"भारत-पाकिस्तान संघर्षामध्ये मध्यस्थी स्वीकारणार नाही", पंतप्रधान मोदी-ट्रम्प यांच्यात ३५ मिनिटे फोनवर चर्चा! मोदींनी स्पष्टच सांगितले...

18-Jun-2025
Total Views | 26

नवी दिल्ली : (PM Narendra Modi) कॅनडामध्ये झालेल्या जी-७ शिखर परिषदेनंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा केली. दोन्ही नेत्यांमध्ये ३५ मिनिटे फोनवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. खरंतर जी-७ शिखर परिषदेच्या वेळी त्यांची भेट होणार होती, परंतु डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेत लवकर परतल्यामुळे ही भेट होऊ शकली नाही. त्यामुळे ट्रम्प यांच्या विनंतीवरून दोघांमध्ये फोनवरुन ही चर्चा झाली. पंतप्रधान मोदींनी ऑपरेशन सिंदूरबद्दल ट्रम्प यांच्यांशी सविस्तर चर्चा केली. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी या चर्चेसंदर्भातील सविस्तर माहिती दिली.

परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्यात झालेल्या दूरध्वनी संभाषणाची माहिती दिली. विक्रम मिस्री म्हणाले की, "पंतप्रधान मोदींनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना स्पष्टपणे सांगितले की, या संपूर्ण प्रकरणात कधीही, कोणत्याही पातळीवर, भारत-अमेरिका व्यापार करार आणि भारत आणि पाकिस्तानमधील मध्यस्थीबाबत अमेरिकेने चर्चा केलेली नाही. लष्करी कारवाई थांबवण्याबाबतची चर्चा दोन्ही सैन्यांमध्ये स्थापित विद्यमान माध्यमांनुसार भारत आणि पाकिस्तानमध्ये थेट झाली होती, तीही पाकिस्तानच्या विनंतीवरून झाली होती."

#WATCH | Foreign Secretary Vikram Misri gives details on the teleconversation between PM Modi and US President Trump today over Operation Sindoor.

"PM Modi and President Trump were scheduled to meet on the sidelines of G7 Summit. President Trump had to return to the US early,… pic.twitter.com/LR9TXkygdh
— ANI (@ANI) June 18, 2025

पंतप्रधान मोदींनी यावर भर दिला की भारताने कधीही मध्यस्थी स्वीकारली नाही आणि ती कधीही स्वीकारणार नाही. पंतप्रधान मोदी म्हणाले की, या मुद्द्यावर भारतात पूर्ण राजकीय एकमत आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पंतप्रधानांनी मांडलेले मुद्दे सविस्तरपणे समजून घेतले आणि दहशतवादाविरुद्धच्या भारताच्या लढाईला पाठिंबा दर्शवला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत आता दहशतवादाला प्रॉक्सी युद्ध म्हणून पाहत नाही आणि भारताचे ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू आहे.

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121