ब्रेकिंग! जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल; कारण काय?

    18-Jul-2025   
Total Views | 60


मुंबई : शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दखल झाल्याची माहिती पुढे आली आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांच्यावर हा गुन्हा दखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.


गुरुवारी जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधानभवन परिसरात तळमजळ्यावर हाणामारी झाली. यावेळी त्यांनी एकमेकांना शिवीगाळही केली. दरम्यान, तेथील सुरक्षारक्षकांनी या कार्यकर्त्यांना सोडवले. मात्र, सध्या सर्वत्र या घटनेचे पडसाद उमटले आहेत.


या घटनेनंतर रात्री आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांच्या पोलिसांच्या गाडीसमोर बसून त्यांनी या घटनेवर निषेध व्यक्त केला.


त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मरिन ड्राइव्ह पोलिस स्टेशनमध्ये हा गुन्हा दखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.


अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121