओ समोर आले. परंतु, खरंतर या देशात हे षड्यंत्र गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे.
कृषी आंदोलनाशी निगडीत टुलकीट प्रकरणात वातावरण बदल कार्यकर्ती दिशा रविला जामीन मिळाला आहे. दिल्लीतील पतियाळा हाऊस न्यायालयाने मंगळवारी एक लाखांच्या बॉण्डवर सशर्थ जामीन दिला आहे. नऊ दिवसांच्या कोठडीनंतर दिशा आता बाहेर येणार आहे. या प्रकरणातील सह आरोपी शांतनु मुलुकनेही न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर बुधवारी सुनावणी होणार आहे.
दिशा रवी हिची अटक राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा ख्रिस्ती धार्मिक संस्थेने केले आहे
‘टूलकिट’प्रकरणी शिवसेनेचे माजी नगरसेवक गायब?
‘टूलकिट’ प्रकरणातील आरोपी दिशा रवी हिची दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयाने तीन दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. दरम्यान, दिशा चौकशीस सहकार्य करीत नसल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.
शेतकरी आंदोलनाला दिल्या गेलेल्या रंगामुळे देश आणि विदेश यांच्या सीमा पुसट झाल्या आहेत. पूर्वी एखाद्या देशाला दुसऱ्या देशाला गुडघे टेकायला लावायचे असतील, तर त्याविरुद्ध युद्ध लढावे लागे. दहशतवाद्यांना प्रशिक्षित करून त्यांना शस्त्रास्त्रं आणि पैसा पुरवून त्या देशात सोडावे लागे. आजच्या डिजिटल युगात असे काहीही करण्याची गरज नाही.
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ तथाकथित पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने एक ‘टूलकिट’ शेअर केले होते. त्यासंबंधी दिल्ली पोलिसांनी गुन्हा नोंद केला होता. आता ग्रेटा थनबर्ग ‘टूलकिट’ प्रकरणात पहिली अटक करण्यात आली. दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने बंगळुरुमधील २१ वर्षीय पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवीला अटक केली आहे. दिशा रवी 'फ्रायडे फॉर फ्युचर’ मोहिमेची संस्थापक सदस्य आहे. आता तिला पाच दिवसांच्या कोठडीत पाठवण्यात आले आहे.
इंटरनेट आणि माध्यम कंपन्यांनी सार्वभौम आणि लोकशाही देशांच्या कायद्यांना न जुमानता, स्वतःचे कायदे लावणे आणि वापरकर्त्यांच्या विचारधारेच्या आधारावर त्यांच्यासाठी वेगळा न्याय लावणे, हे जगाच्या शांतता आणि सौहार्दाच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते.
ग्रेटा थनबर्गच्या ‘त्या’ टूलकिटमुळे भारतात अराजक माजवण्यासाठीची खलिस्तानवाद्यांची ‘ट्विटरी टोळधाड’ अखेरीस त्यांच्यावरच उलटली. खलिस्तानवाद्यांनी ग्रेटा आणि इतर आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटीजना हाताशी धरून चालवलेले हे ‘गेटकिपिंग’चे षड्यंत्रही यानिमित्ताने चव्हाट्यावर आले आणि आगामी काळात या षड्यंत्राचा पूर्णपणे पर्दाफाश झाल्याशिवाय राहणार नाही.