Rahul Narvekar felicitated program organized by the Cuffe Parade Federation.
Read More
(Vadodara Bridge Collapse) गुजरातच्या वडोदरा आणि आणंद जिल्ह्याला जोडणारा महिसागर नदीवर असलेल्या गंभीरा पूलाचा काही भाग कोसळल्याने अपघाताची घटना घडली आहे. हा अपघात बुधवारी ९ जुलैला सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास घडला. अपघातादरम्यान वाहनांची वर्दळ सुरू असल्याने काही वाहनं थेट महिसागर नदीत पडली आहेत. या घटनेत आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला असून इतर काही नागरिक नदीपात्रात अडकल्याची शक्यता असल्यामुळे शोधमोहिम आणि बचावकार्य वेगाने सुरू आहे.
(IAF Jaguar Fighter Jet Crashes)भारतीय हवाई दलाचे एक जग्वार लढाऊ विमान बुधवारी ९ जुलैला राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातील रतनगड शहराजवळ कोसळल्याची माहिती समोर आली आहे. दुर्घटनेनंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि शोधमोहिम आणि बचाव कार्यासाठी पोलिसांची पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत.
(Iran-Israel War) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी काही तासांपूर्वी इराण आणि इस्रायलमध्ये पूर्ण शस्त्रसंधी झाल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर हे युद्ध थांबेल असा अंदाज होता, कारण ट्रम्प यांनी "मी दोन्ही देशांशी चर्चा केली असून दोन्ही देशांनी शस्त्रसंधीसाठी सहमती दर्शवली आहे, असे म्हटले होते. इराणने तर आधी विधानातून आणि नंतर थेट कृतीतून ट्रम्प यांचा दावा फेटाळून लावला आहे. इराणने इस्रायलवर अनेक क्षेपणास्त्रे डागून त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
(Iran-Israel War) गेल्या काही दिवसांपासून इराण आणि इस्त्रायल यांच्यात सुरु असलेल्या सशस्त्र संघर्षात अमेरिकेने उडी घेतली आहे. रविवारी २२ जूनला अमेरिकेने इराणच्या फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान या तीन आण्विक तळांवर हल्ला केला. या हल्ल्यांनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी सोमवारी २३ जूनला इराणमधील सत्तांतराबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले.
कल्याण रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक पाचवरुन दोन गांजा तस्करांना कल्याण रेल्वे गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या गांजा तस्करांची नावे मेहताब शेख आणि लाल कोटकी अशी आहे. यापैकी मेहताब हा मुंब्रा शीळ परिसरात राहतो. तर लाल हा कर्नाटकातील कुलबर्गी येथे राहणारा आहे. या दोघांकडून ४ लाख १७ हजार ३६० रुपये किंमतीचा गांजा पोलिसांनी हस्तगत केला आहे.
सर जे. जी. समूह रुग्णालय, व ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई अंतर्गत असलेले ग्रामिण आरोग्य प्रशिक्षण केंद्र व आरोग्य पथक पालघर यांच्यामार्फत जिल्ह्यातील 33 आश्रम शाळेमधील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी होणार असून आरोग्य तपासणी व उपचार तज्ञ डॉक्टरांमार्फत करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी सांगितले.
स्वबळाच्या सप्तरंगी चर्चा या महाराष्ट्रासह बिहारच्या राजकारणालाही तशा नवीन नाहीत. यंदाही आगामी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी हौशे, नवशे, गवशांनी बेटकुळ्या फुगवून स्वबळ आजमवण्याच्या राणाभीमदेवी थाटात गर्जना केल्या आहेत. त्यानिमित्ताने बिहारमधील स्वबळाच्या राजकीय जत्रेचा वेध घेणारा हा लेख...
गेल्या सात दिवसांपासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी सुरु असलेले प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांचे आंदोलन अखेर शनिवार, १४ जून रोजी त्यांनी स्थगित केले आहे. मंत्री उदय सामंत यांनी आंदोलनस्थळी राज्य सरकारच्या पत्राचे वाचन केले आणि त्यानंतर त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे.
मंत्री उदय समांत यांनी शनिवार, १४ जून रोजी प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या आंदोलनस्थळी भेट देत राज्य सरकारच्या पत्राचे वाचन केले. त्यानंतर बच्चू कडू यांनी गेल्या सात दिवसांपासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी सुरु असलेले आंदोलन स्थगित केले.
( Navi Mumbai Municipal Corporation officers employees are taking online advantage of the knowledge from Tech Wari ) महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण संस्कृती निर्माण करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातर्फे “टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक” हा अभिनव उपक्रम दि. ५ ते ९ मे २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या माध्यमातून शासनातील अधिकारी, कर्मचारी यांनी स्वयंविकास घडवित विविध नागरी सेवा अधिक लोकाभिमुख होण्याच्या दृष्टीने सकारात्मक पा
It was right that Foreign Minister Jaishankar gave a verbal reply to the European Union भारत-पाकिस्तानमधील तणावावर सामोपचाराने तोडगा काढण्याचा सल्ला भारताला देणार्या ‘युरोपियन युनियन’ला परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी शाब्दिक चपराक लगावली, हे योग्य झाले. दहशतवादाची निर्यात करण्यापासून आजवर पाकिस्तानला रोखले असते, तर हा तणाव निर्माणच झाला नसता, ही गोष्ट संयुक्त राष्ट्र किंवा ‘युरोपियन युनियन’ सोयीस्कररित्या विसरतात. भारताला शहाजोग सल्ले देण्याऐवजी युरोपीय देश रशिया-युक्रेन युद्धावर सामोपचाराने तोडगा काढण्याचा
( Priority providing houses to mill workers in Mumbai DCM shinde ) “गिरणी कामगारांनी मुंबईसाठी त्याग केला आहे. त्यामुळे या कामगारांना मुंबईत घरे देण्यास आमचे प्राधान्य आहे. जास्तीत जास्त कामगारांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी ‘एनटीसी’समवेत तातडीने बैठक घ्यावी. याशिवाय शेलू आणि वांगणी येथील घरांच्या किमती कशा कमी करता येतील, यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू,” असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गिरणी कामगारांना दिले.
cyclical Indian view of nature and its impact on the Indian social psych विज्ञानाविषयीच्या भारतीय आणि पाश्चात्य दृष्टिकोनांची तुलना करताना, एक मुद्दा वारंवार येतो तो म्हणजे चक्राकार विकासाची भारतीय कल्पना आणि रेषीय विकासाची पाश्चात्य कल्पना. हा भेद जसा मानवाच्या सृष्टीकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावर प्रभाव टाकतो, तसाच तो मानवजातीच्या स्वतःकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावरही प्रभाव टाकतो. स्वाभाविकपणे मानववंशाच्या उत्पत्तीपासून आजपर्यंतच्या मानवाच्या प्रगतीचे मूल्यमापन करताना, या दोन परस्परविरोधी प्रतिमानांचे आकलन त
Khalistani terrorists कॅनडामध्ये व्हँकुव्हरमधील एका प्रसिद्ध असणाऱ्या गुरूद्वारावर काही खलिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्याच रात्री गुरूद्वारावर भारता विरोधात घोषणाबाजी करण्यात आली होती. व्हँकुव्हरच्या एका हिंदू मंदिरांच्या भिंतींवर भडखाऊ घोषणा नमूद करण्यात आल्या होत्या. आरोप आहे की, काही दिवसांआधी गुरूद्वारावर खलिस्तान्यांनी नगर किर्तनात सामिल होऊ दिले गेले नाही, यानंतर ही घटना घडली आहे.
( RSS chief Dr. Mohan Bhagwat on ambedkar jayanti ) "आद्य सरसंघचालक प.पू. डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर दोघांचेही कार्य सामाजिकदृष्ट्या समानच आहे. समाजात स्वार्थ आणि भेदांना तिलांजली वाहण्याचे काम दोघांनीही केले", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.
( MMRDA provide direct financial compensation in the project ) ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा’ने (एमएमआरडीए) महत्त्वाचा निर्णय घेत सर्वसमावेशक आर्थिक ऐच्छिक भरपाई धोरण लागू करण्यास मान्यता दिली आहे. या माध्यमातून ‘एमएमआरडीए’च्या महत्त्वाच्या शहरी पायाभूत प्रकल्पांमध्ये प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया अधिक वेगाने पार पाडणे, हा या धोरणाचा उद्देश आहे. हा ठराव 159व्या प्राधिकरण बैठकीत मंजूर करण्यात आला.
( Global Skills Center in Maharashtra on lines of Singapore ) महाराष्ट्रातील युवकांना जागतिक दर्जाचे कौशल्य प्रशिक्षण देऊन, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी जगभरात रोजगाराची द्वारे खुली व्हावीत, या उद्देशाने कौशल्य विकास विभाग काम करत आहे. या दृष्टीनेच कौशल्य विभागाच्यावतीने सिंगापूरच्या धर्तीवर महाराष्ट्रातही जागतिक कौशल्य केंद्र उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या अनुषंगाने गुरुवार, दि. 3 एप्रिल रोजी कौशल्य विकासमंत्री मंगल प्रभात लोढा यांची सिंगापूरचे वाणिज्यदूत ओंग मिंग फुंग यांनी मंत्रालयात भेट घेऊन चर्चा के
( official history of the Maratha Empire should be published MP Udayanraje Bhosale demands to minister amit shah ) “छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि मराठा साम्राज्याचा अधिकृत इतिहास केंद्र सरकारने प्रकाशित करावा,” अशी मागणी भाजप खा. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय गृह तथा सहकारमंत्री अमित शाह यांच्याकडे गुरुवार, दि. २७ मार्च रोजी केली आहे.
( Construction in CRZ area by erasing map entries in Madh Malvani maps ) पालिका आणि भूमी-अभिलेख अधिकार्यांना हाताशी धरून मढ आणि मालवणी परिसरातील ‘सीआरझेड’ क्षेत्रात अवैध बांधकामे करण्यात आली आहेत. मूळ नकाशांमध्ये खाडाखोड करून हे प्रकार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती भाजपचे आ. अतुल भातखळकर यांनी मंगळवार, दि. २५ मार्च रोजी विधानसभेत उघडकीस आणली.
( Chief Minister Devendra Fadnavis on license of restaurant runs hookah parlor will be permanently revoked & law for strict action ) “वर्ष २०१८ मध्ये अवैध हुक्का पार्लरवर बंदी घातली आहे. त्यासाठी कायदा तयार केला आहे. त्यात अत्यावश्यक सुधारणा करण्यात येतील. यापुढे अवैध हुक्का पार्लर चालू करताना दुसर्यांदा सापडल्यास सहा महिन्यांसाठी उपाहारगृहाचा परवाना रद्द करण्यात येईल. तसेच तिसर्यांदा सापडला, तर परवाना कायमचा रद्द करण्यात येईल. तसेच संबंधित दोषी मालकांवर अजामीनपात्र गुन्हा नोंद केला जाईल,” असा इशारा गृहम
( CM Devendra Fadnavis at the inauguration of Pravin Darekar office ) आमदार प्रविण दरेकर यांनी सामाजिक, राजकीय जीवनात आपल्या मेहनतीतून आपली प्रतिमा, नेतृत्व, कर्तव्य या सर्व गोष्टी उभ्या केल्यात. सहकार क्षेत्रात त्यांनी ज्या प्रकारे ठसा उमटवला आहे तो मोलाचा आहे. हेच काम अधिक पुढे नेण्यासाठी 'कर्तव्यपथ' या कार्यालयाचे आज उदघाटन करण्यात आलेय. दरेकरांचे कार्यालय हे सर्वसामान्य माणसाला हक्काचे कार्यालय आहे. या कार्यालयात प्रत्येकाला न्याय मिळेल, सर्वसामान्य माणसाचे कल्याण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र
( Congress intention to change the Constitution for Muslim reservation Union Minister Jagat Prakash Nadda in rajysabha ) कर्नाटकात काँग्रेस सरकारने दिलेले मुस्लिम आरक्षण हे संविधानविरोधी असून घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करण्याचा आणि संविधान बदलण्याचा काँग्रेसचा हेतू आहे, अशा शब्दात राज्यसभेचे सभागृह नेते केंद्रीय मंत्री जगतप्रकाश नड्डा यांनी काँग्रेसला सोमवारी खडसावले.
( Sanjay Raut get into trouble in case harassment of Swapna Patkar ) उबाठा खासदार संजय राऊत यांच्या मानसिक छळाने त्रस्त झालेल्या स्वप्ना पाटकर यांना न्याय देण्यासाठी शिवसेना महिला आघाडी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देणार आहे.
(Pakistan Train Hijack)पाकिस्तानमध्ये एक प्रवासी रेल्वे हायजॅक करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पाकिस्तानातील बलुचिस्तानात येथे बलुच लिबरेशन आर्मीकडून जाफर एक्सप्रेस हायजॅक करण्यात आली आहे. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रेल्वे ट्रॅकवर हल्ला करत बीलएने जाफर एक्सप्रेस थांबवून ६ पाकिस्तानी सैनिकांची बीलएच्या सैनिकांकडून हत्या करण्यात आली आहे.
यू ट्यूबर आणि पॉडकास्टार रणवीर अलाहाबादिया, जो ‘बियरबायसेप’ म्हणून ओळखला जातो, त्याने कॉमेडियन समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' या शोमध्ये केलेल्या अश्लील वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. पालकांच्या वैयक्तिक आयुष्यावर वादग्रस्त असा प्रश्न अलाहाबादियाने एका स्पर्धकाला चालू कार्यक्रमात विचारला. या एपिसोडमध्ये आशिष चंचलानी, जसप्रीत सिंग आणि अपूर्वा मुखिजा जी इंस्टाग्रामवर द रेबल किड म्हणून ओळखली जाते. यांच्यासारखे कंटेंट क्रिएटर्सही सहभागी होते.
शौर्य आणि धर्म या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन महादजी शिंदे आणि शिंदे घराण्याने असाच इतिहास घडवला असून तो पुढे आणणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय दळणवळण आणि पूर्वोत्तर विकास मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी शुक्रवारी केले आहे.
भारत अनेक जनजातींच्या परंपरांनी समृद्ध झाला आहे. या परंपरांचे संवर्धन ही आपली जबाबदारी आहे. ही जबाबदारी निभावण्याचे कार्य करणार्या दामोदर थाळकर यांच्याविषयी...
सध्याच्या राजकीय वातावरणात सत्ताधारी पक्ष संविधान बदलणार आहे अशी भीती विरोधी पक्ष सातत्याने व्यक्त करतो आहे. आणि आजच्या विरोधी पक्षाने पूर्वी सत्तेत असतांना कितीतरी वेळा संविधानात बदल केले हे आजचा सत्ताधारी पक्ष इतिहासातील दाखले देऊन सांगतो आहे. या उलट सुलट आरोप प्रत्यारोपांच्या फैरींच्या धुमश्चक्रीत सामान्य माणूस मात्र संभ्रमित होतो आहे. Politics anarchy संविधान सभेने संविधानाच्या मसुद्याला मान्यता देण्याला नुकतीच ७५ वर्ष पूर्ण झाली, पुढच्या महिन्यात भारतीय प्रजासत्ताक व्यवस्थेला ७५ वर्ष पूर्ण होतील. भारत
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तृतीय सरसंघचालक प. पू. बाळासाहेब देवरस यांचे संघटनकौशल्य हे सर्वस्वी वादातीत. प. पू. डॉ. हेडगेवार आणि श्रीगुरुजींनंतर बाळासाहेबांनी संघाच्या प्रत्येक निर्णयात संघटन कार्यपद्धती कशी असावी, याचा वस्तुपाठ घालून दिला. आज बाळासाहेब देवरस यांची जयंती. त्यानिमित्ताने या संघटनपुरुषाच्या गुणवैशिष्ट्यांचे हे चिंतन...
कठोर मेहनत, संयमी वृत्ती, विकासाची जिद्द, संघटनेचे बळ आणि जनसेवेचा ध्यास यांचे अतुलनीय मिश्रण म्हणजे महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस! विरोधकांनी राजकीय आणि वैयक्तिक पातळीवरही यथेच्छ चिखलफेक केल्यानंतरही देवेंद्र फडणवीस आपल्या भूमिकांवर अढळ राहिले. तेव्हा, ‘अकेला देवेंद्र क्या करेगा’ ते ‘अकेला देवेंद्र क्या क्या कर सकता हैं’ याचा प्रत्यय यंदाच्या विधानसभा निवडणुकीने दाखवून दिला. फडणवीसांच्या अशा या उंच गरुडभरारीच्या अद्वितीय यशाचा आलेख मांडणारा हा लेख...
Devendra Fadanvis यांच्या व्यक्तिमत्त्वाकडे पाहिल्यानंतर अगदी निश्चितपणाने लक्षात येते. एखाद्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीमध्ये त्याला मिळणारे आजूबाजूचे वातावरण, मिळणारे संस्कार, त्यातून होणारी जडणघडण आणि जीवनमूल्यांना येणारे महत्त्व, त्यातून साकारणारे आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व यातूनच देवेंद्रजी निश्चितपणाने सर्वच राजकीय नेत्यांमध्ये उजवे ठरतात.
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी अखेर शांत झाली आहे. महाराष्ट्रातील जनतेने सलग तिसऱ्यांदा महायुतीला पसंती दर्शवली असून, राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार विराजमान होण्याचा अंदाज मतदानोत्तर कलांमधून वर्तवण्यात आला आहे. गेल्या दोन विधानसभा निवडणुकांप्रमाणे यंदाही भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे.
Hindu Satsang सण - समारंभ आणि धार्मिक कार्यांना विरोध करणाऱ्या काँग्रेसने आता सत्संगालाही विरोध करण्याचा विडा उचलला आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग सेंटरतर्फे धारावी येथे आयोजित श्री. श्री. रवीशंकर यांची गुरुपूजा काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांच्या मुजोर पतीने बंद पाडली. तसेच दादागिरी करीत प्रचंड गोंधळ घातला.
( Ayodhya Deepotsav 2024 ) अयोध्या दिपोत्सव २०२४ : यावेळी एकाच दिवशी एक नाही तर दोन विश्वविक्रम नोंदविण्यात आले आहेत.
एसटीच्या प्रेमाचा छंद लागलेल्या आणि पुढे एसटीच्या प्रगतीसाठी अविरतपणे कार्य करणार्या ‘अवलिया प्रवासी’ रोहिते धेंडे यांच्याविषयी... MTB Article on Rohit Dhende
आपण मागील लेखांमध्ये शरीराचे स्वास्थ्य म्हणजे काय, त्याविषयी जाणून घेतले. शरीरात चालणार्या प्रमुख चार संस्था म्हणजे श्वसन, रक्ताभिसरण, पचन व मलनिस्सारण. या चारही संस्था व्यवस्थित चालल्या पाहिजेत. त्याची जबाबदारी प्रकृतीसोबत आपली स्वतःचीसुद्धा आहे. त्यासाठी आसने ही योगासने म्हणून करायची आहेत. मग नेमका काय फरक आहे आसने आणि योगासनांत? तो फरक म्हणजे आसने करताना मन आणि शरीर हे एकत्र ठेवल्याने आसने ही ‘योगासने’ होतात, जे शरीर आणि मन दोन्हींवरही उत्तम परिणाम करतात. आसने करताना प्रत्येक आसनाचे जे फायदे आहेत, ते मल
( Marathi language )राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ या दोन्ही संस्थांच्या मंडळांची पुनर्रचना १५ ऑक्टोबर रोजी झाली. या दोन संस्था काय काम करतात, त्या का अस्तित्वात आल्या, मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या या संस्थांची गरज सद्यस्थितीत काय? नव्याने झालेल्या संस्थांच्या मंडळांचा उद्देश्य आणि काम नेमकं काय असणर आहे याचा आढावा घेऊयात या व्हिडिओतून.
Mangalprabhat Lodha कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महिलांसाठी आज एक महत्वाची घोषणा केली. "नवरात्र अर्थात शक्तिरूपिणी दुर्गेचा उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे. ज्याप्रमाणे दुर्गा देवी हे शक्तीचे प्रतीक असून, वाईट प्रवृत्तींचा नाश करते त्याचप्रमाणे समाजातील नराधमांना धडा शिकवणारी दुर्गा प्रत्येक घरात असावी या उद्देशाने आम्ही ‘हर घर दुर्गा’ अभियान सुरू करत आहोत." असे मंत्री लोढा म्हणाले
मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि मिती क्रिएशन्सच्या वतीने ‘वाचन प्रेरणा दिनाच्या’ निमित्ताने मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या जगभरातील तमाम मराठी माणसांसाठी लेख स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
Girls Sexual Harassment कंत्राटी कामगारांनी अल्पवयीन मुलीला चहा-नाश्ता खाऊ घातला आणि तिच्यावर अत्याचार केल्याची घटना २५ ऑगस्ट रोजी जोधपूर जिल्ह्यातील शासकीय रूग्णालयात घडली आहे. रागाच्याभरात घराबाहेर गेलेल्या एका अल्पवयीन मुलीवर दोन तरूणांनी अत्याचार केला. राजस्थानातील याप्रकरणातील दोन्ही आरोपी हे रूग्णालयातील कंत्राटी कामगार असल्याचे सांगण्यात आले आहे.
Senior Citizen Scheme राज्यातील सुमारे सव्वा कोटीपेक्षा जास्त ज्येष्ठांसाठी ज्येष्ठ नागरिक महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सिंचन निर्माण करून या भागातील शेतीला समृद्ध करणाऱ्या महत्वाकांक्षी वैनगंगा - नळगंगा नदीजोड प्रकल्पाला बुधवार, दि. ७ ऑगस्च रोजी मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. ८७ हजार ३४२ कोटी ८६ लाख रुपयांच्या या प्रकल्पामुळे पावणेचार लाख हेक्टर क्षेत्राचे सिंचन होणार असून, विशेषत: मराठवाड्यासारख्या दुष्काळग्रस्त भागाला मोठा फायदा होणार आहे.
प्रसिद्ध भारतीय शिल्पकार सदाशिव साठे यांच्या शिल्पांचे प्रदर्शन वरळीतील नेहरू सेंटर येथे भरणार आहे. डोंबिवलीतील शिल्पालय आर्ट सेंटरतर्फे या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
भारतातील सार्वनजिक क्षेत्रातील बँकांपैकी एक असणाऱ्या बँक ऑफ बडोदाने (बँक) बॅलार्ड पियरवर मुंबई इंटरनॅशनल क्रु झ टर्मिनलच्या अगदी समोर ‘मुंबई टुरिस्ट हेल्प डेस्क’ लाँच केले आहे. या डेस्कद्वारे मुंबईला भेट देणाऱ्या देशांतर्गत तसेच आंतर राष्ट्रीय पर्यटकांची मदत केली जाईल. मुंबईचा 'क्रुझ टुरिझम हब' म्हणून विकास करण्याच्या उद्देशाने मुंबई पोर्ट ट्रस्टने (MBPT) पोर्टवर नुकतेच ‘ मुंबई इंटरनॅशनल क्रुझ टर्मिनल ’ बनवले आहे. सध्या दर आठवड्याला मुंबईपर्यंत आणि मुंबईपासून तीन ते चार लक्झरी क्रुझ पर्यटकांना देशांतर्गत व
राहुल गांधी हे चतुर्थ श्रेणीचे नागरिक असून त्यांची डीएनए चाचणी करण्याची गरज आहे, असा टोला डाव्या आघाडीचे आमदार पी. व्ही. अन्वर यांनी लगावला आहे.
परिस्थितीचा अजिबात बाऊ न करता, नातेवाईकांकडे राहून शिक्षण पूर्ण केले. वेळप्रसंगी शेतात मोलमजुरी करून स्पर्धा परीक्षेतही बाजी मारली. तेव्हा, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर शिवारापासून ते शिक्षणापर्यंत उल्लेखनीय कामगिरी करणार्या प्रशांत जाधव यांची ही यशोगाथा...
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि. २, ३ व ४ रोजी अमळनेर येथील पू.साने गुरुजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालयात होत आहे. संमेलनाची कार्यक्रम पत्रिका नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.
स्वच्छता ही एक मोहीम नसून लोकचळवळ असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ते म्हणाले, स्वच्छता ही प्रत्येकाच्या आरोग्याशी निगडीत असून यासाठी विद्यार्थी, प्रशासकीय यंत्रणा, सहकारी व सेवाभावी संस्था आणि नागरिक उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आहेत. तसेच, डीप क्लीन ड्राईव्ह या मोहिमेला लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त होत आहे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
एकाकीपणा हा केवळ भावनिक, मानसिकच नव्हे, तर शारीरिक आरोग्यावरही तितकाच परिणाम करणारा ठरु शकतो. म्हणूनच एकाकीपणाच्या या जंजाळातून सुटायचे असेल, तर तुम्हाला समाजाशी जोडण्यापासून रोखणारी सर्व भीती, बंधने सर्वप्रथम दूर सारा आणि एकाकीपणालाच एकटे पाडा!