विक्रमगड तालुक्यात ‘आलोंडे शाखा कार्यालय’ स्थापन करण्यास व वीज समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्यास खासदार डॉ. हेमंत सवरा यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

    18-Jun-2025
Total Views |


पालघर : पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक महत्त्वपूर्ण निवेदन सादर केले असून त्यामध्ये विक्रमगड उपविभागाच्या अखत्यारित येणाऱ्या विक्रमगड शाखा कार्यालयाचे विभाजन करून नवीन ‘आलोंडे शाखा कार्यालय’ स्थापन करून त्यास मान्यता देण्याची मागणी करण्यात आली आहे.


या भागात एकूण ३७,५२६ ग्राहक असून, सध्या फक्त १६ कर्मचाऱ्यांद्वारे ५७१ चौ. कि.मी. क्षेत्रात सेवा दिली जाते. त्यामुळे सेवा देताना अनेक अडचणी येत असून पावसाळ्यात याचा फटका अधिक जाणवतो. नवीन ‘आलोंडे शाखा कार्यालय’ स्थापन झाल्यास सेवा कार्यक्षमता वाढेल, ग्राहकांशी थेट संपर्क होईल व महसूलात वाढ होईल.
प्रस्तावित विभागणी पुढीलप्रमाणे आहे:


• विक्रमगड शाखा: ७,५९० ग्राहक, १४४ रोहीत्र

• आलोंडे शाखा: ७,५०५ ग्राहक, १३८ रोहीत्र

याशिवाय, विक्रमगड तालुक्यातील आदिवासी बहुल भागांतील गंभीर वीज समस्यांचे निवारण करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणी देखील मा. खासदार यांनी केली आहे. सध्या संपूर्ण तालुका एका उपकेंद्रावर अवलंबून असून अनेक वेळा जंगल, डोंगराळ भागांतून जाणाऱ्या 33 केव्ही लाईनमुळे वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे.


खासदार डॉ. सवरा यांनी पुढील उपाययोजना सुचवल्या आहेत:

1. आलोंडे शाखा कार्यालय तत्काळ सुरु करणे व कर्मचाऱ्यांची नियुक्ती
2. पाचमाड-उपराळे-बांधण-माण या पट्ट्यात नवीन 33/22 केव्ही उपकेंद्र
3. मनोर येथे अतीउच्चदाब उपकेंद्र उभारणे व भोपोलीसह ग्रामीण ग्राहकांसाठी स्वतंत्र फीडर
4. विक्रमगड शहरासाठी स्वतंत्र गावठाण फीडर
5. जामसर (ता. जव्हार) येथील 132 केव्ही उपकेंद्र कार्यान्वित करणे

“या मागण्यांची तात्काळ अंमलबजावणी झाल्यास विक्रमगड तालुक्यातील आदिवासी व ग्रामीण जनतेला मोठा दिलासा मिळेल. शिक्षण, आरोग्य व शेतीच्या सुविधा अधिक सक्षम होतील,”
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
आर्थिक सामाजिक मागास कुटूंबातील विद्यार्थ्यांची शिक्षणाची वाट सुरळीत : विशाल परब

आर्थिक सामाजिक मागास कुटूंबातील विद्यार्थ्यांची शिक्षणाची वाट सुरळीत : विशाल परब

कोकण कला व शिक्षण विकास संस्था, मुंबई यांच्या माध्यमातून प्रत्येक शैक्षणिक वर्षात हजारो विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचे उपक्रम राबविला जातो. यावर्षी हि आतापर्यंत सिंधुदुर्ग, पुणे, बीड,अहिल्याबाई नगर, ठाणे, रायगड सह अनेक जिल्ह्यात शैक्षणिक साहित्य वाटप संपन्न झाले असून याच वाटपाचा भाग म्हणून आज श्री माउली विद्यामंदिर डोंगरपाल येथे ३१ शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक असलेलं शालेय साहित्य उपलब्ध करून देण्याच्या हेतूने हा ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121