शक्ती मिल सामूहिक बलात्कार ; आरोपींची फाशी रद्द

मुंबई उच्च न्यायालयाने घेतला मोठा निर्णय

    25-Nov-2021
Total Views | 397

Shakti mill gang rape_1&n
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणातील तीन आरोपींची फाशी रद्द केली आहे. या तिन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. २५ नोव्हेंबरला शक्ती मिल बलात्कार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने निकाल दिला असून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या ५ पैकी ३ आरोपींची फाशी रद्द करण्यात आली आहे. न्यायालयाकडून विजय जाधव, कासीम बंगाली, सलीम अन्सारी या आरोपींच्या फाशीच्या शिक्षेचे जन्मठेपेत रूपांतर केले आहे.
 
 
 
मुंबई उच्च न्यायालयाने यावेळी म्हंटले की, "“या घटनेने समाजाला खूप मोठा धक्का दिला. बलात्काराची प्रत्येक घटना ही खूप मोठा गुन्हा आहे. यामुळे फक्त शारिरीक नाही तर मानसिक आरोग्याला हानी पोहोचते. पीडितेच्या सन्मानावर हा हल्ला असतो. पण घटनेवर चालणारे न्यायालय लोकांच्या मतांच्या आधारे शिक्षा ठरवू शकत नाही. नियमाप्रमाणे जन्मठेपेची शिक्षा असून, फाशी हा एक अपवाद आहे. त्यामुळे योग्य विचार करुन निर्णय घेतला पाहिजे. अशा घटनांमध्ये प्रक्रिया विसरुन चालणार नाही. फाशीची शिक्षा रद्द करताना आम्ही प्रक्रियेचे पालन केले आहे. आरोपी जन्मठेपेच्या शिक्षेस पात्र आहेत. महिलांकडे एक वस्तू म्हणून पाहणारे हे आरोपी नैसर्गिक मृत्यू होईपर्यंत जन्मठेपेच्या शिक्षेस पात्र आहेत."
 
संपूर्ण देशाला हादरवणारे मुंबईतील शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरण
 
२२ ऑगस्ट २०१३ रोजी मुंबईतील महालक्ष्मी भागातील शक्ती मिल परिसरात संध्याकाळी एका महिला फोटोग्राफरवर सामूहिक बलात्कार झाला होता. पीडित महिला तिच्या सहकाऱ्यासोबत कामानिमित्त फोटोग्राफी करण्यासाठी तिथे गेली होती. त्यावेळी पाच जणांनी तिच्यावर बलात्कार केला होता. विशेष म्हणजे अन्य एका १९ वर्षीय तरुणीनेही शक्ती मिल परिसरातच आपल्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप केला होता. या प्रकरणातील आरोपीदेखील तेच होते. मुंबई सत्र न्यायालयाने यातील आरोपी विजय जाधव, सलीम अन्सारी, सिराज खान, कासिम बंगाली आणि एका अल्पवयीन मुलाला शिक्षा सुनावली होती. सिराज खानला जन्मठेप तर इतर तिघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. तर अल्पवयीन मुलाला बालसुधारगृहात पाठवण्यात आले होते.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121