राज ठाकरेंच्या टीकेनंतर निशिकांत दुबेंचं प्रत्युत्तर; म्हणाले, "मी राज ठाकरेंना हिंदी..."

    19-Jul-2025   
Total Views | 70

मुंबई : (Nishikant Dubey On Raj Thackeray) मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उबाठाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतल्यानंतर भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी त्यांना आव्हान दिले होते. शुक्रवारी राज ठाकरे यांनी मिरा भाईंदर येथे सभा झाली. यावेळी त्यांनी निशिकांत दुबे यांच्यावर तोफ डागली. राज ठाकरेंनी केलेल्या टीकेवर निशिकांत दुबे यांनी पुन्हा एकदा पलटवार करत प्रत्युत्तर दिले आहे.

राज ठाकरे काय म्हणाले?

मराठी आणि महाराष्ट्राबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून भाजप खासदार निशिकांत दुबे यांनाही राज ठाकरे यांनी लक्ष्य केले. 'दुबे, तुम्ही मुंबईत येऊन दाखवा, तुम्हाला मुंबईच्या समुद्रात डुबवून मारू', असे राज हिंदीमध्ये म्हणाले. "महाराष्ट्रात येऊन कोणीही मराठी व्यक्तीच्या अंगावर आला तर त्याला ठेचायचे. आम्ही हिंदू आहोत, पण हिंदी नाही", असे म्हणत राज ठाकरे यांनी खासदार निशिकांत दुबे यांच्यावर निशाणा साधला.

मी राज ठाकरेंना हिंदी शिकवली? - निशिकांत दुबे

निशिकांत दुबे यांनी यांनी पुन्हा एक्सवर त्यांच्यावर केलेल्या टीकेचा व्हिडीओ पोस्ट करत 'मी राज ठाकरेंना हिंदी शिकवली?' असे कॅप्शनमध्ये म्हटले आहे. राज ठाकरे यांनी हिंदीमध्ये दुबेंना प्रत्युत्तर दिले होते. तोच धागा पकडत दुबेंनी ठाकरेंना पुन्हा एकदा डिवचले आहे. या शाब्दिक चकमकीदरम्यान आता मनसेकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.




अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121