(Kolkata Law College Gang-Rape Case) कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेजच्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाला एक वर्षही पूर्ण होत नाही तोवर कोलकात्याच्याच विधी महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. ही घटना २५ जूनच्या संध्याकाळी घडली असून, या प्रकरणी पोलिसांकडून तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
Read More
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एकूण ७ आरोपींविरुद्ध सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोबाईल हिसकावून बेदम मारहाण केल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. अन्वर असे मुख्य आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. अन्य ६ आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. ही घटना मंगळवार, दि. २५ जून २०२४ घडली.
उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यातील एका तरुणीने अब्दुल्ला पठाण या यूट्यूबर आणि बोगस डॉक्टरवर सामूहिक बलात्काराचा आरोप केला आहे. पीडित तरुणी मूळची गोरखपूर जिल्ह्यातील आहे. अब्दुल्ला पठाण याने नोकरीचे आमिष दाखवून तिला अंमली पदार्थ देऊन बलात्कार केल्याचा आरोप तिने केला आहे. या काळात पीडितेचा अश्लिल व्हिडीओ बनवून तिला ब्लॅकमेल करून तिचा गर्भपात करण्यास भाग पाडले.या प्रकरणात अब्दुल्लासोबत त्याचा भाऊ अब्दुल मलिक याचेही नाव आहे. पोलिसांनी सोमवार, दि. १० जून २०२४ अब्दुल्ला पठाणविरुद्ध एफआयआर नोंदवून तपास सुरू के
बिहारमधील किशनगंज जिल्ह्यात एका मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. पीडित तरुणी मूळची सिक्कीमची आहे. ही घटना एका गेस्ट हाऊसमध्ये घडली, जिथे पीडित मुलगी तिची ट्रेन चुकल्यानंतर राहत होती. तरुणीला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणालाही आरोपींनी मारहाण केली. अरहान अख्तर आणि अमजद हुसेन अशी आरोपींची नावे आहेत.
उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे रियाझ उर्फ मुघल-ए-आझम याने त्याच्या साथीदारांसह एका विवाहित महिलेचे अपहरण केले आणि त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. ही घटना 25 डिसेंबर 2023 च्या रात्री घडली होती. आता पोलिसांनी सामूहिक बलात्कार प्रकरणी रियाझ आणि त्याच्या चार साथीदारांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पिडीतेचे तिच्या कुटुंबियांसोबत काही कारणास्तव भांडण झाले होते. ती रागाच्या भरात गावाबाहेर रस्त्यावर गेली होती, मात्र तिचा राग शांत होऊन ती परत येत असताना रियाज आणि त्याच्या साथीदारांनी तिचे अपहरण
राजस्थानमधील भिलवाडा येथे एका १४ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिला कोळशाच्या भट्टीत जाळल्याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. चार महिलांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. घटनास्थळापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या तलावातून मुलीच्या मृतदेहाचे काही अवशेष सापडले आहेत. आरोपींनी आपला गुन्हा लपवण्यासाठी आणि लोकांची दिशाभूल करण्यासाठी हे केले होते.
इमारतीच्या गच्चीवरुन उडी घेत कल्याणच्या १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीने आत्महत्या केली.
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमिन (AIMIM) पक्षाच्या एका आमदाराचा मुलगा हैद्राबादच्या जुबली हिल्स येथे १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात सहभागी असल्याचा आरोप करण्यात येतोय. भाजप आमदार एम. रघुनंदन राव यांनी पत्रकार परिषदेत काही फोटोमध्ये एआयएमआयएमच्या आमदाराच्या मुलाचा या प्रकरणात सहभाग असल्याचा दावा केला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणी अटकेत असलेल्या ३ आरोपींची फाशीच्या शिक्षेचे जन्मठेपेत रूपांतर केले
५ पैकी ३ दोषींना जन्मठेपेची शिक्षा
राहुल गांधी यांचे हाथरसला जाणे हे केवळ राजकारण असल्याची टीका केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केली.
‘निर्भया’च्या बलात्कार्यांना तशा यातनांचे मरण वा जीवन ही शिक्षा ठरू शकली असती. त्या यातना त्यांना मिळण्याला ‘निर्भयाचा न्याय’ म्हणता येऊ शकेल. तसे काहीही झालेले नाही. पण, ज्यांनी हा अमानुषपणा केला, त्यांना मात्र ‘न्याय’ मिळाला आहे. त्यांच्या बलात्काराला ‘न्याय’ मिळाला आहे. त्यांच्या राक्षसी विकृतीचे कोडकौतुक झाले आहे. कारण, ‘निर्भया’च्या बलात्काराने उद्ध्वस्त झालेले तिचे कुटुंब व आईवडील पुढे सात वर्षे नरकयातनाच भोगत राहिले ना?
दोषी विनय शर्माने भिंतीवर डोके आपटून स्वत:लाच केले जखमी
कुर्ला बलात्कार प्रकरणाने मुंबई हादरली
दया याचिका फेटाळल्यानंतरही गुन्हेगारांना १४ दिवसांचा अवधी दिला जातो, असे सरकारी वकिलांनी हायकोर्टात सुनावणीवेळी सांगितले.
मला नेहमीच जल्लादची नोकरी जाचक वाटते, मात्र बलात्कार करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी मी जल्लाद देखील बनायला तयार आहे.
२०१४ मध्ये नवी दिल्लीत ५२ वर्षीय डॅनिश महिलेवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या पाच कैद्यांची याचिका फेटाळत दिल्ली उच्च न्यायालयाने आज त्यांची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवल्याचा निकाल दिला आहे.