झारखंडच्या गिरिडीहमध्ये दगडफेकीनंतर हिंदू दहशतीत

घर आणि दुकानांवर लावले विक्रीचे फलक पोलिसांनी फेटाळले एकतर्फी कारवाईचे आरोप

    16-Jun-2022
Total Views | 84
Jharkhand
 

रांची: झारखंडमधील गिरिडीहमध्ये पचंबा पोलिस स्टेशन हद्दीतील हटिया रोडवरील सुमारे १५० घरे आणि दुकानांवर 'विक्री साठी उपलब्ध' असे पोस्टर लावण्यात आले आहेत. ही घरे आणि दुकाने हिंदूंची असल्याचे सांगितले जात आहे. रविवार दि. १२ जून च्या रात्री झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर पोलिसांच्या एकतर्फी कारवाईमुळे हिंदूंना स्थलांतर करण्यास भाग पाडले. मात्र, पोलिसांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.
 
 
रविवार दि. 12 जून रोजी विनयभंगावरून दोन समुदायांमध्ये वाद झाला होता. वाद वाढत गेल्याने दगडफेक सुरू झाली. कडक पोलीस बंदोबस्तात परिस्थिती नियंत्रणात आली. दुसऱ्या दिवशी सोमवारी दि. १३ जून पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांसह एकूण सात जणांना अटक केली. आणि त्यांना हजारीबाग रिमांड होम आणि गिरीडीह कारागृहात पाठवले. हिंदूंनी ही कृती एकतर्फी असल्याचे घोषित केले आहे.
 
 
स्थानिक लोकांनी बुधवारी दि.१५ पोलिसांवर एकतर्फी कारवाई केल्याचा आरोप करत धरणे आंदोलन केले. गुन्हेगार मोकाट फिरत आहेत. तर निरपराधांना तुरुंगात पाठवले जात आहे.  दगडफेकीच्या वेळी आपली दुकाने आणि घरे वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असे धरणे आंदोलनात सहभागी झालेल्या लोकांचे म्हणणे आहे. मुस्लिमांच्या त्रासामुळे झारखंड राज्यातील गिरिडीह जिल्ह्यातील पचंबा येथे बहुसंख्य समुदायाचे रहिवासी दहशतीत आहेत. दुकान व घरावर विक्रीचा फलक लावून येथून पळून जाण्याचा विचार त्यांनी केला आहे.
परंतु, गिरिडीह पोलिसांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे 'एफआयआर' दाखल करण्यात आला आहे. आंदोलन करणाऱ्या लोकांशी बोलण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकतर्फी कारवाईचे आरोप निराधार आहेत. या प्रकरणातील अन्य आरोपींना अटक करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत असे गिरिडीहचे पोलिस अधीक्षक अमित रेणू म्हणाले.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121