निर्भया प्रकरण : दोषीला हवे आता चांगले उपचार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Feb-2020
Total Views |

nirbhaya case_1 &nbs


नवी दिल्ली : भिंतीवर आपले डोके आपटून स्वतला जखमी करणाऱ्या दोषी विनयने आता चांगल्या उपचारांसाठी न्यायालयात धाव घेतली आहे. दोषी विनयला क्रित्झोफ्रेनीया आजार असून त्यावरही उपचार करण्यात यावेत, अशी विनंती त्याच्या वकीलांनी केली आहे. निर्भया सामुहिक बलात्कार प्रकरणातील चारही दोषींना नव्या डेथ वॉरंटनुसार ३ मार्च रोजी फासावर चढविण्यात येणार आहे. मात्र, त्यापूर्वी फाशी टाळण्यासाठी दोषींतर्फे नवनवे मुद्दे पुढे आणण्याचे प्रयत्न होत आहेत.
 
 
 
प्रकरणातील एक दोषी विनय याने तुरुंगात भिंतीवर डोके आपटून स्वत:ला जखमी करून घेतले. त्यामुळे त्यांच्यावर चांगल्या पद्धतीने उपचार करण्यात यावेत, अशी विनंती त्याच्यातर्फे न्यायालयाकडे करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विनय यास क्रित्झोफ्रेनिया हा आजार झाला असून आता तो त्याच्या आईलाही ओळखू शकत नसल्याचे त्याच्या वकीलांतर्फे न्यायालयात सांगण्यात आले. याप्रकरणी न्यायालयाने तुरुंग अधिकाऱ्यांकडून यासंबंधी उत्तर मागितले असून येत्या शनिवारी म्हणजे २२ तारखेला सदर प्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@