पत्रकार निखिल वागळेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, लालकृष्ण आडवाणी आणि राष्ट्रपती द्रौपती मूर्मूंविरोधात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ पुण्यात होणारी निर्भय बनो ची सभा होऊ देणार नाही, असा पवित्रा भाजपने घेतला होता
Read More
लंडनच्या ’रॉयल हिस्टॉरिकल सोसायटी’चा एक विद्वान रॉबर्ट पेकहॅम माने ‘फिअर ः अॅन आल्टर्नेटिव्ह हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड’ या 450 पानी ग्रंथाद्वारे, विविध प्रकारच्या भयांमुळे इतिहास कसा घडत गेला, याचं विवेचन केलं आहे.
रत्नागिरी किनार्याजवळ शुक्रवार दि. १६ सप्टेंबर रोजी डांबर वाहून नेणारे जहाज अपघात ग्रस्त झाले. हे जहाज बुडाण्यापूर्वी भारतीय तटरक्षक दलाने १९ खालाश्यांची सुटका केली. या घटनेमुळे मोठ्या प्रमाणात सागरी प्रदूषणाची भीती निर्माण झाली होती. रत्नागिरी किनाऱ्यापासून ४१ नाॅटीकल मैल लांब ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे मालवण आणि गोवा किनारपट्टी लगत गळती झाली. मालवण किनारपट्टी जवळ पाण्यात डांबराचे गोळे आढळून आले.
गौतम अदानी यांच्या अदानी समूहाने एएमजी कंपनी मध्ये २९.३ टक्के शेअर्स विकत घेतल्याची घोषणा केली. एनडीटीव्ही न्यूज नेटवर्क हे एएमजी कंपनीचे आहे. तसेच अदानी समुहानेही पुढील शेअर्स घेण्यासाठी खुली ऑफर सादर केली आहे. यामुळे, एनडीटीव्हीचे संपादक रविश कुमार यांच्यावर मिम्स सोशल मिडिया वर पाहायला मिळत आहेत.
जगात सातत्याने वाढत असलेली महागाई, रेंगाळलेले रशिया - युक्रेन युद्ध, खनिज तेलांच्या दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या किमती या सर्वांनीच सगळ्या जगाला चिंतेत टाकले आहे. अमेरिकेतही कधी नव्हे ते निगेटिव्ह आर्थिक वाढ नोंदवली गेली आहे . दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या चीनचा आर्थिक विकासदरही सातत्याने कमीच होताना दिसतोय. जगातील सर्वच तज्ज्ञ जग आर्थिक मंदी कडे जातंय असेच सांगत आहेत, अशातच भारताला या आर्थिक मंदीचा अजिबात धोका नाही. भारतात मंदी येण्याची चिन्हे शून्य आहेत असे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ब्लूमबर्ग रिपो
कर्नाटक पोलिसांनी गेल्या महिन्याच्या अखेरीस भाजप युवा शाखेच्या कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी आणखी दोघांना अटक केली आहे. दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बेल्लारे येथे भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ता प्रवीण नेत्तारू दि. २६ जुलै रोजी रात्री यांची अज्ञातांनी हत्या केली होती. त्यांच्या हत्येने राज्यात खळबळ उडाली होती.
उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यात बुधवारी दि. २० रोजी एक बांधकाम सुरू असलेला पूल कोसळला. ऋषिकेश-बद्रीनाथ महामार्गावरील नारकोटाजवळ बांधकामाधीन असलेला हा पूल कोसळला. या घटनेत ६ मजूर जखमी झाले आहेत, तर ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याची भीती आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात मोंड खाडी किनारी एका सिमेंटच्या पोत्यात एका बिबट्याचा मृतदेह आढळून आला. हा मृतदेह कुजलेल्या स्थितीत असून या बिबट्याचे चारही पाय आणि शीर गायब आहे. पंचनामा करून वन विभागाने हा मृत देह ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे.
झारखंडमधील गिरिडीहमध्ये पचंबा पोलिस स्टेशन हद्दीतील हटिया रोडवरील सुमारे १५० घरे आणि दुकानांवर 'विक्री साठी उपलब्ध' असे पोस्टर लावण्यात आले आहेत. ही घरे आणि दुकाने हिंदूंची असल्याचे सांगितले जात आहे. रविवार दि. १२ जून च्या रात्री झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर पोलिसांच्या एकतर्फी कारवाईमुळे हिंदूंना स्थलांतर करण्यास भाग पाडले. मात्र, पोलिसांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.
ज्ञानवापीच्या वादग्रस्त रचनेत शिवलिंग सापडल्यानंतर आता मथुरेच्या शाही इदगाह मशिदी परिसराबाबत बाबत नवी याचिका दाखल करण्यात आली आहे. ही मशिदीला तात्काळ टाळेबंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. तिथले पुरावे नष्ट होऊ शकतात अशी भीती व्यक्त होत आहे.
अधिवास वितरणाच्या दृष्टीने एकेकाळी भारतभर विस्तारलेली तरस ही प्रजात, आता केवळ मोजक्या ठिकाणीच उरली आहे. निसर्गाच्या या नायकाची झालेली दुर्दशा आणि त्यामागच्या कारणांचा उहापोह करणारा हा लेख...
मानसिक आजार व भीती जर नाहीशी करायची असेल, तर होमियोपॅथीच्या औषधांना पर्याय नाही. कारण, होमियोपॅथीची औषधे नुसत्या हाडामांसाने बनलेल्या माणसावर कार्य करत नाहीत, तर हाडामांसाच्या आणि पेशींना कार्यरत ठेवणारी जी चैतन्यशक्ती आहे, तिच्यावर कार्य करते. माणसाचे मन, भावना, इच्छाशक्ती, विवेकबुद्धी व अंतर्मन यावर सकारात्मक कार्य करते. मन नावाचा कुठलाही अवयव मानवी शरीरात नसतो. मनाचे, इच्छाशक्तीचे (विलपॉवर), भावनांचे, विवेकबुद्धीचे कुठलेही ठोस शारीरिक दृश्य अस्तित्त्व माणसाच्या शरीरात नसते आणि तरीसुद्धा या सर्व गोष्टी अस
जर आपण सर्वांच्या वाईट गोष्टींनाच पाहत राहिलो, तर कधीही आपण लोकांना जोडू शकत नाही. त्यामुळे लोकांमधील चांगले गुणधर्मच पाहणे, ही सकारात्मकता! लोकांशी लबाडी न करता वागणे हीच सकारात्मकता!
महिलांना नोकरी, व्यवसाय किंवा इतर अनेक कारणांनी बाहेर पडावे लागते. दरवेळी वडील, भाऊ, नवरा सोबत नसतातच. त्यामुळे अनावस्था प्रसंग ओढवल्यास स्त्रीला स्वतःची सुरक्षा स्वतःच करावी लागते. म्हणून एक महत्त्वाचा मुद्दा आहे की, स्त्रियांनी फिजिकल फिटनेस वाढवण्याची गरज आहे. संकटाच्या प्रसंगी पळून जाण्याची वेळ आली तर तसे करता आले पाहिजे. आपत्कालीन परिस्थितीत कमीत कमी पाच ते दहा मिनिटे स्वतःचे रक्षण कसे करता येईल यासाठी बॉक्सिंग, कराटे अशा प्रकारचे काही स्वसंरक्षणात्मक धडे घेणे गरजेचे आहे. ते घेतल्यास सज्जनशक्ती मदतीस य
नाशिक शहर पोलिसांमार्फत सध्या नाशिक शहरात निर्भया पथकाच्या माध्यमातून अनोखे स्टिंग ऑपरेशन राबवत महिला सुरक्षेस प्राधान्य दिले जात आहे. शहरातील माताभगिनींना याद्वारे निर्भयपणे जगण्यासाठी मदत मिळाली आहे. या निर्भया पथकाचे कार्य खरोखरच अभिमानास्पद आणि अभिनंदनीय आहे.
‘पारा’ म्हणजे आमचा प्रथितयश चित्रकार आणि सर जे. जे. स्कूलचा ज्येष्ठ कलाध्यापक ज्याचं कागदोपत्री नाव ‘राजेंद्र पाटील’ असं आहे. ‘पारा’ हे नाव अर्थात टोपणनाव. पण हे नाव कसं पडलं, हा प्रश्न मी कदाचित त्याला विचारणारही नाही. कारण, ‘पाटील’चा ‘पा’ आणि राजेंद्रचा ‘रा’ असा ‘पारा’ बनला असेल, अशी मी रास्त समजूत करून घेऊन ‘पारा’च्या कलाकृतींचा आशय शोधण्याचा प्रयत्न या लेखात करणार आहे.
स्वदेशी बनावटीच्या आणि स्वदेशातच विकसित केलेल्या लांब पल्ल्याच्या ‘निर्भय’ या सब सॉनिक क्रुझ क्षेपणास्त्राची ओदिशातल्या चंदीपूर इथे यशस्वी चाचणी घेण्यात आली. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने ही चाचणी घेतली. चाचणीसाठी ठेवण्यात आलेल्या सर्व उद्दिष्टांची पूर्तता झाली आहे.
सध्या पश्चिमेतील साहित्य वर्तुळात पोलंडवरून जरा खळबळ माजली आहे, ती एका पुस्तकामुळे. खुद्द पोलंडमध्ये तर त्या पुस्तकावर बंदी घालून, लेखकावर बदनामीचा खटला दाखल करता येईल का, याबद्दल सरकारी वर्तुळात खल चालू आहे.
यश-अपयश या नाण्याच्या दोन बाजू आहेत, अपयश ही यशाची गुरुकिल्ली आहे वगैरे सुवचने सुविचारापुरती अगदी तंतोतंत शोभतात. पण, प्रत्यक्षात या सुविचारांची सुयोग्य अंमलबजावणी करणे तितकेसे सोपे नाही. कारण, अपयशाने माणूस खचून जातो.
मुलांचे शैक्षणिक वर्ष सोपे, आरोग्यपूर्ण व सुरक्षित जावे, यासाठी पुन्हा शाळा सुरू होताना मुलांशी चर्चा करण्याचे काही महत्त्वाचे विषय पुढीलप्रमाणे-